OFFICE वास्तु कशी असावी ?


उत्तम प्रकारे आपली अर्थिक स्थिती सुदृढ करण्याच्या दृष्टिकोनातून आॕफिससंबंधी वास्तु उपाय करणे महत्त्वाचे आहे. वास्तुत परीभ्रमण होणाऱ्या सुक्ष्म स्पंदनांचा प्रत्यक्ष संबंध वास्तुत उपस्थित असणाऱ्या लोकांवर होत असतो. त्यायोगे जे लोक ६ - ९ किंवा दुसरी शिफ्ट करतात ; त्यांच्यावर अधिक तीव्रतेने होतो. ज्याचा परिणाम संबंधीत मनुष्याच्या मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक व आध्यात्मिक परिस्थितीवर होतो. आपल्या राहत्या घराव्यतिरीक्त सर्वात जास्त वेळ आॕफिसमधे खर्च करत असल्याकारणास्तव उपाय नियोजनहेतु दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट माध्यमातून आॕफिससंबंधी वास्तु कशी असावी यावर अभिलेख प्रकाशित करत आहोत. 


दक्षिण-पुर्व दिशा

  • ही दिशा धनार्जन करण्याच्या दृष्टिकोनातून अतिउत्तम आहे. नागकेसर किंवा गोड फळे देणाऱ्या लहान रोपट्याद्वारे ह्या दिशेला वृक्षकुंडी ठेवावी. 
  • टाँयलेटमधील पाण्याची गळती थांबवुन ; दरवाजेही नेहमी बंद ठेवावेत. जेणेकरुन नकारात्मक शक्त्यांचा विपरीत परिणाम संबंधित वातावरणावर होऊ नये. 
  • मुख्य दरवाजाजवळील जमीन ( बाहेरील व आतील ) नेहमी स्वच्छ ठेवावीत. 

प्रगतीकारक प्रतिक पट्टी

ताम्र धातु द्वारे बनलेल्या प्रतिक पट्टीवर सुंदर अक्षरात पवित्र नाम अथवा मंत्राचे सुक्ष्म रेखाटन केले जाते. ज्यायोगे त्यातील प्रवाहीत होणारी सुक्ष्म उर्जा आपल्या जीवनात आधार व प्रगतीकारक योगची भुमिका बजावतात. ही पट्टी अशाप्रकारे स्थापित करावी ; जेणेकरुन आॕफीसला येणाऱ्या लोकांची नजर त्यावर पडेल.


आरसा कँश बाॕक्सला लावावा. 

कँश बाॕक्सच्या वर व तळाला आरसा बसवुन घ्यावा. त्यायोगे आरशामधील अनंग शक्तींचा दत्तप्रबोधिनी तत्वाशी संपर्क होऊन संबंधित अर्थिक वृद्धीकारक योग जुळून येतात. ज्यायोगे त्याचा फायदा व्यवसाय वृद्धीत होऊ लागतो. सोबत लाल फितयुक्त तीन चीनी सिक्केही ठेवावेत.


रक्तवर्ण दोरा कसा वापरावा ?

रक्तवर्ण ( लाल ) दोरा आणि फित यांना वास्तुशास्त्रात मंगलमय मानले जाते. सर्व प्रकारच्या वास्तु दोष निवारणाहेतु याच दोर्याचा उपयोग केला जातो. संबंधित वास्तुवर कुठलेही चित्र भिंतीवर लावताना ; त्यात लाल फितीचा उपयोग करावा. सोबतच कोणतेही मंगलमय कार्य करण्यापुर्वी उजव्या हातात लाल दोरा संबंधित देवतेला स्मरुन बांधावा. दोरा गाठपुर्वक भारून बांधला तर उत्तमच...!

श्री गणपती व श्री पंचमुखी हनुमान प्रतिमा स्थापित करावी.

प्रवेश द्वाराच्या आतील बाजुला वरती श्री गणेशाची प्रतिमा स्थापित करावी. श्री हनुमानाची प्रतिमा अशाप्रकारे स्थापित करावी की, आत प्रवेश करणाऱ्या लोकांना ती प्रतिमा सहज डोळ्यासमोर येईल.


कासव व घण्टी --- link

कासवाला उत्तराभिमुख करावेत. हा जल तत्वाचा कारक आहे. व्यापारातील अस्थिरता दुर होण्यास मदत होते.ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...
0