घरातील देवघर व देव पंचायतन आधिष्ठान - २- Read right Now https://youtu.be/PQRcTt3H7HU


वास्तु पुरुष, मुळ पुरुष व कुळातील देव पुरुष आपल्या आराध्य दैवतांसोबत ब्रम्हांण्डीय पंचायतन दैवी शिष्टमंडळाच्या नियमांतर्गत सद्गुरु महाराज कृपेने घरातील देवघर स्थापित केल्याशिवाय आध्यात्मिक सुक्ष्म स्पंदनांचा अविर्भाव होणे कठीणच आहे. घरातील देव्हारा संरचनात्मक पद्धतीनेच असणे महत्त्वाचे आहे. ज्याप्रमाणे चार भिंतींमध्ये वादविवाद, द्वेष, रोष असणे स्वाभाविक आहे त्याचप्रमाणे ब्रम्हाण्डीय लोकात देवतांमधेही वादविवादांची वर्णि सुरुच असते. त्यांचे प्रतिसाद प्रतिमा पुजनेच्या माध्यमातून संंबंधित घरात प्रभाव करतात.


घरातील देवघर कसं असु नये ?

देव्हारा संरचनेचे शास्त्र आज लुप्त झाले आहे. माझ्या नजरेत फक्त बोटांवर मोजण्याइतकीच नियमांतर्त्मगत आत्मसंरचना असलेले देवघर पाहाण्यात आहेत. ज्याप्रमाणे आपल्या देहातील आत्मा व लिंगदेह स्थुलदेहाचे दैनंदिन कर्म ( निद्रा, अन्नपचन, विचारशक्ती, उर्जा संक्रमण ई. ) व्यवस्थितपणे बजावत असतात. त्याचप्रमाणे घरातील देवारा आपल्या चार भिंतीतील व्यवहार आपल्या कर्मविधानाला अनुसरुन नित्य सक्रिय असतो. ही सक्रीयता अनुभवास येणे व त्यात उत्तरोत्तर वाढ होणेसाठी देव्हारा योग संरचनात्मक असणे महत्वाचे आहे. आपल्या घरातील वातावरण, संबंधित सदस्य व वास्तु भारणे यांचा घनिष्ठ संबंध योग देव्हारा संरचनेत येतो. त्याचप्रमाणे आपल्या कुलदेवतेचा आपल्या घराच्या वास्तुशी असलेले ऋणानुबंध उत्तरोतर चांगले राहावेत यासाठी देवघराची जबाबदारी अत्यंत गंभीर आणि अवलोकनात्मक आहे.

माझ्या पाहाण्यात काही घरांमधे कमी जास्त प्रमाणात संचरनात्मक त्रुटी तर काही घरांमधे देवघरात अतिशयोक्ती पाहाण्यात आली. परिणामी घरात दारिद्रय, कटकट, अडचणीं, अशांती, घुसमट, काळी सावट, निराशावादी आचरण व चैतन्याचा अभाव अशाप्रकारचे अनूभव पाहाण्यात आले. संंबंधित अनुभवांची कारणे इतरही दोष असतील परंतु अंधार साम्राज्यात एकमात्र आशेचा किरण समल्याजाणार्या दिपज्योती प्रकाशाची मंद जाणीव अंधाराला स्वतःवर अधिराज्य स्थापित करवुन देते. त्यायोगे घरात दुःखांचा डोंगर साचायला लागतो. अशा परिस्थितीत देवघरासंबंधी कायं टाळावं याबाबत निवडक माहीती खालीलप्रमाणे देत आहे.


  • १. लाकडी देवारा बसवु नये.
  • २. देवघरास कधीही सहा कोपरे असु नयेत
  • ३. स्टील अथवा लोखंडी देवारा बसवु नये.
  • ४. बाहेरुन आणुन आवडत असलेली प्रतिमा अथवा मुर्ती देवघरात बसवु नये
  • ५. लाल रंगा व्यतिरिक्त इतर कोणत्याही वस्त्रांचा वापर करु नये.
  • ६. देवघरातील मुर्तीची उंची जास्तीतजास्त चार अंगुल असायला हवी.
  • ७. फोटोंचा व मुर्तींचा बाजार मांडु नये.
  • ८. देवघर भुमीशायी असल्यास जागृतीकरणाहेतु फारच सोपे असते.
  • ९. घरातील देवघरास कळसयुक्त छप्पर असु नयेत. वरील भाग मोकळा असावा.
  • १०. देवारा भिंतीवर लटकवु नये.


देव पंचायतन आधिष्ठान
संसारीक लोकांसाठी देवघर रचनेतील देवपंचायतन हा प्रमुख योग अंग समजावा. ह्या योग अंगात पाच देवतांचा समावेश विशिष्ट दिशा अनुसरुन होत असतो. संबंधित देवपंचायतन देवी देवता खालीलप्रमाणे आहेत.


ह्या देव पंचायतन पैकी बाळकृष्ण व अन्नपुर्णा मातेची लहान धातु मुर्ती विवाह प्रसंगी महीला वर्गांना त्यांच्या माहेर पक्षाकडून मिळण्याची प्रथा आहे. आदिबुद्धीचा दाता श्री गणपती, चैतन्यमयी शिवलिंग व सद्गुरु महाराजांच्या सेवेचे अवलोकन सासरकडील पक्षाची भुमिका असायला हवी. हे एक प्रकारचे आत्म संतुलन प्रारंभिक अवस्थेतील महत्त्वाचे योग अंग आहे. भारतीय संस्कृतीत अशाप्रकारेच नवीन संसाराची सुरवात दैवी कृपेने होते. ईतर मनोमार्गी कारभार खड्यात पाडायला कारणीभुत होतात. याची दक्षता घेणे आवश्यक आहे.


देव पंचायतनयुक्त देवद्रव्य

समाजात संधीसाधु, पाखंडी आणि अतिशय धुर्त आध्यात्मिक आवरण घेतलेल्या समाज कटकांनी देवद्रव्य नावाची परिभाषा बदलुनच ठेवली आहे. त्यायोगे संबंधित देवद्रव्य सत्कर्म स्वतःच्या चार भिंतीतच करणे योग्य आहे. देवद्रव्य म्हणजे आपल्या कर्म फळाचा काही अंश भगवत् आधिष्ठानाला अर्पण करणे. देवाचा भाग हडप करुन स्वतःच्या कमाईतुन पक्वान्न बनवुन खात असेल तरी देखील तो पापच खातो. मग इतर धर्माच्या व आध्यात्मिक वचनाच्या नावाने गिळले जाणारे पाप श्री स्वामी समर्थ महाराज कधीही पचु देणार नाहीत. सुंदराबाईच्या द्युत कर्मामुळे जीवनअंती हातात बेड्याच पडल्या. त्यायोगे श्री स्वामी समर्थ नावाने आपण कितीही फसवेगिरी केली आणि डोळे बंद करुन नामस्मरण दाखवले, तरी महाराजांच्या कोपाने संबंधित पापकर्मी व त्यांचेसोबतचे लागेबांधे नरकातच पडणार यात काही दुमत नाही.


मिळवले नाही ते मिळवण्याची ईच्छा ठेवली पाहीजे, जे प्राप्त केले आहे त्याचा क्षय होणार नाही ह्या रीतीने त्याचे रक्षण केले पाहीजे, रक्षिलेले वाढवले पाहीजे व वाढलेले तीर्थातच खर्च केले पाहीजे. तीर्थात म्हणजे पवित्र कार्यात. देवपंचायतनात्मक भगवत्कार्यासारखे पवित्र कार्य दुसरे नाही. जे आपण आपल्या घरातच करु शकतो. मंदिर, मठ अथवा इतर ठिकाणी जाऊन स्वामींना शोधत बसण्याची गरज नाही. कारण ' स्वामीं आहे तुजपाशी l परंतु तुच जागा चुकलाशी ll अशी संज्ञा स्वअंतरी विचारुन बघावी.


घरातील देवघराची संरचना व देवपंचायतनाची विशिष्ट मांडणी कशी करावी यासंबंधी ' दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट ' संस्थेत संपर्क करावा. देश, स्थान व कालाच्या माध्यमातून तात्त्विक मार्गदर्शन करण्यात येईल.



ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...




0