अडकलेले पैसे परत मिळण्यासाठी उपाय - Adaklele paise parat milnyasathi upay


जीवनात मानवाला पैसा सोडुन सर्व सोंग घेता येतात. आयुष्य पैशाशिवाय यत्किंचितही चालणार नाही. सर्व जनसमुदाय काहीतरी ; कोणत्याही मार्गाने झटपट कमवण्याचा मार्ग शोधत असतात परंतु अपरिपक्व मानसिकता, चिकाटी व योजने अंतर्गत अंमलबजावणीच्या अभावी अपयशी ठरतात. अशा परिस्थितीत कोणीही मदत करत नाही. 


त्यायोगे स्थुल चक्षुंनी दिसणाऱ्या फसव्या लोकांपेक्षा स्थुल दुनियेच्याही पलिकडील सुक्ष्म लोकातुन जर काही मदत घेता आली तर...? असा प्रश्न आपल्या मनाला अवश्य विचारा...! सध्या विश्वात विश्वासघाताचे प्रमाण ९९.९९% असल्यामुळे आयुष्यात आपली सुनिश्चित मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक व आध्यात्मिक प्रगतीचा शाश्वत मार्ग कोणता ? असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. त्यायोगेच आज गुप्त व जागृत दैवी साधना व्यक्त करत आहे.


मनुष्य आस्तिक असो कि नास्तिक... तो अनायासे सात्त्विक किंवा राजसी अथवा तामसी सुक्ष्म शक्तींनी सदैव वेढलेला असतो. अशा परिस्थितीत जे सुक्ष्म विरोधक आहेत त्यांची साथ मिळवता आली तर... जीवनाचा सहजच काया पालाट होईल यात शंका नाही. स्वदैववादा व्यतिरिक्त ईतर कोणताही दुवा क्षणभरही विश्वसनीय नाही. याच पार्श्वभूमीवर दैववादाद्वारे परमेश्वराला सर्वश्रेष्ठ भक्तीमार्गातुन सगुण किंवा निर्गुण भक्तीद्वारे संतुष्ट केल्यास तो आपली ईच्छा अथवा आपल्यास हीतकारक जे आहे ते प्राप्त करुन देईल. याच सोबत काही लौकिक दैवी साधनेनेही अवगत होणे शक्त आहे.
अर्थिक प्राप्ती ( धनलाभ ) हेतु प्रभावी दैवी साधना.


१. भगवान श्री कृष्णाचे दैनंदिन प्रार्थमिक स्मरण...

दररोज सकाळी सुर्योदयापुर्वी उठुन शुचीर्भुत होऊन उत्तराभिमुख होऊन आसनस्थ व्हा. डोळे बंद करुन गीतेतील खालील श्लोक १८ वेळा मनातल्या मनात म्हणावा...

यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः l

तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतीर्मम ll

🔗वैजयंती माळ १ युनिट : ५९९ फक्त 👈लिंक 
हा श्लोक वैजयंती माळेवर दररोज १८ वेळा स्मरण केल्यावर मन मोठे प्रसन्न होते. भगवान श्री कृष्णाचे श्रीवैभवादी भाव मनात जागृत होतात. मनाला सहज हलकेपणा जाणवल्यावरच पुढील साधना मार्ग क्रमण फळप्राप्तीच्या दृष्टिकोनातून फायदेशीर आहे. यापुढे खालीलप्रमाणे दिलेल्या मंत्राचा वैजयंती माळेवर दररोज १०८ वेळा जप करावा. 

मंत्र : ll श्रीकृष्णः शरणम् मम् ll


ही दररोज करावयाची साधना आहे. न चुकता नित्य नेमाने सकाळी करावी. जास्तीतजास्त २० मिनिटे साधनाकाळ अपेक्षित आहे.


याचसोबत खालीलप्रमाणे दिलेली साधना दर सोमवारी करावी.

२. भगवान शंकराची शिवार्चना...

अ. दर सोमवारी श्रीकृष्ण साधनेनंतर नागकेसर घेऊन ते आपल्या घरातील शंकराचे पिंडीस अगर तस्वीरीस वाहावी. नागकेसर ही धनदा वनस्पती आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी शिवमंदीरात जाऊन वरील प्रमाणे नागकेसर पिंडीवर वाहाणे व मौन पाळुन घरी येणे. त्यानंतर

ब. दर सोमवारी श्री शिवलीलामृताचे दोन अध्याय आसानस्थ होऊन वाचा. साप्ताहीक पाठ करुन काहीतरी गोड नैवेद्य करुन शंकराला दाखवा. त्या दिवशी पुर्ण शाकाहार करावा व व्रतस्थ राहा. या दिवशी तुमच्या सन्मुख येणारे भिकारी अथवा याचक यांना काहीतरी पैसे दान करा. दत्त अन्नछत्रात अन्नदान करा. पितृतृप्ती हेतु तिळांचा होम साधना प्रारंभापुर्वी एकदा तरी अवश्य करा. 



वरील प्रमाणे साधना एकवीस सोमवार करावी. शेवटच्या सोमवारी पतिव्रतस्थ चारित्र्यसंपन्न सुहासिनीस भोजनास बोलवुन तिची खणानारळाने ओटी भरावी. देवी मानुन नमस्कार करा. दृढ विश्वासाने व सरळ भक्तीमार्गाने उपासना केल्यास भगवंत अर्थिक मार्ग मोकळे करण्याचे दिशासंकेत अवश्य देतात व अद्भुतरितीने द्रव्यसहाय्य करतात.

पैसे परत मिळण्यासाठी आणाखी एक उपाय सांगतो...
एक निळसर रंगाचा ड्राँईंग पेपर घेऊन त्यावर अगदी अस्पष्ट असे स्वस्तिक चिन्ह ( दोन ईंच लांबी रुंदी ) काढा. नंतर नागकेसराच्या काड्या पेन्सिलीने काढलेल्या त्या रेषांवर डिंकाने हळुवार चिकटवाव्यात. हा कागद सुमारे तीन फुट अंतरावर ठेवुन त्या नागकेसरयुक्त स्वस्तिक चिन्हाकडे दोन तीन मिनिटे एकाग्र चित्ताने पहावे व लगेच डोळे मिटुन घ्यावेत. त्या स्वस्तिकाची काळी आकृती मनःचक्षुंसमोर येऊ लागेल. सदर आकृती अस्पष्ट झाली की परत डोळे ऊघडुन स्वस्तिकाकडे २-३ मिनिटे पाहुन डोळे मिटुन ती आकृती मनःचक्षुसमक्ष आणावी. असे एकवीस वेळा करा. 

ही साधना दररोच करायची आहे. योग्य वेळ सुर्योदय किंवा सुर्यास्तातील नैसर्गिक प्रकाश...! या साधनेस सरासरी ४ ते ६ महीने वेळ द्यावा.


ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...









0