वास्तुशास्त्राकडे वर्तमान काळात मनुष्य आकर्षित होण्याच्या दृष्टीकोनातून सर्वसामान्य पुस्तकी ज्ञानाच्याही अत्यंत पलिकडे मानवी सुक्ष्म देहाशी प्रत्यक्ष तादाम्य होऊन देहातील पंचतत्व आधिष्ठित षट्चक्रांच्या आत्मज्ञानातुन वास्तु विनीयोग व न्यासादी कर्मे घडण्याच्या हेतुने दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट माध्यमातून वास्तु चक्राचा षट् चक्रांशी संबंधावर निवडक व मर्यादीत लेख प्रकाशित करत आहोत.
ज्याप्रमाणे वास्तुशास्त्रात नवग्रहांकडून पृत्वीवर पडणाऱ्या प्रभावाचा तसेच वायु, भुगर्भ तरंग, उत्तर दक्षिण ध्रुवाची भागाचा पृथ्वीवर भौगोलिक दबाब आणि प्रकृतिकडुन उत्सर्जित केली जाणारी उर्जा यांचा सहभाग असतो तसेच मानवाच्या शारीरिक व वैचारीक स्थैर्यावरही प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष प्रमाणात संबंधित प्रभाव आढळुन येतो. माझ्या पाहाण्यात येणाऱ्या सरासरी टक्केवारी प्रमाणे वास्तुशास्त्राच्या पार्श्वभूमीवर दिशा, देश, वेळ, काळ व स्थान या पाच मुलभुत बाबींच्या अनुशंघाने जवळजवळ ९५% मन परिवर्तनाची प्रकृतिक प्रक्रीया वास्तु चक्र व त्याचा मानवी देहाशी सुक्ष्म संबंध असल्याने होते. इतर ५% फरक मानवाच्या मानसिक,शारीरिक,आर्थिक, सामाजिक व आध्यात्मिक परिणामांवर आधारित असतो.
वास्तुकलेच्या सर्वात महत्वाच्या उपयोग येणारी गोष्ट म्हणजे ; योग्य प्रकारे गृह व व्यवसायिक संरचनेद्वारा प्रकृतितील प्रवाहीत होणारी अक्षय उर्जेचा प्रभाव योग्य दिशानिर्देशनाद्वारे सदुपयोगात आणणे. त्यायोगे त्या सुक्ष्म व अतिसुक्ष्म शक्तीला प्राप्त करुन घेणे.
दत्तप्राबोधिनी तत्वाच्या पार्श्वभूमीवर ब्रम्हाण्डीय वास्तुशास्त्र विश्लेषणात अंतराळ, सौरमंडळ, भुमंडळ व भुगर्भ मंडळअसे चार भाग आहेत. हि मंडळे सदैव ऐकमेकांना कमी जास्त प्रमणात प्रभावित करत असतात. या मंडळांमधे मानवी शरीराला अनुसरुन पृथ्वीवरील भु तत्व मुलाधार चक्राच्या तुलनेत जल तत्व १००% अधिक प्रभावकारक आहे. जल तत्व स्वाधिष्ठान चक्रापेक्षा अग्नि १००% आधिक प्रभावकारक आहे. अग्नि तत्व मणिपुर चक्रापेक्षा वायुतत्व १००% व वायु तत्व अनाहत चक्रापेक्षा आकाश तत्व विशुद्ध चक्र १००% जास्त प्रभावकारक आहे. हे आकाश तत्व आत्म्याचे निवासस्थान आहे ज्या आकाश तत्वाच्या माध्यमातून अंतराळ व सौर मंडळाचा पृथ्वी तत्वाशी घनिष्ट संबंध आहे. वास्तुकलेत याच उर्जेला टप्प्याटप्याने आपल्या गरजेप्रमाणे कमी जास्त प्रमाणात जन हित किंवा वैयक्तिक सदुपयोगाहेतु वास्तुत उतरवण्याचे कार्य आम्ही करतो.
चुम्बकीय तत्वाचा प्रभाव
उत्तर धृवाकडुन येणारी चुंबकीय तरंगे व पुर्व दिशेकडुन येणारी सोम आहुतीयुक्त सुर्य किरणांचा संमिश्रीत लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून अशी वास्तु तयार करावी ज्यायोगे यांच्या सुक्ष्मप्रवाहात कोणतीही बाधा उत्पन्न होणार नाही. त्याच बरोबर दक्षिण व उत्तर धृवाकडुन प्रवाहीत होणाऱ्या चुंबकीय तरंगांचा व पुर्वेकडुन येणाऱ्या सुर्य किरणांचा मानवी मेंदुवर मोठा परिणाम होतो. ह्या परिणामांचे आश्रयस्थान आपली वास्तु असते.
पंच महाभुते व वास्तु
भुमी
भुमीत कोपरा, चढ उतार, द्वार व आतील मार्ग व दिशेचे विशेष महत्व आहे. दक्षिण व पृश्चिमेला जमीन उंच हवी. पूर्व ते पश्चिमेकडील लांबी सुर्यवेधी ठरते. उत्तर ते दक्षिणकडील लांबी चंद्रवेधी असते.
जल
पाण्याचा संचय व प्रवाह उत्तर पुर्वेलाच असायला हवा.
अग्नि
अग्निची दिशा दक्षिण पुर्व दिशेला असते. स्वयंपाक घर, विद्युत मीटर ईत्यादी ज्वलंत तत्वे येथे स्थापीत करावीत. यास उत्तर पश्चिम दिशाही योग्य आहे.
वायु
सर्वाधिक महत्वपुर्ण तत्व आहे. उत्तरेकडील चुंबकीय तत्व व पुर्वेकडील सुर्य किराणांच्या संमिश्रीत प्रभावावर घरातील वायु तत्वाची स्थिरता अवलंबुन असते. यासंबंधित अधिक माहीती हेतु दत्तप्रबोधिनी संस्थेशी संपर्क करा.
आकाश
आकाश तत्वाचा संबंध ब्रम्ह स्थानाशी जोडलेला आहे. जितके आंगण मोकळे ठेवाल तितकी ब्रम्हाण्डीय उर्जा वास्तुत उतरेल.
ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...
दत्तप्रबोधिनी कुलदैवत शंकानिरसन व उपासना
All Life Useful Links in One Place DATTAPRABODHINEE NYAS
Dattaprabodhinee All Reviews Link
सर्व दत्तप्रबोधीनी चे विनामूल्य उपाय जाणून घेण्यासाठी ह्या लिंक वर क्लिक करा.
दत्तप्रबोधिनी दशमहाविद्या अतिगुह्य ज्ञान प्राप्त करण्यासाठी ही लिंक नक्की सेव्ह करा !
All Life Useful Links in One Place DATTAPRABODHINEE NYAS
Dattaprabodhinee All Reviews Link
सर्व दत्तप्रबोधीनी चे विनामूल्य उपाय जाणून घेण्यासाठी ह्या लिंक वर क्लिक करा.
दत्तप्रबोधिनी दशमहाविद्या अतिगुह्य ज्ञान प्राप्त करण्यासाठी ही लिंक नक्की सेव्ह करा !