पितर साधना, पितृदोषांवर ( Pitra Dosh) दुर्लभ माहीती व रहस्य उजागर - Real unknown secrets explained


आपण पितरांना विसरतो व त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात. जे पितरांच स्मरण करतात अथवा श्राद्ध आदी कर्मे करण्याचे नियोजन करतात ते संसारीक लोक धार्मिक घुसखोरांकडुन लुटले किंवा लुबाडले जातात. अशा दोन्ही बाजुने उद्भवणार्या पेचप्रसंगातुन कसा मार्ग काढता येईल यावर आम्ही सर्व बाजुंनी विचार विनिमय करुन पुढील साधन आख्यायिका मांडत आहोत.



देवऋण, पितृऋण आणि ऋषीऋण ( देवतानां पितृणांच ऋषीणांच तथा नरः ) यापैकी पुजाअर्चा, व्रते, उपवास ई. मार्गांनी मनुष्य देवऋणातुन मुक्त होतो. सद्गुरुसेवा, नामस्मरण या मार्गांनी ऋषीऋणातुन आणि श्राद्ध व पितृपुजनातुन पितृऋणातुन मुक्त होतो. पितरे ही ईतर कोणीही नसुन वंशपुर्वज आहेत. जे काल आणि अकाल मृत्यूनंतर पिशाचयोनीत प्रवेश करतात. मृत्यूपश्चात भस्म झालेल्या स्थुल देहाचे संस्कार विधीवत पुर्ण केल्यानंतर जीवात्म्याचे लिंगदेह व आत्मा असे विभाजन होते.


संजीवन विद्येप्रमाणे कोणत्याही देहाने कालमृत्युअंतर्गत प्राणत्याग केल्यास सर्वप्रथम तो आत्मा ते शरीर सोडून देतो व त्या नंतर देहात असलेले ईतर ११ रुद्र एकामागून एक शरीर त्याग करतात. या सर्व प्रक्रियेत लिंगदेह तेथेच देहांतर्गत स्थित असते. विधीवत प्रेतसंस्कारोत्तर संबंधित प्रेताचा प्रेतयोनी म्हणजे काक योनीत जन्म होतो.


आत्मा अमर, अविनाशी असल्यामुळे तो आपल्या अंर्तबाह्य देहात वास करुन आपल्या मार्फत स्वतःची वासना तृप्त करवुन घेण्याचा प्रयत्न करतो. असेही पाहाण्यात आलं आहे की, हेच पितरं घराला संपवण्यावर उतावीळ असतात. त्यायोगे घरातील सदस्यांचे मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक व आध्यात्मिक खच्चीकरण केले जाते. काही प्रकरणात मृत्यू ही ओढावला जातो.


या पुर्वज पितरांमधे सर्वप्रकारच्या पिंडाचे आत्मे उपस्थित असतात. ही संख्या हजारांमधे असते. त्यापैकी काही शांत तर काही बरेच अशांत ही असतात जे आपल्या भौतिक अडचणींना कारणीभूत असतात. या सर्व अतृप्त समुदायाला शांत करण्यासाठीच श्राद्ध आणि पितृपुजन केले जाते.



श्राद्धची व्याख्या अशी आहे - ' श्रद्धाया यत् क्रियते तत् क्रीयते यत् श्राद्धम् ' याचा अर्थ असा की,' श्राद्ध हे श्रद्धापुर्वक करायला हवे. पितरांचा काळ हा मध्यान्ह काळानंतरचा असतो. त्यांना तीळ, वस्त्र, फळ, मुळ व तंडुल सामग्रीने तर्पण करावेत. त्यायोगे ते तृप्त होतात.

याच्या उलट एखाद्याने श्राद्ध केले नाही तर देहाला आतोनत यातना भोगाव्या लागतात. त्यात कुळाला आरोग्य राहत नाही. तसेच वीर, कर्तबगार व पुरुषार्थसंपन्न पुरुष निर्माण होत नाहीत. तो आरोग्यसंपन्न व दिर्घायुषी होत नाही. काही लोक श्राद्धऐवाजी संस्थांना देणगी देतात पण ही गोष्ट शास्त्र संमत नाही. श्राद्धाचे फळ आणि पितरांची तृप्ती त्यायोगे प्राप्त होणार नाही. श्राद्धाच्या योगे प्रेत, पिशाच्च योनी प्राप्त झालेल्या जीवांचाही उद्धार होतो. यासाठी गरुड पुराण व वामन द्वादशी हे ग्रंथ पहावेत.


श्राद्धविधीने मृतात्म्यांना गती मिळते. पितरांना पिंड प्रदान करुन पुजा केल्यानंतर त्यातला मधला पिंड ' प्रसाद ' म्हणुन पत्नीने प्राशन केल्यास संतती प्राप्तीचे योग होतात. ज्यांना परीस्थीतीमुळे श्राद्धकर्म करणे शक्य नसेल अशांनी दक्षिणदिशेकडे पाहुन पितरांना नुसता भक्तीभावाने नमस्कार केला तरी तो त्यांना पोचतो व ते तृप्त होतात.


पितरांना तर्पण करण्याचा सोपा उपाय विनंती स्वीकारुन देण्यात येईल कारण हा उपाय करत असताना श्राद्धविधी चालू ठेवला असला पाहीजे.



ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...



0