मंत्र स्फुरण हेतु तारक व मारक मंत्रांमधे बीज शक्तीचा बीज मंत्रांच्या माध्यमातून समावेशा करण्यात येतो. बीज मंत्रामुळे मंत्राच्या चैतन्यात वाढ होते. बीज मंत्र कल्पवृक्षाप्रमाणे असतात. कोणत्याही कार्यसिद्धीसाठी सदुपयोग करता येतो. मंत्र व्यवस्थित समजुन घेऊन अभीव्यक्तीद्वारे जप केल्यास योग्य ती फलप्राप्ती होण्यास सुरवात होते. त्यायोगे बीज मंत्र कधीही अशुद्ध नसतात ; अशुद्ध असते तर साधकाचे अंतर्मन जे अत्यंत प्रभावकारक असते.
“ॐ” बीज मंत्र
ॐ काराला प्रणव बीज असे संबोधले जाते. जे अकार, ऊकार व मकारासोबत अर्ध मात्राने व्याप्त ; प्रकृति पुरुषाचे द्योतक आहे.
ह्रीं बीज मंत्र
हे बीज मंत्र महामाया भुवनेश्वरी मातेचे आहे. प्रकृतिच्या सृजनात्मक कार्यकाळात भुवनेश्वरी मातेचे प्रकटीकरण होते. ह्या बीज मंत्रात शिवशक्ती निर्गुणस्वरुपात स्थिर आहेत.
श्रींं बीज मंत्र
हे बीज मंत्र महामाता महालक्ष्मीला अनुसरुन आहे. दशमहाविद्या सुद्धा याच बीज मंत्रातुन स्फुरल्या जातात. ह्या बीज मंत्राद्वारे सद्गुरु शक्ती कार्यान्वित होत असते.
ऐं बीज मंत्र
हे बीज मंत्र सरस्वती मातेचं आहे. आपल्या देहातील स्थुल, सुक्ष्म, कारण व देहापलिकडील वैश्विक वाणीची देवता माता सरस्वती आहे. एकाक्षर बीज मंत्राद्वारेही मातेची आराधान करता येते.
क्रीं बीज मंत्र
हे बीज मंत्र भगवती कालीका मातेच आहे. मृत्यु शय्येला स्वतःचे वाहन बनवुन साधकाला स्वतःच्या चरण स्पर्शाने जीवाचा शिव बनवणारी भगवती कालिकामाता दहमहाविद्यातील सर्वात प्रमुख अशी परमशक्ती आहे.
धुं बीज मंत्र
हे बीज मंत्र दशमहाविद्येतील धुमावती मातेचे आहे. सर्वात गहन तत्व समजवणारी महामाता दुःख दारिद्रय नाशक आहे. माताच्या ज्ञानाचा जनहीतासाठी निःस्वार्थ सदुपयोग केल्यास ती उच्च पदस्थ करते परंतु आगाऊपणा अथवा तीच्या कृपेचा व्यवहार केल्यास तितक्याच आवेशाने सर्वनाश करुन टाकते.
ह्रौं बीज मंत्र
हा बीज मंत्र भगवान शिवाचा आहे. ह्या जपाने अकाल मृत्यु, शोक, दैन्याचा नाश होतो व आत्मिक सामर्थ्याची प्राप्ती होते.
क्लीं बीज मंत्र
हे बीज मंत्र भगवान श्री कृष्णाचे आहे. भक्तीमार्गदायक व भक्तताप विध्वंसक भगवंताच्या बीजाचे स्मरण केल्यास भगवंत संकटकाळी धावुन येतो व आपलं परीत्राण करतो.
गं बीज मंत्र
हे बीज मंत्र भगवान गणपतीचे आहे. सद्बुद्धी देणाऱ्या देवतेला प्रथमपुजले जाते. त्यायोगे गणपतीअथर्वशीर्षाद्वारे बीजमंत्रजपाच्या अनुष्ठानातुन देवाला शीघ्रतेने प्रसन्न करता येते.
- हुं बीज भगवान शंकराचे आहे.
- ग्लौ बीज मंत्र भगवान गणपतीचे आहे.
- स्त्रीं बीज मंत्र भगवती दुर्गेचे आहे.
- क्ष्रौं बीज मंत्र भगवान नृसिंह देवाचे आहे.
- वं बीज मंत्र स्वाधिष्ठान चक्राचे आहे.
- शं शंकराचे बीज
- फ्रौं हनुमानाचे बीज
- क्रौं कालिका मातेचे बीज
- दं विष्णु बीज
- हं आकाश बीज
- यं अग्नि बीज
- लं पृथ्वी बीज
- ज्ञं ज्ञान बीज
- भ्रं बीज मंत्र
हे बीज मंत्र भगवान भैरवनाथाचे आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या भैरवनाथाला बीजमंत्राद्वारे संपुटयुक्त स्मरण केल्यास सहजच कृपेचा अनुभव येऊ शकतो.
ध्यानेन परमेशानि यद्रूपं समुपस्थितम्।
तदेव परमेशानि मंत्रार्थ विद्धि पार्वती।।
संपर्क : श्री. कुलदीप निकम
भ्रमणध्वनी : 93243 58115
Cure Problems With Divine Powers. 100s Of People Cured ! Chakra Healing balancing. Ancient Indian Science. Based on Ashtaang Yog. Learn Yogic Healing. Types: Learner's Workshops, Stress Management, Divine Karma Cleansing, Mind empowerment, Chakra Balancing. - Visit Website Here !