श्री स्वामी समर्थ योग व गहन आध्यात्मिक मार्गदर्शन: संसारीक लोकांसाठी अनुभवसिद्ध व सोपी मानस पुजा- १ ( Easy Meditation - 1 )- Simple and Easy SEO

 स्वामी साधक सदस्यता घेऊन "दत्तप्रबोधिनीकर" व्हा...!

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu
LIVE सुरु असलेले वाचन
चालु आठवड्यातील वाचलेली निवडक लिखाणे
चालु महिन्यातील वाचलेली निवडक लिखाणे

सोमवार, १६ मे, २०१६

संसारीक लोकांसाठी अनुभवसिद्ध व सोपी मानस पुजा- १ ( Easy Meditation - 1 )- Simple and Easy


जीवन संग्रामात बहुतेक साधकांना दिवसाभराच्या नियोजनातुन वेळे अभावीही उपासना, ध्यानयोग साधना करणे शक्य आहे. दैनंदिन कर्म अथवा व्यवहाराच्या आड न येणाऱ्या तीन साधनांपैकी प्रथम साधनेचा प्रपंच करत आहे. याआधारे दैवीशक्तींचा अनुभव येणे सहज शक्य आहे.

या साधनांवर परिपुर्ण विश्वास व श्रद्धा ठेऊन साधकांनी दैवी सान्निध्यात वाढ करुन सुखी व्हावे, या सद्भावनेने मी त्या प्रकट करत आहे. साधना अगदी सोप्या व सहज करता येण्यासारख्या आहेत.


जीवन संग्रामात बहुतेक साधकांना दिवसाभराच्या नियोजनातुन वेळे अभावीही उपासना, ध्यान व योग साधना करणे शक्य आहे. दैनंदिन कर्म अथवा व्यवहाराच्या आड न येणाऱ्या तीन साधनांपैकी प्रथम साधनेचा प्रपंच करत आहे. याआधारे दैवीशक्तींचा अनुभव येणे सहज शक्य आहे.


महत्वाची टिप -

संबंधित साधना धारण काळात आपल्या सद्गुरु महाराजांचे स्मरण करणे अतिशय उत्तम...! मनात किंतु परंतु अथवा क्लेशमात्र संदेह बाळगू नये. आपले दैनंदिन जीवन आपल्या आत्मसमर्पणाच्या माध्यमातुन महाराजांच्या आधीन होऊन आपल्या सर्वांचा आत्मोद्धार होईल, या आशेनेच सहज साधना प्रकाशित करत आहे. कृपया साधन काळात आपला स्वभाव होकारार्थी ठेवणे महत्वाचे...!!!

साधना क्रमांक - १ "धारणा"

या साधनेला केव्हाही सुरुवात करता येईल. साधारणतः १ ते १५ तारीख, अमावस्या ते पौर्णिमा असा काळ ठरवल्यास उत्तम. ही साधना साधकांनी फक्त सुरवातीस १५ दिवस करुन पहावी. स्वअनुभव आला तर पुढे चालू ठेवण्यास काहीच हरकत नाही.

सुरवातीच्या दिवशी असा विचार ठेवावा की, आज पासुन पंधरा दिवस मी काहीही संकल्प विकल्प करणार नाही, अमुक गोष्ट घडो व अमुक गोष्ट न घडो, असा विचार ही मनात ठेवणार नाही. माझे जीवन ईश्वराच्या आधीन आहे. तो जसे ते घडविल त्या बाहेर मी जाऊ शकणार नाही.

माझ्या सर्व चिंता, काळजी भीती मी ईश्वर चरणी ठेऊन मुक्त झालो आहे. गतकाळाची आठवण करणार नाही. उद्याची चिंता करणार नाही. ते सर्व ईश्वरा आधीन आहे. कार्यसिद्धीसाठी व आपल्या ईच्छ्या पुर्ण होणे हेतु माझी आसक्ती व्यर्थ आहे. परमेश्वर माझे जीवन जसे घडवत आहे, तेच माझ्या जीवनाला पोषक ठरणार आहे. असे विचार रात्रंदिवस मनात घोळवा.

याचा अर्थ तुम्ही निष्क्रिय व्हा असे नाही. तुम्ही तुमचे कार्य, प्रयत्न व कर्म करत रहा. मात्र हे कार्य आणि प्रयत्न तुमचा संकल्प नसुन ईश्वरी प्रेरणा अथवा संकल्प आहे असं धारण करा.

याचेच नाव " कर्मण्येवाधिकारस्ते अस्तु " अशा अवस्थेत जीवनावरील महान दडपणे नष्ट होतात. तुम्ही आपले जीवन परमेश्वराअधीन केल्यावर काय घडणार नाही...? अनुभव घेऊन पाहावाच...!

म्हणुन संत कबीर म्हणतात...

दुख मे सब सुमिरन करें l सुख में करे न कोय़ ll
जो सुख मैं सुमिरन करें l दुख काहे को होय ll

संबंधित ध्यानसिद्धी अनुसरुन सविस्तर, अधिक सखोल, गहन व कुठेही उपलब्ध नसलेली विशेष आध्यात्मिक साधना माहीती लिंक स्वरुपात खालीलप्रमाणे उपलब्ध आहे. दिलेल्या विशेष लिंकचा पासवर्ड हटवण्यासाठी संस्थेत सक्रीय सभासद होणे आवश्यक आहे.

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...५.नाथपंथातील प्रसिद्ध ध्यानयोग साधना - १

संपर्क : श्री. कुलदीप निकम
भ्रमणध्वनी : 9619011227

GET FRESH CONTENT DELIVERED BY EMAIL:


FOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती

 स्वामीसभासद नोंदणी प्रार्थमिक अर्ज