ब्रम्ह अंतःकरण कसे बनते ? अनुकरणशील स्वतंत्र सद् मार्ग - Step by stepसंसारीक जीवनातील दैनंदिन जीवनात अतोनात कष्ट सहन करुन शिल्लक राहीलेल्या वेळात अत्यंत प्रभावकारक आध्यात्मिक अभ्यास होणे हेतु अतिशय सहज, सोपी व सुलभतने अंगीकारता येईल अशी स्वामीमय अंतःकरणात्मक मानसिक आत्मयोग स्वतंत्र साधना दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट माध्यमातून प्रकाशित करत आहे. त्यायोगे स्वतःचे आध्यात्मिक अस्तित्व तर सहज द्विगुणीत होईलच त्याच बरोबर आत्मबळात अनायासे होणारी वाढही अनुभवास येईल.


संसारीक जीवनातील दैनंदिन जीवनात अतोनात कष्ट सहन करुन शिल्लक राहीलेल्या वेळात अत्यंत प्रभावकारक आध्यात्मिक अभ्यास होणे हेतु अतिशय सहज, सोपी व सुलभतने अंगीकारता येईल अशी स्वामीमय अंतःकरणात्मक मानसिक आत्मयोग स्वतंत्र साधना दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट माध्यमातून प्रकाशित करत आहे. त्यायोगे स्वतःचे आध्यात्मिक अस्तित्व तर सहज द्विगुणीत होईलच त्याच बरोबर आत्मबळात अनायासे होणारी वाढही अनुभवास येईल.

मानवी शरीर सर्व रहस्यांनी युक्त असे साधन यंत्र आहे. योग तंत्रातील सर्व यंत्र साधनांमधे मानवी देहाचे साधनेच्या दृष्टिकोनातून अग्रणिय अभेद स्थान आहे. आध्यात्मिक जीवनत सर्व प्रकारच्या बुद्धीवादी मानवी देहांचा सहजच समावेश होतो. अत्यंत हुशार व्यक्तीमत्व असो अथवा मतिमंद बुद्धी जीवनगाथा असो, आध्यात्मिक जीवनात एकदा प्रज्ञेच्या माध्यमातून आत्मबुद्धी स्फुरायला सुरवात झाली की, स्वतःहुन नामस्मरण होऊ लागते. अशाप्रकारे मानवाची बाह्यस्थिती अंतर्मनाला फार काळ जखडुन ठेवु शकत नाही. आवश्यकता आहे तर फक्त सातत्य, संगत व चिकाटीची...! जेणेकरुन चित्त तन्मयता भगवद् चरणी सहजच अर्पण होऊ शकेल.


आध्यात्मिक मार्गात सर्वात मोठी अडचण म्हणजे बर्हीमनाची न थांबणारी चंचलता. आपल्या बर्हीमनाचा प्रत्यक्ष संबंध आपल्या श्वासोच्छ्यवासाशी असतो. श्वासोच्छ्यवासाची क्रिया जितकी जोरात आणि अनियमित होणार, तितकेच मनही चंचल व व्याधी उत्पन्न करणारे ठरणार. कासवाचे भौतिक व आध्यात्मिक जीवन पुजनीय आहे. भौतिक जीवनात अत्यंत मंद गतीने श्वासोच्छ्यवास करत असल्यामुळे त्याचे जीवन सर्व योनींच्या तुलनेत जास्त असते. आध्यात्मिक जीवनात कासव अंतर्मुखी जीवन व्यतीत करणारा व स्वतःच्या पाठीवर संसारीक जीवनातील आत्मसाराचा सुमेरु पर्वत उचलणारा योगी साधक स्वरुप असल्याने परम पुजनीय आहे. या उलट माकडाचे जीवन भराभर श्वासोच्छ्यवास घेतल्यामुळे अल्पायुषी व चिंताग्रस्त असते. ह्यातील भेद ओळखुन आपल्या हितोपयोगी राजहंसाची आत्म चाल करता आली पाहीजे.


अंतःकरणाचे आत्मविश्लेषण


प्रथम मानसिक चरणात मानवी बर्हीमन व मानवी बुद्धीचा समावेश होतो. मनुष्य जन्माला आल्यापासुन ते मरेपर्यंत बर्हीमन व बुद्धीच्या न कळणार्या अशा अंतरात नाचत असतो आणि कालांतराने मृत्युला प्राप्त होतो. अशा बर्हीमन व बुद्धी यांमधील अंतर नष्ट करता आले पाहीजे. बाह्य मनाची चंचलता फक्त आध्यात्मिक गोडीनेच क्षीण होऊ शकते. त्यायोगे बाह्यमन हळुहळु बुद्धी निकट अर्थयुक्त नामस्मरण माध्यमातून आणण्याचा प्रयत्न करावा. कोणत्याही प्रकारची आतिशयोक्ती करु नये. बाह्यमन हे बुद्धीच्या अतीत म्हणजे पलिकडे असते. नामस्मरण आणि ज्ञानसंचित कर्माच्या माध्यमातून बाह्यमन बुद्धीच्या अधीन आणावे. ही क्रीया आपल्या प्रामाणिक व पारदर्शक स्वामीईच्छ्या शक्तीवर अवलंबुन आहे. जेव्हा बाह्य मन व बुद्धी ऐकामेकांत विलीन होतात ते अंतःकरण बनते.


भक्ती हे बाह्यमनाचे कार्य आहे. अशी भक्ती फार चंचल असते. अथवा न टिकणारी, कधीही कोणत्याही कारणाने मोडली जाणारी असते. ज्ञान हे बुद्धीचे कार्य आहे. नामस्मरण, ग्रंथ वाचन आणि संचित ज्ञानकर्माच्या जोरावर बाह्य मनाधीष्ठीत भक्तीला बुद्धीच्या जोरावर अंतर्मुखी करावेत. त्यायोगे मन बुद्धीच्या अधीन येते आणि खर्या अर्थाने मनुष्य आध्यात्मात डोळस वृत्तीने न लडखडता सावध, तठस्थ राहु शकतो. संंबंधित योगक्रियेच्या नियमित सरावाने बाह्यमनाला अधीन करणाऱ्या बुद्धीचे भक्ती व ज्ञानाच्या विलिनीकरणाने सद्बुद्धी प्रकट होऊ लागते. हीच सद्बुद्धी आपल्या आत्मसमर्पणाद्वारे श्री स्वामी समर्थ महाराज स्वतः आपला उद्धार व्हावा या हेतुने आत्मनियंत्रित करतात.
ज्याप्रमाणे ज्ञान हे बुद्धीचे कार्य आहे. भक्ति हे मनाचे कार्य आहे. तसेच भावना हे अंतःकरणाचे कार्य आहे. अंतःकरणाच्या सद्बुद्धी आचरणातुन भावनेचे सद् भावनेत आत्मावलोकन होते.

याची पुर्णत्वाने भावना बाळगणे म्हणजे दत्त महाराजांना अपेक्षित असलेल्या नवविधा भक्तीतील दुसरे चरण ' कीर्तन ' करणे असा आहे. ह्याच नामस्मरणयुक्त किर्तनातुन साधकाची आध्यात्मिक प्रगती उत्तरोत्तर होत असते. संबंधित नवविधा भक्तीचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत.

१. श्रवण... २. किर्तन....३. नामस्मरण.... ४. पाद सेवन... ५. अर्चन...६. वंदन.... ७. दास्य.... ८. सख्य.... ९. आत्म निवेदन


सर्वात सोपा व संसारीक माणसाला सहज जमण्यासारखा परम पावन दत्तभक्तीमार्ग कधीही कठीण नव्हता आणि आजही नाही. याउलट संसाराची दिशाच सर्वात कठीण आहे. सद्बुद्धी अधीन आलेल्या बाह्यमनाच्या लयानंतर प्रकट होणाऱ्या सद् भावनायुक्त अंतःकरणाचे, योगीजानांचे दिव्य लक्ष्य असलेल्या भगवद्मय अंतःकरण होण्यासाठी क्रमाक्रमाने नवविधा भक्तीतील पुढील चरण गाठावे लागते. असे भगवत्मय अंतःकरण आत्मबुद्धीगुहेत स्थित असते. सद्बुद्धी म्हणजेच आत्मबुद्धी समजावं. अशा भगवत्मय अंतःकरणातच आत्म्याचा बोध होतो.


आत्मबोधातुनच दत्त महाराजांना अपेक्षित असणारा साधकाला दास बोध होतो. ईतर कोणताही दुसरा मार्ग ईतका सहज आणि सरळ असा उपलब्ध नाही.


अशाप्रकारे आपण भक्तीमार्गाद्वारे नामसंकीर्तन करत क्रमाक्रमाने अंतःकरणाच्या पायवाटेने दत्त दरबार स्थित आत्मगुहेतील भगवत्मय अंतःकरण सद्गुरु चरण ह्दयी घट्ट धरुन पोहोचु शकण्यात तत्पर असल्यास दास्यभक्तीतील मुक्ती चतुष्टय नाम धारणा फार अंतरावर नाही. ते तर महाराज स्वतः हुन अनुग्रहाच्या माध्यमातुन संबंधित साधकाच्या अभिव्यक्तीला परिचालीत करतात.ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...पितृदोषांबद्दल ( Pitra dosh ) संवेदनशील आणि दैनंदिन जीवनाशी जोडलेलें दुष्प्रभाव ...!


संपर्क : श्री. कुलदीप निकम
भ्रमणध्वनी : 9619011227


GET FRESH CONTENT DELIVERED BY EMAIL:


FOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीतीAll about Swami Samarth, Real unknown secrets, Step by step Spiritual Growth explained, Build your soul, Boost your life on top. - Visit Website Here !


Embed श्री स्वामी समर्थ योग व गहन आध्यात्मिक मार्गदर्शन on Your Site: Copy and Paste the Code Below