वास्तु पुरुष - Real unknown secrets explained


दत्तप्रबोधिनी तत्व अंतर्गत सर्वांगीण आध्यात्मिक तज्ञतेच्या अनुशंघाने अगणिक आत्मिक विषयांवरील प्रार्थमिक माहीती व संस्थेच्या सक्रीय सभासदांसाठी असलेली विशेष प्रभुत्ववादी कार्यप्रणाली अमलात येण्याहेतुने ब्लाँग लिखाणे प्रसिद्धीस आणत आहोत. त्यायोगे वास्तुशास्त्र निगडीत काही प्रार्थमिक निवडक माहीती वाचकांना कळवत आहोत.

दत्तप्रबोधिनी तत्व अंतर्गत सर्वांगीण आध्यात्मिक तज्ञतेच्या अनुशंघाने अगणिक आत्मिक विषयांवरील प्रार्थमिक माहीती व संस्थेच्या सक्रीय सभासदांसाठी असलेली विशेष प्रभुत्ववादी कार्यप्रणाली अमलात येण्याहेतुने ब्लाँग लिखाणे प्रसिद्धीस आणत आहोत. त्यायोगे वास्तुशास्त्र निगडीत काही प्रार्थमिक निवडक माहीती वाचकांना कळवत आहोत.
कोणत्याही वास्तुमधील सक्रीय प्राणशक्तीला वास्तुपुरुष असे म्हणतात. ही प्राणशक्ती उगम स्त्रोत दैत्यसंधानाद्वारे कार्यान्वित होते. ज्याची उत्पत्ती भगवान शंकराच्या घामातुन झाली होती. मृत्युलोकात पाताळाभीमुख तत्वाद्वारे पृथ्वी ग्रहण करुन दैत्य शेष राहीला. ज्या ठिकाणी संग्रहीत वस्तु असतील त्यांवर त्याचा प्रभाव पाडत असल्याने देवतांनी त्या जागेला वास्तु तर त्या दैत्याला वास्तु पुरुष नामकरण केले.


वास्तुपुरुष नमस्तेऽस्तु भूशय्याभिरत प्रभो।
मदग्रहं धनधान्यदिसमृद्धं कुरु सर्वदा॥

वास्तु पूरुष " वास्तोष्पति " नामक पुरातन दैत्य आहे. ऋग्वेद आदी वेदांमधे देवांच्या तुलनेत दैत्यांच्या स्वरुपाशी अग्नि, बालग्रह, पापग्रह व डाकीन आदी स्वरुपाशी एकरुप आहेत. प्रत्येक स्थानाला दिशा, काल गणनेद्वारा वास्तु मंडळाच्या मुख्य पदस्थ प्रधानत्व वास्तु पुरुष विराजमान असतो. या वास्तु क्षेत्राचे ब्रम्हाण्डीत नियोजन नक्षत्राद्वारे पाताळस्थित असलेल्या क्षेत्रपालांचे असते. ज्यांच्या आज्ञेवर वास्तुपुरुष " तथास्तु " म्हणतात.


वास्तु मंडळाची दिशानिर्देशने खालीलप्रमाणे आहेत.

, Philippines, Philippines

राशि दिशा व प्रधानत्व :


राशि दिशा प्रधान तत्व
१. मेषपूर्वअग्नि
२. वृषदक्षिण पृथ्वी
३. मिथुनपश्चिम वायु
४. कर्कउत्तर जल 
५. सिंहपूर्व अग्नि
६. कन्यादक्षिण पृथ्वी
७. तुलापश्चिम वायु
८. वृश्चिकउत्तर जल
९. धनुपूर्व अग्नि
१०. मकरदक्षिणपृथ्वी
११. कुम्भपश्चिमवायु
१२. मीनउत्तर जल

दिशा प्रधानत्व

पुर्व -


या दिशेचे स्वामी इंद्रदेव आहे. या दिशेने सुर्योदय होत असल्याने त्याचा परिणाम घरातील कुटुंब प्रमुखावर होतो. त्यायोगे त्यांचे आयुष्य दिर्घकाळ टिकते.


दक्षिण -


यम व मंगळ देव या दिशेचे मुख्य देवता आहेत. योग्य आधारे दक्षिण दिशस्थ वास्तु निर्माण केल्यास यश, आनंद व समाधानकारक जीवन प्राप्ती आहे.


पश्चिम - या दिशेचे स्वामी शनि देव आहेत. ही दिशा भाग्योदयक व प्रसिद्धी देणारी आहे.



उत्तर -


या दिशेचे स्वामी कुबेर देवता आहेत. बुध देव आधिष्ठाता आहेत. या दिशेच्या योग्य वास्तु चयनाने समृद्धीकारक योग येतात.


ईशान -


हे जल क्षेत्र आहे. याचे मुख्य देव भगवान शिव आहेत. या दिशेत कोणतेही निर्माण कार्य करु नये. जलस्त्रोत असल्यास होकारार्थी अनुभव येतात. देवतांचे गुरु बृहस्पती या दिशेचा आधिष्ठाता आहेत.


आग्नेय -


या दिशेचे स्वामी अग्नि आहेत व शुक्र अधिष्ठाता आहेत. स्वयंपाक घरासाठी उपयुक्त स्थान आहे. त्यायोगे आरोग्य स्थिर राहाते.


नैऋत्य -


या दिशेचे स्वामी नैऋत्य व आधिष्ठाता राहु / केतु  आहे. जलस्त्रोतासाठी योग्य स्थान असते.


वायव्य -


या दिशेचे स्वामी वायुदेव व चन्द्रमा आधिष्ठाता आहे.  मित्र संबंध यास्थानाच्या योग्य वास्तु चयनाद्वारे ओळखले जातात. 





ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...




0