बेल पत्र त्राटक Bilva patra Tratak - सोपी व सर्वश्रेष्ठ शिवशक्ती साधना - Works Quikly


' जे पिंडी ते ब्रम्हाण्डी ' या देहातीत शिवतत्वाचा सुक्ष्म अनुभव घेऊन आपलं अस्तित्व साक्षात शिवस्वरुप करण्याची प्रबळ ईच्छ्याशक्ती असल्यास बेल पत्र त्राटक यथाशक्ति आचरणात आणणे महत्त्वाचे आहे.



बेल पत्र त्राटक हे सर्व शिवसाधनेच्या तुलनेत अत्यंत प्रभावी आणि आत्मसंधानाच्या दृष्टिकोनातून परमहितकारक आहे. बेल पत्र भगवान शिवशशंकरास अत्यंत प्रिय आहे. सामान्यतः भगवान शिवास तीन गोष्टीं सर्वाधिक प्रिय आहे. त्यापैकी बेल पत्राचे माहात्म्य खालीलप्रमाणे वर्णन करत आहे.


बेल पत्र

सामान्यतः संसारात दोन प्रकारचे बेल पत्र अस्तित्वात आहेत. प्रार्थमिक स्वरुपात स्थुल बेल पत्र, जे आपल्याला कोणत्याही शिव मंदिराजवळ सहजतेने उपलब्ध होते. त्या योगे शिवलिंगावर जलाभिषेकानंतर ते वाहीले जाते. अद्वितीय बेल पत्र म्हणजे अंतरिक बेल पत्र, जे स्थुल भौतिक जगतात मिळत नाही. ते बेल पत्र आपल्या अंतःकरणात युगेन् युगे एका बुद्धीकोटात अनायासें पडुन राहाते. बेल पत्र त्राटक याच बुद्धीकोटात पडुन राहीलेल्या स्वयंभु बेल पत्राला जागृत करुन साधकाला जीवदृष्टीतुन शिवज्ञानाच्या परमतत्वाकडे आत्मबुद्धीद्वारे प्रवाहीत करते. या बेल पत्र त्राटकाची सुक्ष्मता अनूभवण्यासाठी बेल पत्राचे आपल्या देहातील अढळ अथवा शाश्वत स्थान ओळखता आले पाहीजे.

बेल पत्राचे मानवी शरीरात डोक्यावरील केसांपासुन ते पायाच्या नखांपर्यंत अणुरेणु व्यापक स्थान आहे.


आपल्या कपाळाचे भ्रुमध्य व दोन डोळे आणि नासिकाग्र मिळुन एक बेल पत्र तयार होते. हे ध्यान बेल पत्र त्राटक करते वेळी आपल्या अंतर्मनात अंतर्नेत्रस्थित भ्रुमध्य व चर्मचक्षुस्थित असलेल्या बेलपत्राची जाणीव साधनेच्या सातत्याने काही दिवसात होऊ लागते. ह्या अनुशंघाने आपल्या देहात लपलेले अनंत रहस्य ह्याच सुक्ष्मबेल पत्राद्वारे आपण ओळखु शकतो. बेल पत्र त्राटक आपली शिवसाधना काही क्षणातच आपल्या अंतर्मनाद्वारे भगवान शिवाकडे पोहोचवते. जेणेकरुन अनंगशक्तींशी आपला आत्मसंबंध प्रस्थापित होऊन आध्यात्मिक वाटचाल डोळस वृत्तीने सुरु होते.


बेल पत्राच्या तीन पानांचे स्वरुप ईडा, पिंगला व मधील पान सुषुम्ना नाडीला संबोधित आहे. ईडा व पिंगला ह्या सुर्य व चंद्र नाडी तर सुषुम्नेला ब्रम्हाण्डीत नाडी अथवा नीलसरस्वती असे संबोधतात. आपल्या बेल पत्र त्राटक साधनेतुन संबंधित सुर्य, चंद्र व सुषुम्नेचे अंतज्ञान साधकाला होण्यास सुरुवात होते. त्यायोगे चिकाटी व प्रामाणिकपणा असला पाहीजे. सुक्ष्म बेल पत्रातुन सुषुम्ना नाडीचा मार्ग प्रवाह नासिकाग्रापासुन म्हणजेच पत्र देठाच्या टोकापासुन ते मुलाधार चक्र स्थित शिवलिंगापर्यंत विस्तारलेला आहे. ह्या मुलाधारचक्रास्थानी गुद्द्वाराच्या दोन बोटांवर शिवलिंगवेष्टीत परमशक्तीशाली कुलकुंडलिनी माता साडेतीन वेटोळे घालुन महासर्पिणीच्या रुपात युगेन युगे महानिद्रीस्थावस्थेत असते.



बेल पत्र त्राटक साधनेतुन तयार झालेल्या नामाग्नी तत्वाद्वारे आपण ध्यानयोगात सहज तपून निघु शकतो. ध्यान धारणा करणे हेतु बेल पत्र त्राटक ही प्रार्थमिक पायरी समजावी. ह्या साधनेने आपण सदैव शिवलिंगाजवळ आहोत याची आत्म जाणीव होत राहाते. आपल्या देहात असलेले सत्व, रज व तम हे तीन गुण त्याचप्रमाणे आपले सत्कर्म, दुष्कर्म व अकर्म सर्व सुक्ष्म बेल पत्राशीच जोडलेले रहस्य आहेत. या रहस्यांपासुन मनुष्य आजही वंचित राहुन लाचारीचे जीवान जगत आहे.


बेल पत्र त्राटकामुळे होणारे फायदे :

  • १. स्मरणशक्तीत वाढ होते.
  • २. अंतर वासनेवर नियंत्रण येते.
  • ३. आध्यात्मिक आवड उत्पन्न होते.
  • ४. दुरदृष्टी प्रबळ होते.
  • ५. ईहलोक व पारलौकीक सामर्थ्याची जाणीव होते.
  • ६. आपल्यावर कुठूनही करणीबाधेचे प्रकार होत नाहीत.
  • ७. ज्यांवर काही बाधा असेल, अशा व्यक्तीने बेल पत्र त्राटक केल्यास बाधा नष्ट होऊन, संबंधित त्रास देणाऱ्याचे मृत्यूतुल्य हालापेष्टा होतात.
  • ८. शिवभक्तीत शिवभजानात अंतर्मन रमण्यास सुरवात होते.
  • ९. दृष्टीदोष दुर होण्यास सुरवात होते.
  • १०. बेल पत्र त्राटक सोबत शिव किंवा स्वामीं नामस्मरण केल्यास विलक्षण आनंदाची प्राप्ती होते.
  • ११. बाह्य बेल पत्र त्राटक प्रमाणेच अंतर बेल पत्र त्राटक केल्यास आत्मसाक्षात्काराचा अनुभव येण्यास मदत होते.



भगवान शिवास बेल पत्राप्रमाणेच भस्म व भांग सुद्धा अत्यंत प्रिय आहे. भस्माच्या जोरावर नाथांनी वाताकर्षण विद्येने सर्व देवी देवतांना युद्धांमधे परास्त करुन टाकले. ह्या भस्माच्या सामर्थ्याबरोबर बेल पत्र त्राटकाचाही अखंड अभ्यास नाथ महाराजांनी केला ज्यायोगे अलख निरंजन तत्वाचा जय आदेश समाजात प्रस्थापित केला. 

बेल पत्र त्राटक करण्याची विधी.

  • सर्व प्रथम एक पांढराशुभ्र कार्ड पेपर घ्या. पेपर जरा मोठा अथवा व्यापक असावा. एक कोमळ, न फाटलेले आणि स्वच्छ असे बेल पत्र घ्या. घरातील शिजवलेल्या भाताच्या दोन चार शितांने ते बेल पत्र बरोबर कार्ड पेपरच्या मधे स्थित करा.
  • हा बेल पत्रयुक्त कार्ड पेपर पुर्व किंवा उत्तरेला भिंतीवर आपल्या बैठकीच्या उंची प्रमाणे भिंतीला चिकटवा. गुडघेदुखी असलेल्या साधकांनी खुर्चीवर बसुन ही साधना करु शकता. पाठीचा कणा सरळ असायला पाहीजे. या साधनेची सुरवात क्रमाक्रमाने करावी.
  • ज्या ठिकाणी भिंतीवर बेलपत्र आहे तेथे एक तुपाचा दिवा लावावा. त्या खोलीत अंधार करुन प्रसन्न मनाच्या अवस्थेत दिर्घ श्वास प्रश्वासाने किमान ३० सेकंदापासुन ही साधना सुरु करा. क्रमाक्रमाने यथाशक्ति वेळ वाढवावी. अनुभवाचे बोल आम्हाला कळवावेत ज्या अर्थी पुढील अपेक्षित दिशानिर्देशने तत्वाच्या आधारे ठरवता येतील.
  • डोळे थकल्यानंतर काही क्षण पापण्या बंद करा. नामस्मरण पुर्ववत वाहत राहु देणे योग्य. त्यानंतर पाण्याचे हबके दोन्ही डोळ्यांवर हळूवार मारुन डोळ्यांना शांत करावं. अत्यंत साधी, सोपी व सरळ साधना असल्याने पाठवत आहे.

टिप.   दररोज नवीन बेल पत्राचा वापर करावा.


महत्त्वाची टिप...

संबंधिक साधनाक्रीया संबंधित साधना तज्ञांच्याच मार्गदर्शनाखाली कराव्यात.