आत्मक्रिया योग व सहज समाधि प्रबोधन: गणपती अथर्वशीर्षातुन ( Ganapati Atharvshirsh ) गजाननाचे आवाहन कसे करावे ? SEO

Dattaprabodhinee Sevaa Trust’ was started in the year 2014 with a vision to create a non-profit humanitarian proficient area for spiritual people to actively engage them in soulistic existences.

ब्रम्ह अंतःकरण कसे बनते ? अनुकरणशील स्वतंत्र सद् मार्ग...!
घरातील देवघर व देव पंचायतन आधिष्ठान - २
नवनाथ ग्रंथ ( Navnath Bhaktisar ) पारायण कसे करावे ? ब्रम्हाण्डीय सामर्थ्य विश्लेषण...!
आत्मरत्न ( Soul Gem ) म्हणजे काय ? माणुस का भरकटतो ?
श्री गोरक्ष किमयागिरी प्रवाह नाथामृत सिद्धग्रंथ व कार्यसिद्धी...!
Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

मंगळवार, ५ जुलै, २०१६

गणपती अथर्वशीर्षातुन ( Ganapati Atharvshirsh ) गजाननाचे आवाहन कसे करावे ?


भारतीय संस्कृतीत स्वयंभु अवस्थेत पाताळातुन मृत्युलोकावर स्वतःहुन अवतरीत होणाऱ्या भगवान श्री गणपतीचे सगुणरुप ज्ञान बहुतांशी गणेशभक्तांपर्यंत पोहोचु शकले नाही. देवाची माहीती ग्रंथ सामग्रीतुनही प्रसारीत केली गेली नाही. भगवान श्री गणपतीचा मुळ स्वभाव व शाबर तंत्रातील श्री गजानन देवता काय आहे हे प्रसारीत केले गेले नाही.


http://blog.dattaprabodhinee.org/2016/07/ganapati-atharvshirsh.html

श्री गणपती हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. हिंदु धर्मात पुजनीय असणाऱ्या उग्र दैवतांपैकी एक आक्रमक व न्याय गंभीर दैवत म्हणजे भगवान श्री गणपती. देवाची अपेक्षित आणि महत्वपुर्ण माहीती आज आपल्या समाजात योग्यप्रकारे अनुभवास दिसत नाही. सर्व ठिकाणी फालतु गोंधळ व घाणेरडे आचरण आणि त्यात भगवान श्री गणपतीच्या पुजनाचा आव या कारणास्तव, काही महत्वाची माहीती सर्व दत्त भक्तांसाठी देत आहे. जेणेकरुन देवाची स्वतःकडुन कळत नकळत काही विटंबना होऊ नये. त्याची योग माध्यमातून ओळख पटावी म्हणजे त्याच्या करुणामय कृपेचा हात आपल्या माथी येईल. हीच ' दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट ' आध्यात्मिक कार्यप्रणालीची मंगलमय कामना आहे.

मुळात श्री गणपती हे अतीउग्र दैवत समजावे. नवनाथांनी शाबरी विद्येत देवाला ' सरदार ' अशी उपमा दिली आहे. ' सरदार ' म्हणजे शिव गणांचा सेनापती. तंत्र मंत्र यंत्र आणि सर्व सात्विक, राजसी व तामसी कर्मांमधे श्री गणपतीचे आदी पुजन महत्वाचे आहे. भगवान दत्तात्रेय महाराजांच्या चरणाशी असलाले श्वानरुपी चार वेदांचे भगवान श्री गणेश प्रतिपादस्वरुप आहे. श्री गणपती स्वयंभू तत्वाने मृत्युलोकी अवतरणारे प्रमुख दैवत आहे. पाताळ, मृत्युलोक व आकाशस्थित तारकेश्वर शिवलिंगाचे द्वारपाल विनायक आहेत. ज्याप्रमाणे भगवान शंकराने अतिउग्र पाचवा अवतार काळभैरव नावाने घेतला त्याच प्रमाणे श्री गणेशाचा अतिउग्र अवतार काळभ्रुशुंडी आहे. हा अवतार मल्लयुद्धात आणि महायुद्धात विजय मिळवुन देतो.

श्वेतार्क गणपती माहात्म्य


http://blog.dattaprabodhinee.org/2016/07/ganapati-atharvshirsh.html

हरिद्रा म्हणजे श्री हरि विष्णु नारायणाचे अंतरंगात आवाहन करुन भक्तांना सर्व सुख सौख्य मिळवुन देणारा देव. ह्या अवताराचे स्वरुप मृत्युलोकात श्वेतार्क गणपती म्हणुन ओळखले जाते. स्वयंभु गणेश मुर्ती श्वेत मदार वृक्षाच्या मुळाशी एका ठराविक नक्षत्राला प्रकट होते. त्यावेळेय एक ईच्छाधारी नाग नागीण व रुई माता या गणेश मुर्तीचे रक्षण करतात. ह्या गणेश मुर्तीची उपासना करण्याचे परम सौभाग्य मला मिळाले. यासंबंधी काही चमत्कारही घडले ते असे, ज्या क्षणी ती मुर्ती मी घरी आणली, त्यावेळी मुर्तीला कपिला गायच्या दुधात रात्रभर ठेवाली. सकाळी शेंदुरचा अभिषेक केला व काही दिवस उपासना करताच, मुर्तीतुन एक मोठा व एक छोटा दंत आणि चारही हातांना प्रत्येकी पाच बोटे यायला सुरवात झाली. देव मुर्तींतुन प्रत्यक्ष प्रकट होऊ लागला. ही श्वेतार्क गणपतीची उपासना बळी राजाचे ज्ञान मिळवुन देणारी दैवी शक्ती आहे.

श्री गणेशाचे योग साधनेतील सुमेरु स्थानाची प्रचिती सर्व योगी पुरुषांना अनायासे येते. देहातील प्रथमस्थित मुलाधार चक्र व अंतिम सहस्त्रार चक्राची देवता श्री गणेश आहे. गणेशाथर्वशीर्षातुन देवाचे आवाहन करण्यासाठी खालीलप्रमाणे धारणा करावी.

अत्यंत थोड्या श्रमातच सर्व मनोकामना पुर्ण करणारे हे दैवत भक्ताभिमानी आहे. अथर्वशीर्ष पाठ ( Ganapati Atharvshirsh ) दररोज कमीतकमी ३ ते २१ आवर्तने करावीत. आवर्तने करताना अंतर बाह्य धारणा त्राटकाच्या माध्यमातुन करावी.

१. श्री गणेशाच्या प्रतिमेतील सोंडेवर एकटक ध्यान केंद्रित करणे.

२. उजवी असावी की डावी सोंड याचा भेदभाव करु नये.

३. अथर्वशीर्ष पाठ करण्यापुर्वी एक माळ ' श्री स्वामी समर्थ ' जप करावा.

४. अथर्वशीर्षात विशद केलेल्या ' ॐ गं गणपतये नमः ' या तारक मंत्राची फक्त एक माळ पाठ समाप्ती नंतर करावी.

५. डोळे बंद करुनतारक मंत्र जप करताना, त्यापुर्वी केलेल्या त्राटकाचे प्रतिबिंब जप करताना तुमच्या नजरे समोर येईल.

६. हळुहळु काही दिवसातच डोळ्यासमोर देवाची प्रतीमा अगदी स्पष्टपणे दर्शनीय होते.

७. आपल्या बुद्धीत आणि विचारांमधे विलक्षण बदल येऊन बरेच अज्ञान कमी होते.

एक सत्य घटना

एकदा सद्गुरु शंकरनाथ साटम महाराजांचे शिष्य संचारमुर्ती योगीराज रघुनाथ वायंगणकर महाराज एका कामासाठी जंगलातुन पायी जात असताना काही अंतरावर निर्जनस्थानी अचानक समोर एक स्री व तिच्या कडेवर एक लहान मुल घेऊन, ती संचारमुर्ती महाराजांच्या समोर आली. संचारमुर्ती महाराजांच्या शर्टाच्या खिशात त्या लहान बालकाने हात घातला सुट्टेपैसे नाणी काढुन घेती व स्वतःजवळ ठेवुन घेतली.

त्याक्षणी ती स्री संचारमुर्ती महाराजांना म्हणाली, ' गणेशजींनी तुझे सुट्टे पैशे असले तरी चालेल पण मला सुट्टे पैसे नको, मला तुझ्या डोक्यातील आख्खी नोट पाहीजे ' असे बोलुन तीने संचारमुर्ती महाराजांना स्पर्श केला त्याक्षणी एक जोराचा विद्युत झटका अंगाला बसाला व ते घाबरत घरच्या दिशेने पळाले. परंतु काळ तग धरता आला नाही कारण ती स्री तेजपुंज विद्युल्लतारुपात कुण्डलिनी शक्ती संचारमुर्ती महाराजांच्या देहात स्पर्श प्रवेश करुन त्यांची समाधी लागली.

श्री गणेशाने संचारमुर्ती महाराजांना साक्षात दर्शन दिले. ज्यावेळी हे दर्शन सद्गुरुंना झाले त्या क्षणी सद्गुरु शंकरनाथ साटम महाराजांची तस्वीर समोरच होती. श्री गणेशाने स्वतः संचारमुर्ती महाराजांच्या डोक्याला हात लावुन साटम महाराजांच्या चरणी दासाचे मस्तक टेकवले आणि आनंदाच्या भरात स्वतःची सोंड आकाशात गरागरा फिरवुन शिवगर्जना केली.

ही सत्य घटना आहे. आजही ती दर्शन झालेली गणपती मुर्ती दाणोलीला साटम महाराज समाधीस्थानात प्रकट आहे.

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

त्राटक विद्या म्हणजे काय ? त्राटक विद्या व साधना महत्व...!

महत्त्वाची सुचना :

संबंधित पोस्टबद्दल विशेष गोपनीय माहीती फक्त संस्थेच्या अधिकृत सभासदांनाच विनंतीवरुन कळवण्यात येते.

संपर्क : श्री. कुलदीप निकम
भ्रमणध्वनी : 9619011227

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Enter your email address:

Delivered by FeedBurner

लोकप्रिय पोस्ट

स्वामीसभासद नोंदणी प्रार्थमिक अर्ज