श्री त्र्यंबकेश्वर ( Trimbakeshwar ) सेवा माहिती


भुवैज्ञानिक स्थान

निर्देशांक : १९.५६' उ ७३.३२' पू


त्र्यंबकेश्वरचे अक्षांश २०.२५८४ आहे. रेखांश ७३.५०३१ आहे.


बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग महाराष्ट्र राज्यात नाशिक जिल्ह्यात स्थित आहे. येथील ब्रम्हगिरी पर्वतातुन गोदावरी नदीचा उगम होतो. गौतम ऋषी आणि गोदावरी मातेच्या निवेदनास मान देऊन भगवान शिवाने या स्थानी त्र्यंबकेश्वर नावे वास करण्याचे वरदान दिले. मंदीराच्या गाभाऱ्यात एका छोट्या पोकळीत तिन लहान स्वयंभु लिंग आहेत. हे त्रिदेव अथवा ब्रम्हा,विष्णू व महेशाचे शरीर आहे.


त्र्यंबकेश्वर स्थान माहात्म्यबारा ज्योतिर्लिंगांपैकी एक त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग महाराष्ट्र राज्यात नाशिक जिल्ह्यात स्थित आहे. येथील ब्रम्हगिरी पर्वतातुन गोदावरी नदीचा उगम होतो. गौतम ऋषी आणि गोदावरी मातेच्या निवेदनास मान देऊन भगवान शिवाने या स्थानी त्र्यंबकेश्वर नावे वास करण्याचे वरदान दिले. मंदीराच्या गाभाऱ्यात एका छोट्या पोकळीत तिन लहान स्वयंभु लिंग आहेत. हे त्रिदेव अथवा ब्रम्हा,विष्णू व महेशाचे शरीर आहे.

गंगा माता, गायत्री माता, पार्वती मातेने स्तवन केलेल्या ब्रम्हगिरी पर्वत अत्यंत रहस्यममयी आहे. पंचवक्त्र शिवाचा वास असलेल्या ब्रम्हगिरी पर्वतावर सद्योजात, वामदेव, अघोर, तत्पुरुष आणि ईशान असे पाच रुद्रशिखरे आहेत. महामृत्युंजय मत्रांचे अधिष्ठीत दैवत भगवान त्र्यंबकेश्वर महादेव ब्रम्हगिरी पर्वतावर स्वयं प्रकट झाले आहेत. पुराणोक्त कथेला अनुसरून आजही दर्शनार्थींना भगवान शिवाने आपटलेल्या जटांचे स्थान ब्रम्हगिरीवर पहावयास मिळते. गंगेचे मुळ स्थान ब्रम्हगिरी आहे.


ब्रम्हागिरीवर गौतमीगंगेचे उगमस्थान आहे. औदुंबराच्या मुळाजवळ गंगा उत्पन्न झाली व गोमुखातुन वाहत असते. येथुन गोदावरी नदी तीन दिशांना वाहाते. पुर्वेस वाहणाऱ्या नदीला गोदावरी म्हणतात. दक्षिणेस वाहणाऱ्या नदीला वैतरणा म्हणतात. पश्चिमेकडे वाहणाऱ्या नदीला पश्चिम गंगा म्हणतात.


ज्योतिर्लिंगाचे मंगलयमरुप ब्रम्हगिरी आहे. भगवान शिवचे हे स्थान त्रिमुर्ती आणि त्रैलोक्यराणा म्हणुन दत्तात्रेय स्वामीं महाराजांचे सिद्धक्षेत्र म्हणुन प्रचलित आहे. कोलांबा मातेचे मंदिर ब्रम्हगिरीच्या दक्षिण दिशेला आहे.


नीलांबिका माता म्हणजेच रेणुका माता आहे. कोलांबा माता शिवशक्तीचे गंगाद्वार आहे तर नीलांबा माता ब्रम्हविद्याचे महाद्वार आहे. या दोन्ही शक्तींचे सिद्ध मातृकापीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरच आहे. 'त्रि' म्हणजे तीन, यं म्हणजे ह्दयस्थित मातृका बीजमंत्र, 'अंबक' म्हणजे नेत्र म्हणजे 'त्रिनेत्रधारी ह्दयस्थितपीठेश्वर ईशानरुद्रात्मक त्र्यंबकेश्वर भगवान महादेव '....!


महामृत्युंजय महामंत्राची देवता भगवान त्र्यंबकेश्वर आहेत. ब्रम्हनिष्ठ ऋषीमुनी हा मंत्र जपतात. गायत्रीदेवीचे हे त्रिसंध्या क्षेत्र आहे. मृत्यूसमयी तारकमंत्र उपदेश करणारी शक्ती त्र्यंबकेश्वरपीठातच स्थित आहे.


नाथसंप्रदायात त्र्यंबकेश्वरचे अनन्य साधारण महत्त्व आहे. हृया सिद्धभुमीवर नवनाथांची गुरुकृपा आहे. ब्रम्हज्ञान प्राप्तीची निर्मळ सुरुवात ब्रम्हगिरीस्थित भगवान शिवाच्या कृपाप्रसादाने होते. त्याग व वैराग्याच्या निर्विकार गुणांचे संक्रमण शिवसाधनेतुन सहज साध्य आहे. कलहशांती हेतु कुशावर्ताला तीर्थस्थानाचे महत्त्व आहे. गोदावरी नदी प्रवाह कुशावर्तातुन करते.अंजनेरी स्थान माहात्म्य...त्र्यंबकेश्वर क्षेत्रात अंजनेरी म्हणुन आध्यात्मिक महत्त्व लाभलेले हनुमानाचे जन्मस्थान आहे. भगवान शिवाचा ११ वा अवतार असलेला रामभक्त हनुमान जन्मस्थान शिवज्योतिर्लिंगाच्या अगदी निकट आहे. शिवअवतारी हनुमानाचे बालपण अंजनेरी किल्ल्याच्या सान्निध्यात गेले.


अंजनेरी पर्वतावर अंजनीमातेने पुत्रप्राप्ती वरदान हेतु भगवानशिवाची कठोर तपस्या केली. अंजनीमाता गतजन्मातील एक शापीत अप्सरा होती. पुत्रप्राप्तीनेच अंजनीमातेच्या शापाचे निराकरण होणार होते. हनुमानाचे वडील वानरराज केसरी हे बृहस्पतीचे चिरंजीव, त्यांनी भगवान रामाची रावणाविरोधात युद्धात मदत केली होती.


अंजनीमाता आणि वानरराज केसरी यांनी भगवान शिवाची तपस्याकरुन पुत्रप्राप्तीचे वरदान मागीतले. भगवान शिवाने त्यांना मनोवांछित फळ देऊ केले त्यायोगे शिव अवतारी हनुमानाचा जन्म झाला.


दत्तप्रबोधिनी आध्यात्मिक सेवा ट्रस्टच्या माध्यमातुन दर महीन्याच्या ५ तारखेला सामुहीक स्तरावर अंजनेरी येथे दिनसेवा आणि श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे रात्रसेवा केली जाते.सेवा उद्दिष्टे...


 • १. स्वआत्मबळ वाढवणें. शिवस्वामीआत्मानुसंधान करुन आपलं जीवन सार्थक करणें.
 • २. सत् पात्री दुःखी पिडीत लोकांना स्वामीअनुभूतीच्या माध्यमातुन कोणतेही अर्थकारण, राजकारण आणि दंभकारण न करता सामुदायिक स्वामीमय सेवेच अनन्यसाधारण महत्त्व पटवुन देणें. यथाशक्ति सद्गुरु स्वामींमहाराजांचा हेतु आणि व्याप्ती समजावुन देणे.
 • ३. केंद्र, मठ आणि मंदिराच्या संकुचीत मनोवृत्तीत न अडकता आणि कोणत्याही अज्ञानी मंडळाच्या राजकारणाला बळी न पडता, त्यातुन बाहेर पडुन घरगुती प्रश्न, आध्यात्मिक प्रश्न, पर्यावरण संतुलनाचा प्रश्न आणि राष्ट्रहीत सुरक्षेच्या प्रश्नांवर सद्गुरुकृपे उपायाहेतु एकत्र येऊन सामुदायिक स्वामीमय रात्रप्रहर सेवा करणें.सेवा अधिष्ठान...

 • १. आत्मअवलोकनात्मक स्वामीमय त्रिकालसंध्या करणें.
 • २. आत्मबळ वाढवणें हेतू सद्गुरुस्वामीं अधिष्ठानाचा स्वगृही न्यास करणें.सेवा धोरणें...


 • १. सामुदायिक स्वामीमय सेवा विनामुल्य आहे.
 • २. सद्गुरु स्वामीमहाराज आणि त्यांच्या भक्तगणांमध्ये कोणतेही प्रकारचे माध्यम नाही. साधकाचे सर्व चित्त गाभाऱ्यात असायला हवे.

सेवा नियोजन...


सामुहीक सेवा नियोजन स्वरुप खालीलप्रमाणे...

 • दिनसेवा: श्री क्षेत्र अंजनेरी
 • रात्रसेवा: श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर

घरगुती प्रश्न - ( पितृदोष, वास्तुदोष, नकारात्मक ऊर्जे संबंधित )
आध्यात्मिक प्रश्न - ( नामस्मरण, आत्मपरायण आणि सद्गुरु सेवा संंबंधित )

स्वामीमय सेवेत.... अनुक्रमे


️बाहेरील बाधा, ️वास्तुदोष, ️प्रखर पितृदोष, घरातील देवारा आणि संरचना️, आध्यात्मिक उपासना यांबद्दल विनामुल्य मार्गदर्शन उपलब्ध आहे . • सेवेकरीता निघण्याची वेळ. सकाळी ७.३० वाजता.
 • नाश्ता,चहा आणि जेवण प्रवासा दरम्यान होतो.
 • अंजनेरी नाशिक येथे सामुहीक नामस्मरण व पारायण.
 • विनामुल्य वास्तुदोष निवारण मार्गदर्शन
 • प्रश्न उत्तरे  व नित्य उपासना मार्गदर्शन
 • अंजनेरी येथुन सुमारे दुपारी ४.३० वाजता बसेस त्र्यंबकेश्वरसाठी रवाना
 • संध्याकाळी कुशावर्तस्नान व ज्योतिर्लिंग दर्शन
 • रात्री ७.०० वाजता महाप्रसादरात्री ८.०० वाजता सामुहीक मंत्र जप व पारायणाच्या माध्यमातून रात्रसेवेला आरंभ. 

रात्रसेवा सकाळी ३.०० च्या सुमारास पुर्ण होते. सकाळी ७.०० वाजेपर्यंत बसेस प्रारंभस्थानी पोहोचतात.

दत्तप्रबोधिनी आध्यात्मिक सेवा ट्रस्ट माध्यमातुन दर महीन्याया ५ तारखेच्या स्वामीसेवेसाठी मुंबई, ठाणे, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, सुरत, वापी येथुन विशेष बससेवा नियोजन केले जाते.

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

पितर साधना, पितृदोषांवर ( Pitra Dosh) दुर्लभ माहीती व रहस्य उजागर - Real unknown secrets explained

पितृदोषांबद्दल संवेदनशील आणि दैनंदिन जीवनाशी जोडलेलें दुष्प्रभाव ...!

सर्व स्वामींशिवभक्तांसाठी अद्वितीय शिवसाधना पद्धती...!!!

शिव साधना ( Shiv and Evil ) व पिशाच्चशक्तीसंबंधी सुक्ष्मज्ञात वास्तविकता...!


संपर्क : श्री. कुलदीप निकम
भ्रमणध्वनी : 9619011227

GET FRESH CONTENT DELIVERED BY EMAIL:


FOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीतीCure Problems With Divine Powers. 100s Of People Cured ! Chakra Healing balancing. Ancient Indian Science. Based on Ashtaang Yog. Learn Yogic Healing. Types: Learner's Workshops, Stress Management, Divine Karma Cleansing, Mind empowerment, Chakra Balancing. - Visit Website Here !


Embed दत्तप्रबोधिनी न्यास on Your Site: Copy and Paste the Code Below0