संसारीक लोकांसाठी अनुभवसिद्ध व सोपी मानस पुजा- २ ( Easy Meditation - 2 )


गेल्या एक वर्षापुर्वी नासाने ( NASA ) सुर्यातुन ऐकु येणाऱ्या सुक्ष्म ध्वनी लहरींचा शोध लावला. या ध्वनीं लहरींतुन स्पष्टपणे अनाहत नाद अर्थात 'ॐ' कार उच्चारण असल्याचे स्पष्ट झाले. ही गोष्ट नासासाठी नवीन जरी असली तरी आपल्या हिंदू वैदिक ग्रंथामधे याची स्पष्टोक्ती हजारों वर्षांपुर्वीच केली होती.

या सुर्यातुन निरंतर उच्चारल्या जाणाऱ्या ॐ अनाहत नादाच्या प्रतिसादाला साद देणारी एक अतिशय सोपी साधना आज प्रपंच करतो. ही साधना ईतकी सोपी आहे की तिला ३ मिनीटांपेक्षा जास्त वेळही लागत नाही. सकाळी ६ ते रात्री ९ पर्यंत, दिवसाभरात ठरलेल्या मोकळ्या वेळेत फक्त नामस्मरणाच्या माध्यमातुन जास्तीतजास्त ३ मिनिटे द्यावी लागतात. हातात रुद्राक्ष अथवा कोणतीही माळ असली किंवा नसली तरीही चालेल. चित्तलयाला अनुसरुन सहभाग अपेक्षित आहे.


महत्त्वाची टिप - 

संबंधित साधना प्रखर उर्जादायिनी आहे. सुरवातीस ३ मिनिटांच्या अनुशंघाने मन एकाग्र करावेत. साधना मंत्र महारुद्र व भगवान शंकराच्या पाचव्या अवताराचा आहे. त्याचा मानसिकच जप करावा.


साधना क्रमांक - २ "धारणा"

मनात "नाम धारणा कशी करावी ?

सकाळी सहा वाजल्यापासुन ते रात्री नऊ वाजेपर्यंत दर तीन तासांनी पृथ्वीतलावरुन "अनाहत रुद्र नादोक्त ब्रम्हांडीय नामप्रवाह" हजारो साधकांच्या माध्यमातुन आपण "आत्मा" ते सुर्यस्थित "परमात्मा" यांमधे ब्रम्हांडीत उर्जेच्या रुपात फार मोठ्या प्रमाणात प्रवाहीत होत आहे. त्या प्रवाहात कोणत्याही ईच्छ्या आकांशा न ठेवता मीसुद्धा सहभागी होत आहे. अशी प्रबळ धारणा तयार करा.


"सुर्यलोकस्थित थोर सिद्ध महासिद्धपुरुषांना आपली आत्मजाणीव पोहोचणे हेतु मी साधना करीत आहे, या सुदृढ भावनेने पुर्ण श्रद्धा आणि विश्वासाने मानसिक सेवा स्वतः दत्त महाराजच करवुन घेत आहेत" अशी धारणा करा. सुरवातीस एक महीना ही नामसाधना करुन अनुभव घ्या.


आपण सर्व भुतलावरील नश्वर जीव आणि सुर्यस्थित परमेश्वर शिव यातील अंतर भरुन काढणे हेतु ही साधना आज प्रकाशित करत आहे. 


आपली नाळ अर्थात आपल्या आत्म्याची नाळ त्या सद्गुरु दत्तात्रेय स्वामींमहाराजांच्या चरणकमळांशी असलेल्या परमात्म्याशी जोडलेली असते ती गाठ ब्रम्हगाठ होणे हेतु ही सुक्ष्म साधना लिहीत आहे.


साधना नाम मंत्र व विधी -

दररोज सकाळी ६ वाजल्यापासुन ते रात्री ९ वाजेपर्यंत दर तीन तासांनी फक्त तीन मिनिटांसाठी खालील धारणायुक्त नाममंत्र जप करणे

नाम मंत्र... ll ॐ काळभैरवाय नमः ll
  • सकाळी... ६ वाजता
  • सकाळी... ९ वाजता
  • दुपारी... १२ वाजता
  • दुपारी... ३ वाजता
  • संध्याकाळी... ६ वाजता
  • रात्री... ९ वाजता ठिक

सामुहीक प्राथनेसाठी स्थानबंधन नाही. सामुहीक प्रार्थनेसाठी परिस्थितीबंधन नाही. सर्वच साधनावेळा दररोज १००% पाळल्या जाव्यात असेही बंधन नाही. यथाशक्ती जे सहज शक्य आहे तसे करणे.

मानस पुजा संबंधित पोस्टस् पहा.

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...
0