वास्तु भुमीशुद्धी Vastu Bhumishuddhi- शल्य शोधन Shalya Shodhan म्हणजे काय ?

गृह व व्यावसायिक अथवा कोणत्याही दृष्टिकोनातून वास्तु उभारणी करण्यापुर्वी ; संबंधित भुमिचे शल्य शोधन करण्यात येते. शल्य म्हणजे भुमि अंतर्गत गर्भात कोणत्याही दोषपुर्ण वस्तुंचे अस्तित्व असणे. उदा. पुरातन शिळा, लाकुड, पाषाणे, लोखंड, प्राणी व मानवाच्या अस्थि आणि कोळसा. शल्य शोधन केल्याशिवाय संबंधित उभारलाली गेलेली वास्तु दुषित असते. अशी वास्तु बाधीत वास्तुंमधे गणली जाते. अशा वास्तुत निवासी करणाऱ्या मनुष्याला मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक व आध्यात्मिक पीडा भोगावी लागते. आकस्मित संकटे सोबत काही वेळा मृत्यू ही ओढावतो. या पार्श्वभूमीवर दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्टद्वारे संबंधित अतिमहत्वपुर्ण अभिलेख जनहितार्थ प्रकाशित करत आहोत.

माझ्याकडे लोकांना संबंधित वास्तुविषयावर काही निवड प्रश्न खालीलप्रमाणे केलेत ; ज्यांचे उत्तर पुढे मांडलेले आहे.

प्रश्नावली -

  • १. विकत घेतलेल्या तयार नवीन वास्तुचे योग्य शल्य मापन काय आहे ?
  • २. वास्तु बाधीत आहे ; हे कसं ओळखावं ?
  • ३. व्यावसायिक वास्तुतील बाधेचा अर्थिक संबंधावर परिणाम किती काळ राहातो ?
  • ४. दुषित वास्तुत आध्यात्मिक साधना कशी करावी ?
  • ५. दुषित, बाधीत व झपाटलेल्या वास्तुंमधील नेमका फरक काय ?
  • ६. घरात नकारात्मक उर्जेचे अधिग्रहण कोणत्या दिशेला व स्थानी असते ?
  • ७. वास्तु बनल्यावर जमीनीखाली गाडुन राहीलेल्या वस्तु काढुन ; वास्तु शुद्ध करता येईल का ?

'शल्य' भुखंडात आहे ते कसे ओळखावे ?

कोणतेही गृह बनवण्यापुर्वीच त्या जागेचे शल्य मापन व शोधन कले जाते. एकदा वास्तु निर्मिती झाली की ; त्यात शल्य मापन व शोधन अनुसरुन कोणताही बदल करता येत नाही.

  • १. सर्व प्रथम भूमीला नऊ भागात विभाजीत करावी.
  • २. अ, क, च, द, त, प, य, श वर्णाक्षरे पूर्व, पूर्व दक्षिण, दक्षिण, दक्षिण पश्चिम, पश्चिम, पश्चिम उत्तर, उत्तर, उत्तर पूर्व भागात लिहावीत. यात ह वर्णाक्षर मधे लिहावेत.
  • ३. त्यायोगे भुमी ज्यांच्या नावे आहे अशा व्यक्तीने ईष्ट देवाचे स्मरण करुन दत्तप्रबोधिनीद्वारे तत्पुर्वी दिली गेलेली वास्तुपुरुष जागृती साधनद्वारा अर्पण केलेले फुल, जलाशयाचे पाणी, देवता व नैवेद्यात ठेवलेल्या फळाचे पहीले अक्षर वास्तु चक्रात बघावं कोणत्या स्थानी आहे. त्यायोगे त्या स्थानी शल्य आहे असे समजावे. न दिसल्यास जमीनीत शैल्य व घातक शक्तींचे अधिग्रहण नाही असे समजावे.

अक्षर दिशा वस्तु शल्य शल्याची खोली शल्याचे फळ
पूर्व
मनुष्य अस्थि
दिड हात
म्रत्युकारक
आग्नेय
पशु अस्थि
दोन हात
राजभय
दक्षिण
मनुष्य अस्थि
कमरेपर्यंत
रोगाद्वारे मृत्यू
नैऋत्य
पशु अस्थि
दिड हात
लहान मुलांना घातक
पश्चिम
मनुष्य अस्थि
दिड हात
घरमालक थांबू नये
वायव्य
भुसा / कोळसा
चार हात
मित्रहानी
उत्तर
मनुष्य अस्थि
कमरेपर्यंत
धन हानी
ईशान
पशु अस्थि
दिड हात
पशुनाश
मध्य
राख,लोखंड,मनुष्य अस्थि
तीन हात
अंतिम कष्टदायी

'शल्य शोधन' केल्यावर काय करावे ?

ज्या ठिकाणी गाडले गेलेले शल्य शोधले ; त्यास्थानी एक मनुषाच्या सरासरी उंची ईतका खडा करुन ; ती सर्व माती काढुन टाकावीत. पुन्हा वापरु नये. त्यास्थानी नवीन शुद्ध माती भरावी म्हणजे शल्य शोधन होते. वास्तु बनण्यापुर्वीच शल्यशोधन करावेत नंतर नाही.

जर दहा फुठपेक्षा अधिक खोलवर शल्य मापन असल्यास ; त्याचा संबंधित निर्माणावर व वास्तूवर कोणताही फरक पडत नाही. तरीही ईच्छ्या असल्यास वरीलप्रमाणे कृती करु शकता. 

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...