हाॕस्पिटल अथवा रुग्णालयीन वास्तु कशी असावी ?


माझ्या संपर्कात येणाऱ्या बहुतांशी व्यक्ती विषयांमधे सार्वजनिक जागा व त्या ठराविक वेळी होणाऱ्या अकस्मात परीणामांचा अनुभव त्या त्या संबंधित व्यक्तींच्या सुक्ष्म शरीरावर पडतो असे पाहाण्यात आले. जो परीणाम पुढील काळात त्वरीत अथवा कालांतराने मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रात कमी जास्त प्रमाणात नुकसानदायक ठरतो. अशा परिणामकारक सान्निध्यात रुग्णालये बहुतांशी प्रमाणात सक्रीय असतात. त्यात जर नकारात्मक / सकारात्मक सुक्ष्म शक्तींना संबंधित रुग्णालयाच्या वास्तु दोषाची जोड मिळाली तर अनर्थ होण्यास फार काळ लागत नाही. म्हणुन दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट माध्यमातून सुरक्षित भावनेच्या दृष्टिकोनातून संबंधित अभिलेख प्रकाशित करत आहोत.


वास्तु शोधन, परीक्षणशुद्धीविषयी याअधीच निवडक माहीती दिली आहे. ती ईथे परत लिहीत नाही. HOSPITAL वास्तुसाठी खालीलप्रमाणे महत्वपुर्ण वास्तुरेखाटन करवुन घ्यावे.

  • पुर्व, ईशान्य अथवा उत्तरेला कँश डेस्क बनवावेत. यात बिलिंग काऊंटर, कँश पेटी कँशिअरच्या उजव्या बाजुला असायला हवी. ती उघडताना कोणताही विचित्र आवाज येऊ नये याची काळजी घ्यावी.
  • ब्लड बँक कार्यालय व आॕपरेशन विभाग दक्षिण दिशेला असणे उपयुक्त आहे. दक्षिण दिशेचा स्वामी रक्तवर्णिय मंगळ ग्रह आहे.
  • हाडांचा विभाग अथवा प्लास्टरचा कक्ष पश्चिम दिशेला शुभाकारक आहे. शनिग्रह पश्चिम दिशेचे स्वामी व हाडांचे कारक आहेत.
  • संशोधन व चिकित्सक कामें उत्तर पूर्व अथवा ईशान्य दिशेला करणे शुभदायक आहे.
  • प्रसुति विभाग व स्त्री रोग कक्ष नैऋत्य दिशेला असावेत. याचे कारक स्वामी राहु आहेत.
  • गर्भवती स्त्रीयांचे शयन स्थान अशाप्रकारे प्रस्थापित करावेत की, वाँर्डमध्ये प्रवेश केल्यास ते उजव्या बाजुस यावेत.
  • औषधालय  दक्षिण अथवा उत्तरदिशेला असावीत

कपड़े :
  • रुग्णांसाठी वापरले जाणारे कपडे दक्षिणदिशेला ठेवावेत.
  • भेट देणाऱ्या रुग्ण स्वकियांची बसण्याची जागा पुर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख असावी.
  • भिंतींना फिकट गुलाबी अथवा पांढरा रंग द्यावा.


औषध :

  • गोळ्या, ईंजेक्शने उत्तरेला, आॕपरेशन विषयी साहित्ये दक्षिणेला व द्रवित औषधी पेय वायव्य दिशेला ठेवावीत.
  • नैऋत्य दिशेला कोणतेही औषधे ठेवु नका.
  • फ्रिजर अथवा डिप फ्रिजर स्टोरेज आग्नेय किंवा दक्षिण दिशेला असावेत.


प्रयोगशाळा :


  • ईथे बैठक दक्षिणमुखी असावी.
  • रक्तांवरील संशोधन दक्षिण दिशेला स्थिर होऊन करावेत.
  • नैऋत्य दिशेला ऐक्स रे मशीन ठेवावीत.
  • मायक्रोस्कोपीक कार्य आपल्या टेबलावरच असावेत.
  • सोनोग्रफीहेतु स्वतंत्र विभाग बनवावा. यात रुग्णांना झोपवताना त्यांचे शिर दक्षिण अथवा पश्चिमेकडे असायला हवे.
  • रिकाम्या बोटल्स पश्चिमेस ठेवावीत.



ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...