दुकानासाठी वास्तु कशी असावी ?


संबंधित वास्तु निराकरण उपाय दोन्हीही ' वास्तु दुकान मालक ' व ' वास्तु दुकान नोकरदार ' वर्गासाठी अनुकुल आहे. फक्त नोकरदार वर्गाचा वास्तु नियोजनाचा परीणाम मालक वर्गाच्या तुलनेत थोड्या अधिक कालावधीत अनुभवास येतो. दोन्हीही वर्गाने योग्य पद्धतीने अंमलबजावणी केल्यास प्रगतीकारक योग जुळुन येतात. त्यायोगे दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट माध्यमातून संबंधित अभिलेख प्रकाशित करत आहोत.योग्य पद्धतीने वास्तु तरंग संचार आपल्या सुक्ष्म जीवनात व्हावा यासाठी घरात व दुकानामधे श्रीयंत्राची योग्य सद्गुरुमार्गाकडुन ( घराणेशाही / वंशवादी नाही ) स्थापना करवुन घ्यावी. शक्ती उपासनेतील चार स्तंभ व त्यांच्या शक्त्यांचे यंत्र श्री यंत्र आहे. यास सर्व यंत्रांचे यंत्रराज असे ही म्हणतात. श्री यंत्र जागृतीनंतर त्यात सर्व ब्रम्हाण्डांचे सृजन व पालनत्मक शक्तीचा अविर्भाव दिसुन येतो. योग्य प्रभावकारक योग येण्यासाठी श्री ललिताम्बाच्या रुपविग्रहाचे श्री यंत्र जागृत करुन उत्तर दिशेच्या भिंतीवर दक्षिणाभीमुखाने स्थापना करावी. 


श्री यंत्र उपासना कशी करावी ? --- link

दररोज ' श्री सुक्त ' पाठ श्री यंत्रासमक्ष करावा.


।। ॐ ह्रीं श्रीं श्रीकमले कमलालये प्रसीद प्रसीद श्री ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्ये नम: ।। या मंत्राचा आपल्या मनोकामना अनुसरुन कमळगट्ट्याच्या माळ व सुप्त दर्भासनावर बसुन प्रतिदिन ११, २१, २७ असा जप करावा. 


प्रसन्नता प्रतिक चिन्ह

वास्तुतील प्रभावकारक चिन्ह घर व दुकानामधे लावावेत. या चिन्हाने घरात सदस्यांमधे परस्पर आपुलकी, प्रेम व जिव्हाळा उत्पन्न होतो. हे प्रसन्नता प्रतिक चिन्ह वास्तुत बेड रुमच्या दक्षिण व पश्चिम दिशेस लावावेत. वैवाहिक जीवनात सुख, सौख्य व आनंदात प्रगाढ वाढ होते. 

घंटी 


संबंधित वास्तु निराकरण उपाय दोन्हीही ' वास्तु दुकान मालक ' व ' वास्तु दुकान नोकरदार ' वर्गासाठी अनुकुल आहे. फक्त नोकरदार वर्गाचा वास्तु नियोजनाचा परीणाम मालक वर्गाच्या तुलनेत थोड्या अधिक कालावधीत अनुभवास येतो. दोन्हीही वर्गाने योग्य पद्धतीने अंमलबजावणी केल्यास प्रगतीकारक योग जुळुन येतात. त्यायोगे दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट माध्यमातून संबंधित अभिलेख प्रकाशित करत आहोत.

वास्तुच्या खिडकी अथवा गँलेरीत वायुमुक्त ठिकाणी घंटी लकटवावी. या उपायाने वास्तु चैतन्यमय होते. त्यातुन येणाऱ्या ध्वनी तरंगाद्वरे नकारात्मक उर्जा दुर अंतरावर अडुन राहातात. हा उपाय पश्चिम व उत्तर दिशेकडील वायु स्पंदनांना होकारार्थी करतो. या दिशेला सौभाग्यकारक योग उत्पन्न होण्यासाठी ६ किंवा ८ नळ्यायुक्त घंटी लटकृवा. दुर्भाग्य हटवण्यासाठी ५ नळ्यायुक्त घंटी वापरावीत. नळ्यांची एकुण लांबी ८ ईंचपेक्षा कमी असु नये. 


महत्वाची सुचना...

पुर्व व दक्षिण दिशांना अनुसरुन वास्तु चैतन्यमयी होण्यासाठी बांबु पासुन बनलेल्या घंटीचा उपयोग करा. 

वाईट ग्रहांच्या प्रभावापासुन आॕफिस वास्तुचे रक्षण कसे कराल ?


दत्तप्रबोधिनी संस्थेद्वारा यावर अधिक उपाय सक्रीय सभासदांसाठीच योजलेले आहेत तरीही सर्वसामान्य वाचकांसाठी काही निवडक उपाय खालीलप्रमाणे देत आहे.


 • आपल्या दुकानाची जमीन धुण्यावेळी त्यात तुरटीचा प्रयोग अवश्य करावा. त्यायोगे ग्रहांची नकारात्मक शक्तींचा प्रभाव वास्तुवर होणार नाही. 
 • व्यापारात वृद्धीकारक योग यावेत यासाठी ग्लोब पश्चिमेकडील दिशेला ठेवावा. ग्लोब पृथ्वी तत्वास बलशाली बनवतो. या ग्लोबला दररोज तीन वेळा जागेवर फिरवावा. अभ्यास करणाऱ्या मुलांच्या टेबलावर उत्तर पुर्व दिशेस ठेवल्यास शिक्षणात विशेष प्रगती होते. 
 • दुकानामधे खिडकी / गँलेरीला पाठ करुन बसु नये. जर शक्य नसेल तर लाल रंगाचा पडदा लावावा.
 • दुकानामधे मुख्य द्वाराला पाठ करुन बसु नये. 
 • बसलेल्या ठिकाणी पाठीमागच्या भिंतीवर ऊंच पर्वताचा फोटो लावावा.
 • आॕफीसच्या पुर्व दिशेला वृक्ष रोपटे लावावीत.
 • वास्तुत गोलाकार असलेल्या पानांच्या वृक्षांना शुभकारक मानले जाते. लांब, पुढील बाजुस निमुळते व सरळ पानांच्या वृक्षास अशुभ असतात.

दुकानासाठी टेबल कसा सजवावा ? 
 • तजेलदार फुलांचा धोटा कळस ठेवावा. फुले पिवळसर होत असल्यास बदलुन टाकावीत.
 • लहान वृक्ष आपल्या टेबलापसुन दक्षिणपुर्व दिशेला ठेवावीत. 
 • टेबल लेंप टेबलाच्या दक्षिण दिशेला ठेवावा.
 • गोल स्फटीक टेबलावर दक्षिण-पश्चिम दिशेस लावावेत. 
 • कंप्युटर : विद्युत प्रवाहयुक्त सामान स्वतंत्र टेबलावर पश्चिम किंवा उत्तर-पश्चिमेकडील बाजुस ठेवावेत.
 • कागदी पेपर्स व दस्ताऐवज आपल्या डाव्या बाजुस ठेवावेत.ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...
0