प्रतिबिंब त्राटक ( Reflection Tratak ) - अत्यंत प्रभावी प्राणाकर्षण व संमोहन विद्या - Works Quikly




ज्याने स्थुल शरीर धारण केले आहे त्याला त्याचे प्रतिरुप प्रतिबिंबाच्या रुपात दर्पणातुन दिसते. ज्याप्रमाणे ह्या मृत्युलोकात आपण सदेह अथवा निःदेह वावरत असतो, त्याचप्रमाणे मृत्युलोकाच्या समांतर विरोधाभासाने चालणारी अजुन एक विश्व आहे ते म्हणजे अनंग लोक.



प्रतिबिंब म्हणजे काय ?

आपल्या स्थुलबिंबाचे प्रतिरुप म्हणजेच प्रतिबिंब...! बिंब म्हणजे अस्तित्व अथवा वस्तुस्थिती. प्रतिबिंब त्राटक ह्या विद्येचा प्रसार स्वभाविक स्वरुपात संवेदनात्मक प्रतिक्रीयेच्या कारणास्तव कमी करण्यात आला. प्रतिबिंबातील सुक्ष्मजीव आपल्या सर्व कर्मांचे निःषक्षपाती साक्षीदार असतात. अनंग लोकातील संबंधित शक्ती मृत्युलोकात विचरण करु शकत नाही आणि मृत्युलोकातील देहधारी अनंगलोकात न जाण्याचा दंडक आहे. त्यायोगे प्रतिबिंब त्राटक साधना ही ऐकमेव विद्या दोन्ही लोकांतील आत्मशक्तींना स्वयंनियत्रणात ठेऊन कार्यसिद्धी यथाशक्ति करवुन घेतात व नियमांचेही पालन अबाधित राहाते.

ज्याक्षणी शरिरातील अतिसंक्रमित सुक्ष्मशक्तींना उतारा स्वरुपात संबांधित पदार्थांमधे उतरवुन नदीकाठी अथवा पाण्याच्या साठ्याजवळ सोडण्याची क्रीया आहे कारण आरश्याप्रमाणे पाणीसंचयसुद्धा सृष्टीचे प्रतिबिंब आहे. कोणतेही आध्यात्मिक कर्म संबंधित सेवा, साधनेच्या पुर्वार्ध अथवा उत्तरार्धात माहीती पोहोचवण्याकरीता पाण्याचा प्रतिबिंबात्मक उपयोग करतात त्यायोगे अनंगजीवांपर्यंत आपली विनंती पोहोचुन आपली कार्यसिद्धी त्यामार्फत पुर्ण केली जाते. ह्या अनंग जीवांमधे सर्वप्रकारचे देव, देवी, दैत्य व राक्षस सहभागी असतात. प्रतिबिंब त्राटक ही विद्या आपली प्रकृती सर्वसामान्य शारीरिक स्तरावरुन यौगीक स्तरावर सुक्ष्मशक्तींसोबत संधान ठेवणारी उच्चमत सीमापातळीवर कार्यक्षम बनवते.


प्राणाकर्षण व वाताकर्षण विद्या.

प्रतिबिंब त्राटक ही विद्या संमोहनात्मक कार्यसंचलन करते. हे कार्य संचलन स्वाभाविकपणे दोन स्तरांवर पाहाण्यात येते ते खालीलप्रमाणे आहे.

  • १. स्वयं संमोहनात्मक प्राणाकर्षण
  • २. चित्त संमोनात्मक प्राणाकर्षण

स्वयं समोहनात्मक प्राणाकर्षण

प्रतिबिंब त्राटक साधनेत प्रार्थमिक स्वरुपात साधना तत्पर साधक नामस्मरणाच्या माध्यमातुन स्वतःच्या शरीरातील जलतत्वाचे आत्मप्रतिबिंबाच्या स्वरुपात ध्यान करुन आत्मबळकटीकरणावर विशेष जोर देतात. ह्या आत्मिक सामर्थ्याने साधक जीवनात कधीही कोणत्याही अनंग शक्तींसमोर पराजय होऊ शकत नाही. साधकाचा आत्मा हा ईतर अनंगजीवांच्या तुलनेत सद्गुरुकृपे प्रचंड विस्तारलेला असतो त्याच अनुरुप आत्मबळही मोठ्याप्रमाणात साध्य होते. स्वयं संमोहनाच्या साधनेत स्वतःची कुवत व कार्यतत्परता ओळखली जाते. त्याअर्थी भविष्यात कोणतीही त्राटक विद्या करताना साधक सदैव गंभीर व सामर्थ्यवान असतो.


चित्त संमोहनात्मक प्राणाकर्षण

आपल्या सभोवताली असलेल्या देहधारी तसेज अनंग जीवांचे आत्मसंचलन चित्त संमोहनाच्या माध्यमातुन केले जाते. ह्या साधनेत अनायासे आपल्या आत्मचुंबकीय क्षेत्रात विश्व स्तरावर अनाकलनीय वाढ होते. त्यायोगे समविचारी मनुष्यप्राणी आपल्या संपर्कात सहज येतात. ही क्रीया मनोबल, श्रमिक , व्यवहारीक, सामाजिक अथवा निष्काम कर्मयोगासाठी उपयोगात आणता येते जेणेकरुन आपल्या कार्यप्रणालीत व सामाजिक बांधिलकीत विशेष भर होऊन बर्याच प्रमाणात राष्टहीतही साधता येऊ शकते. चित्त संमोहानात आपले आभामंडळ सर्व संबंधित कर्म जे देहबुद्धीच्या हद्दीत असो वा पलिकडे ते ते परीपुर्ण करते.

प्रतिबिंब त्राटक साधना करण्याचे फायदे :

  • १. अनंगजीवलोकाशी प्रत्यक्ष संपर्क प्रस्थापित होतो.
  • २. प्रखर संमोहनविद्या प्राप्त होते.
  • ३. नाम आत्मानुसंधान सुक्ष्म स्तरावर होते.
  • ४. जीवनातील भुत, वर्तमान व भविष्य घडामोडीचे पुर्वज्ञान प्राप्त होते.
  • ५. जीवनातील न दिसणाऱ्या अडचणींचे ज्ञान होते.
  • ६. काही प्रमाणात पितरांशीही प्रत्यक्ष संबंध अनुभवास येतो.
  • ७. आध्यात्मिक स्तरावर नाम साधनेचे अगाध माहात्म्य व सामर्थ्य अनुभवास येते.
  • ८. जीवनात व संबंधित कार्यसिद्धीत विघ्न उत्पन्न करणाऱ्या दुष्टशक्तींची ओळख पटते.
  • ९. Law of attraction  मधे चांगल्याप्रमाणात वाढ होते.
  • १०. Subconscious mind अनुभवण्यास सुरवात होते. etc

प्रतिबिंब त्राटक साधना यशस्वीपणे साधन्यासाठी अपेक्षित वस्तुमान व नियमांचे पालन महत्वाचे आहे. अन्यथा अनुभव येणार नाही. कोणतीही त्राटक साधनेच्या परिपुर्ण प्रतिसादासाठी स्थळ, वेळ व अपेक्षित वस्तु संग्रहांचे बंधन आहे. प्रतिबिंब त्राटक साधनेसाठीही सुर्योदय किंवा सुर्यास्त वेळ सर्वोत्तम असते. ह्या साधनेसाठी बेल्जियमचा आरसा असल्यास साधना चांगल्याप्रकारे साधली जाते.

सुर्योदय व सुर्यास्त वेळ अती योग्य असते कारण यावेळी सुर्याला सोम आहुती सर्वात जास्त प्रमणात असते. ह्या आहुती काळात दैवभ्रमण सर्वात जास्त प्रमाणात होत असते. प्रतिबिंब त्राटक साधना कशी करावी. त्याचे नियम व साधनाकृती साठी प्रत्यक्ष संपर्क करावेत.



महत्त्वाची टिप...

संबंधिक साधनाक्रीया संबंधित साधना तज्ञांच्याच मार्गदर्शनाखाली कराव्यात.

#TratakVidya #TratakSadhana #Trataka #TratakMeditation #TratakYoga #DrishtiSadhana #EyeMeditation #ThirdEyeAwakening #AjnaChakra #MeditationPractice #SpiritualDiscipline #SadhanaPath #InnerVision #MindPower #ConcentrationPower #FocusMeditation #AncientWisdom #VedicSadhana #YogicScience #EnergyAwakening #SpiritualReels #MeditationReels #AwakeningJourney #SanatanDharma #MysticIndia