HOTEL वास्तु कशी असावी ?


उपहार गृह व गेस्ट लाँजिंग यांमधील वास्तुत फरक असतो. उपहार गृह अथवा RESTAURANT वर्गात ग्राहक खाद्य + पेय आणि क्लबींगच्या अनुशंघाने येतात पण ओव्हर नाईट स्टे किंवा राहाणे सुविधा नसते. त्यायोगे वास्तु उर्जा + दिशा स्पंदने + शुभकारक योग अबाधीत राहु शकतात. याउलट गेस्ट हाऊस प्रकारच्या हाँटेल्समधे येणाऱ्या ग्राहक वर्गाच्या सुक्ष्म सान्निध्याचा परिणाम त्या वास्तुवर सहज होतो. ज्यात रात्रीच्या शेवटच्या प्रहरातील वेळेत बाधीत ग्राहकांच्या सुक्ष्म नकारात्मक शक्तींचा परस्पर संबंध हाँटेल वास्तुशी अनायासे व सहज होऊन १० - १२ वर्षांच्या उपरांत हाँटेल वास्तु बाधीत होऊ लागते. यासंबंधी निवडक उपाययोजनेसाठी दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट माध्यमातून अभिलेख प्रकाशित करत आहोत.


उपहार गृह वास्तु शुद्ध कशी ठेवाल ?

शाकाहारी हाँटेलांना अनुसरुन निवडक वास्तु शुद्धी उपाय खालीलप्रमाणे आहेत. 


  • १. अन्न व धान्याचा नाहक क्षय / अपव्यय होऊ नये यासाठी हाँटेलच्या देवघरात वापरल्या जाणाऱ्या संपुर्ण अक्षतांनी अन्नपुर्णा मातेची चांदीच्या मुतीला समापन करावेत जेणेकरुन मुर्तीच्या हातातील धान्यपळी पुर्णपणे पुर्ण अक्षतांनी भरली जाईल. वरील नित्य स्थापना झाल्यावर दररोज एक अन्नपुर्णा मातेची १०८ जपाची माळ फिरावावीत.
  • २. हाँटेलात ग्राहक अथवा ईतर दुसऱ्या कोणत्याही माध्यमातून प्रवेश करणाऱ्या नकारात्मक ऊर्जेचा नायनाट करण्याचा सोपा मार्ग जाणुन घेण्यासाठी दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट शी संपर्क करावा. 


हाँटेल बांधण्यापुर्वी वास्तु नियोजन कसे कराल ?

  • संबंधीत व्यवसायासाठी वास्तु पुर्वाभिमुख असल्यास हितोपयोगी आहे. 
  • हाॕटेलाचे मुख्यद्वार उत्तर, उत्तर पुर्व अथवा पुर्वेला असायला पाहीजे. दक्षिणेला कधीही असु नये.
  • बिलींग काऊंटर नेहमी उत्तरेला असावेत.
  • स्वयंपाक घर आग्नेय दिशेला असायला पाहीजे. 
  • पाण्याचा साठा व बाल्कनी नेहमी पुर्व किंवा उत्तरेला असावी.
  • धान्य गोदाम साठा पश्चिम व दक्षिण दिशा अनुसरुन करावा.
  • उत्तर पश्चिमदिशेस स्नानगृह शौचालये बनवावीत.
  • एअर कंडिशनर सिस्टिम हाँटेलच्या पश्चिमेला असावेत.
  • विद्युत उपकरणे, ट्रान्सफोर्मर व जनरेटर वगैरे आग्नेय दिशेला असावीत.
  • वाँश बेसीन पश्चिमेस असावेत.
  • हाँटेलाचे उत्तर पुर्व क्षेत्र मोकळे ठेवावेत.
  • मुख्य वास्तुच्या चारही बाजु मोकळ्या ठेवाव्यात.



ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...