वास्तुसाठी सोपे घरगुती उपाय. - Works Quikly


काळजी घेऊनही मुळ वास्तूतच काही दोष असेल तर खालीलप्रमाणे उपाय प्रभावकारक ठरतो. वास्तु शुद्ध करण्यासाठी प्रार्थमिक स्वरुपाचे उपाय येथे आहे. वास्तु दुषित असेल तर याचा नक्कीच उपयोग होईल. हे उपाय सतत न टाळता एक वर्ष तरी करणे आवश्यक आहे. वास्तु किती प्रमाणात दुषित आहे यावर उपायांचा कालावधी ठरवावा. स्तोत्रवाचन व श्री गुरुचरीत्र पारायणे यासारखे उपाय कायम स्वरुपात चालु ठेवावेत म्हणजे वास्तुत नवा त्रास निर्माण होणार नाही. 


काही प्रार्थमिक स्वरुपाचे उपाय सांगतो...

१. आपली वास्तु जास्तीत जास्त स्वच्छ व पवित्र ठेवण्याचा प्रयत्न करावा. पावित्र्य निर्माण होण्यासाठी दररोज सगुण देवपूजा, स्तोत्रपठण विशेषतः रामरक्षा, घरासमोर सडा शिंपडुन रांगोळी काढणे, घरात अधुन मधुन गोमुत्र शिंपडणे, देवी कवच, अर्गला, किलक व कुंजिकास्तोत्र यांचे पाठ करणे. 

नवार्ण मत्रांचा जप करणे, नवनाथ, गुरुचरित्र ई. पोथींचे पारायण करणे किंवा रोज शंभर ओव्या मोठ्याने वाचणे. घरात धुप जाळणे. उदबत्त्या लावुन वातावरण सुगंधित ठेवणे. 


२. ज्या वास्तुत नित्य काही उपासना तसेच नामस्मरण इ. चालु आहे. वेद मंत्रांचा घोष होत आहे अशा ठिकाणी दुष्ट आत्मे राहु शकत नाही. 


काही कारणास्तव विशेष बाधा असेल तर पुढील प्रार्थमिक उपाय नेमाने सुरु करावेत. काही वेळा उपाय सुरु केल्यावर त्रास जास्त वाढतो कारण त्या दुष्ट शक्तींना ती वास्तु सोडुन जाण्याची ईच्छा नसते म्हणुन त्रास वाढला तर आपण सुरु केलेला उपाय योग्य आहे असे समजुन तेच श्रद्धापुर्वक सुरु ठेवावेत. साधारणतः सहा ते आठ महीन्यानंतर त्याचा परिणाम दिसु लागेल. उताविळ होऊ नये. 


अनुभवसिद्ध उपाय सांगतो. ते प्रथम करा. उगीच भगत, बाबा, भटजी, तांत्रिक किंवा मांत्रिकाच्या नादी लागुन फसु नका. 


➤रोज घरात निदान एक दिवसाआड घरात गोमुत्र शिंपडावे. नसल्यास हिंगाचे पाणी वापरु शकता.


➤रोज जेवणापुर्वी वास्तु पुरुषासाठी वेगळा नैवेद्य आठवणीने काढा. 


➤अमावस्येला तिन्ही सांजेला मुख्य दरवाज्यावरुन ७ वेळा दहीभात उतरुन टाकावा. 


➤अमावस्येला उंबर्यावर एक नारळ उलटा वाढवावा तसेच घरातील देवासमोर सहा महीने अखंड नंदादिप लावावा. 


➤रोज घरासमोर सडा शिंपडुन रांगोळी व त्यात स्वस्तिक चिन्ह अवश्य काढा. 


➤रोज घरात रामरक्षा ११ वेळा व भीमरुपी १ वेळा अवश्य म्हणावं.


➤पंचमी, अष्टमी व पौर्णिमेला देवीला कुंकुमार्चन करा त्यावेळी देवीची १०८ नावे घेत देवीवर कुंकूम वाहावे. हे कुंकु दुसऱ्या दिवशी काढुन व्यवस्थित डबीत ठेवा व तेच कपाळी वापरा. तसेच थोडे पाण्यात कालवून सडा घरात शिंपडा. त्यायोगे घरात मांगल्य निर्माण होते. 


➤चार पाच काळे गोफ मुठीत घेऊन अकारा वेळा रामरक्षा व एक वेळा भीमरुपी स्तोत्र मोठ्याने  म्हणावे. ते गोफ घरातील प्रत्येकाने गळ्यात घालावे व एक गोफ बाहेरच्या दरवाज्यावर बांधावा. 


➤पुढील यंत्र कागदावर काढावे. 


काळजी घेऊनही मुळ वास्तूतच काही दोष असेल तर खालीलप्रमाणे उपाय प्रभावकारक ठरतो. वास्तु शुद्ध करण्यासाठी प्रार्थमिक स्वरुपाचे उपाय येथे आहे. वास्तु दुषित असेल तर याचा नक्कीच उपयोग होईल. हे उपाय सतत न टाळता एक वर्ष तरी करणे आवश्यक आहे. वास्तु किती प्रमाणात दुषित आहे यावर उपायांचा कालावधी ठरवावा. स्तोत्रवाचन व श्री गुरुचरीत्र पारायणे यासारखे उपाय कायम स्वरुपात चालु ठेवावेत म्हणजे वास्तुत नवा त्रास निर्माण होणार नाही.

हे यंत्र मुख्य दरवाज्याच्या आतील बाजुस चिकटवावे. या यंत्रामुळे घरात कटकटी, वादावादी व भांडणे कमी होतात. 


➤'रामचरित मानस' या ग्रंथातील पुढील मंत्र डिंकाचे पाणी व शेंदुर यांच्या मिश्रणाने मुख्य दरवाजाच्या वर लिहावा व त्याला दर शनिवारी उदबत्ती ओवाळावी. 


पवनऊं पवनकुमार  खल बन पावक ग्यानधन l

जासु ह्दयआगार बसहि राम सर चाप धर ll

➤घरात कुठेही अडगळ वा घाण ठेऊ नये. कारण अशाच जागा दुष्ट शक्तींना प्रिय असतात. घरात मुक पक्ष्यांना कोंडून पिंजऱ्यात ठेऊ नये त्याने त्यांचे मुक शाप बाधल्याशिवाय राहात नाहीत. 




ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...




0