वास्तु भुमि परीक्षण - Real unknown secrets explained

वास्तु निर्माण करण्यापुर्वी संबंधित उद्दीष्टाला अनुसरुन निगडीत जमीनीची महत्ता सर्वप्रथम समजुन घेतले पाहीजेत. याअधीच अपेक्षित पार्श्वभूमी इतर लिखाणांमधे विशद केली आहे परंतु मोकळ्या जमिनीशी जोडालेला मनुष्याचा संबंध भविष्यात अतिघनिष्ठ ठरतो. सर्व परिणामांचा हाच पाया आहे. कोणकोणत्या प्रकारची जमिन पृथ्वीतलावर अस्तित्वात आहे. त्याचे परिक्षण नक्की कसं करावं ? याबद्दल विषेश लेख दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट माध्यमातून प्रकाशित करत आहोत.

वास्तु निर्माण करण्यापुर्वी संबंधित उद्दीष्टाला अनुसरुन निगडीत जमीनीची महत्ता सर्वप्रथम समजुन घेतले पाहीजेत. याअधीच अपेक्षित पार्श्वभूमी इतर लिखाणांमधे विशद केली आहे परंतु मोकळ्या जमिनीशी जोडालेला मनुष्याचा संबंध भविष्यात अतिघनिष्ठ ठरतो. सर्व परिणामांचा हाच पाया आहे. कोणकोणत्या प्रकारची जमिन पृथ्वीतलावर अस्तित्वात आहे. त्याचे परिक्षण नक्की कसं करावं ? याबद्दल विषेश लेख दत्तप्रबोधिनी तत्वाच्या आधारे प्रकाशित करत आहोत.

जमिनीचे एकुण मुळतः सहा प्रकार पडतात.


 • श्वेत भुमि
 • रक्त भुमि
 • वैश्य भुमि
 • श्रमिक भुमि
 • प्रेत भुमि
 • शापित भुमी

श्वेत भुमि 

श्वेत वर्णिय माती असलेली जमिन सुगंधाने परिपूर्ण व आनंदायक असते. अशी जमिन महान सामाजिक कार्यांसाठी उपयोगात आणल्यास समाजाचा उद्धार होईल. अशा जागेवर लक्ष्मी व सरस्वती एकत्र असतात. साहीत्य संशोधन, शाळा, मंदीर व मंगलकार्याहेतु शुभकारक आहे. सात्विकतेने परिपुर्ण वातावरण असते. आध्यात्मिक उपासना, समाज उभारणीसाठी सर्वश्रेष्ठ जागा असते. गृहस्थ वसाहतीसाठीही योग्य असते. 


रक्त भुमि 


लाल रंगाची माती असलेली जमीन क्षत्रिय तत्वाने परिपुर्ण असते. राज्याच्या संरक्षणात्मक कार्यासाठी अशा जागेची निवड करावी. लष्कर छावण्या, सैनिक प्रशिक्षण, हत्यार व शस्त्रास्त्रे शस्त्रागार यांसाठी अतिउपयुक्त जागा आहे. अशा जमिनीला राज्यप्रदाही म्हणतात. गृहस्थ वसाहतीसाठीही योग्य असते. 


वैश्य भुमि


अशा जमिनीची ओळख त्याच्या पिवळ्या रंगाच्या मातीने करण्यात येते. अशी जमीन व्यावसायिक कामकाजासाठी उपयुक्त असते. धनप्रवाह सत्वाशी जोडल्याकारणाने MIDC सारखे प्रकल्प राबवल्यास धनप्रदायक ठरते. गृहस्थ वसाहतीसाठीही योग्य असते. 


श्रमिक भुमि


अशी जमिन काळ्या रंगाच्या मातीवरून ठरवली जाते. समाजाचे भरण पोषण करणारी ही सर्वात प्रमुख जमिन आहे. अशा जमिनीवर पारंपारिक पद्धतीने शेती केली जाते. अशा मातीत सुगंध व गुणधर्मही परिपुर्णतेने सामावलेले असतात. शेती अथवा ईतर शेती संबंधित उत्पादनांच्या अनूशंघाने ही जमिन सर्वश्रेष्ठ आहे. माझ्या आवडीचा विषय म्हणजे दिवस रात्र कष्ट केल्याने शरीरातुन पडणाऱ्या घामाचा सुगंध या मातीत दरवळतो. जो या जमिनीला सर्वश्रेष्ठ ठरवतो. गृहस्थ वसाहतीसाठी योग्य असते. प्रेत भुमि


अशी जमिन राखाडी रंगाच्या पार्श्वभूमीवर सोबत स्मशान भुमि, कब्रीस्तान आणि शव घराच्या योजन अंतराद्वारे ठरवली जाते. गृहस्थ वसाहतीच्या दृष्टिकोनातून अशी जागा अयोग्य आहे. अशा जमिनीवर नकारात्मक उर्जेचा मनुष्य शरीराला अनायासे सर्वांगीण त्रास होतो. मुख्यतः महिला व बालकवर्ग अनुसरुन तीव्र यातना होतात. प्रेत भुमि कालचक्राचा अघोरी अथवा द्युतकर्मवादी साधक फायदा उचलण्याचा प्रयत्न करतात. कोणत्याही दृष्टिकोनातून मंगलमय भौतिककामनेहेतु या जमिनीचा सदुयोग होत नाही. 


शापित भुमी 


अशा जमिनीचा कोणताही ठराविक एक रंगवर्ण नसतो. अशी जमिन चाचणी फक्त कार्तिकेय पौर्णिमा किंवा कार्तिकेय अमावस्येलाच होते. शापित जमीनीचा अभिप्राय संबंधित कडवट इतिहास, घोर नरसंहार, भयानक शल्यताप, आत्महत्या, मोठी फसवणुक, कर्जबाजारी जमिन, दैवी कोप, संतांचा अभिशाप व नक्षत्र मारक वगैरे असु शकतो. अशी जमिन वरील कोणत्याही प्रकारच्या भुमिकार्यासाठी वापरली जात नाही. ईतकच काय तर स्मशान भुमी सारख्या कार्यासाठीही टाळावी. 


भुमि उंचीचा परीणाम • पुर्व दिशेला जमिन ऊंच असल्यास अपत्यांना त्रास होतो. त्यांची सर्वांगीण प्रगति होत नाही. 
 • पश्चिम दिशेला जमिन ऊंच असल्यास वंश वृद्धींगत होतो. 
 • उत्तरेला उंच असल्यास सुखदायक परिस्थिती राहाते. 
 • नैऋत्य, आग्नेय व दक्षिणदिशेला उंच असल्यास पैसा व आयुष्य दोन्ही लाभकारक आहेत. 
 • ईशान्य कोणाला उंची कष्टदायी आहे. 
 • वायव्य दिशेला उंची अर्थिक नुकसानदेयक आहे. 


भुमि उतार

संबंधित दिशेला जमिनीचा उतार असल्यास परिणामस्वरुप खालीलप्रमाणे आहे... • जमिन पुर्व, ईशान्य व उत्तर दिशेला उतरती असल्यास शुभकारक असते. 
 • आग्नेय दिशेला उतरती असल्यास अग्निसंबंधीत शारिरीक त्रास देते. दक्षिण दिशेला उतरती असल्यास मृत्युशोकग्रसीत करते. 
 • नैऋत्य दिशेला ग्रहपीडा देते व धननाशक ठरते. 
 • पश्चिमदिशा उतरती असल्यास अपयश व पुत्रमृत्यु संभवतो. 
 • वायव्य दिशेला उद्वेगकारक असतो. 

जमिनपृष्ठाचे प्रकार


 • जमिनीची लांबी व रुंदी सोबत उंची व उतार अनुसरुन ; संबंधित जागेची गुणवत्ता ठरवली जाते. त्या आधारे भुमि वास्तु निर्माणपूर्व चयनयादीत सामाविष्ट करावी.
 • जागा वायव्य व नैऋत्य दिशेला अग्र असल्यास गजपृष्ठ असे म्हणतात. अशा जागेवर वास्तू निर्माण केल्यास मनुष्य सर्वसंपन्न होतो.
 • जी जमीन मध्यावर उंच व ईतर सर्व बाजुंनी उतार असल्यास ती कुर्मपृष्ठ असते. अशी जागा सर्वप्रद शुभकारक असते. 
 • जी जागा ईशान्य, पुर्व व आग्नेयला उंच व पश्चिम दिशेला उतार असल्यास दैत्यपृष्ठ असते. गृहस्थ जीवनाला अनुसरुनष कलहकारक आहे.
 • पुर्व पश्चिम दिशेला लांब व दक्षिणेला उंच असल्यास नागपृष्ठ असते. भयानक व दुखद जीवन देणारी जमिन आहे. 
स्वतः जमिन परीक्षण कसे कराल ?

सर्वप्रथम वर दिलेल्या सर्व मुद्यांचा व्यवस्थित आढावा घेऊन जमिनीचा प्रकार, पृष्ठ, उंचीउतार व शुभाशुभ दिशानिर्देशने आकलन करावीत. जमिन भरीव नसल्यास वास्तु निर्माणाहेतु उपयुक्त नसते याची खात्री करा. दत्तप्रबोधिनी तत्वांतर्गत खालीलप्रमाणे जमिन परिक्षण करावेत...


१. जमिनीच्या उत्तर दिशेकडे कोपऱ्यात एक दिडा फुट खोल व चौरस रुंद खड्डा खोदावा. त्यातील सर्व माती व्यवस्थित बाहेर काढावी. परत थोड्या वेळाने तो खड्डा बाहेर काढलेल्या मातीनेच परत भरावा. 


यात तुम्हाला एकुण तीन परीणाम दिसणार... ते खालीलप्रमाणे आहेत. 


 • त्या खड्ड्यातुन बाहेर काढलेली माती परत भरल्यास ; अतिरिक्त माती शिल्लक राहात असल्यास ती जमिन श्रेष्ठ आहे.
 • त्या खड्ड्यातुन बाहेर काढलेली माती परत भरल्यास ; अतिरिक्त माती शिल्लक राहात नसल्यास ती जमिन मध्यम आहे.
 • त्या खड्ड्यातुन बाहेर काढलेली माती परत भरल्यास ; माती खड्डा भरण्यास कमी पडत असल्यास ती जमिन घाणेरडी आहे. 

महत्वाची टिप -

काही ठिकाणी जमीन उत्खनन व शल्य मापन करण्याच्या प्रक्रीयेत संबंधित सहभागी व्यक्तींना कोणत्याही कारणास्तव रक्तस्त्राव होत असल्यास ; ती जागा प्रेत भुमिच्या अधिपत्याखाली असल्याचे समजावे. सोबत ईतर लक्षणांचाही अभ्यास करावा. ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...


संपर्क : श्री. कुलदीप निकम 
Dattaprabodhinee Author )

भ्रमणध्वनी : +91 9619011227 
Whatsapp Or Sms Only )

GET FRESH CONTENT DELIVERED BY EMAIL:


FOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीतीCure Problems With Divine Powers. 100s Of People Cured ! Chakra Healing balancing. Ancient Indian Science. Based on Ashtaang Yog. Learn Yogic Healing. Types: Learner's Workshops, Stress Management, Divine Karma Cleansing, Mind empowerment, Chakra Balancing. - Visit Website Here !


Embed दत्तप्रबोधिनी न्यास on Your Site: Copy and Paste the Code Below
0