ॐ भू र्भुव स्वः l
तत्सवितुर्वरेण्यम् भर्गो देवस्य धीमहि l
धियो यो नः प्रचोदयात् ll
भावार्थ :
त्रैलोक्याला प्रकाशित करणाऱ्या सुर्याच्या सर्वश्रेष्ठ तेजाचे मी ध्यान करतो. तो आमच्या बुद्धीला प्रेरणा देवो.
शब्दार्थ : १. भू - पृथ्वी २. र्भुव - प्रकाश लोक ३. स्व - स्वर्ग लोक ४. तत - त्या ५. सवितु - सुर्य ६. वरेण्यं - श्रेष्ठ ७. भर्ग - तेज ८. देवस्य - तेजस्वी ९. धीमहि - ध्यान करतो १०. धियः - बुद्धीला ११. यो - जो १२. नः - आमच्या १३. प्रचोदयात - प्रेरणा देवो.
वर दिलेल्या गायत्री मंत्राचा ॐ भू र्भुव स्वः हा भाग नसुन तो आरंभी एकदाच म्हणावयाचा असतो. मुख्य मंत्र तत्सवितुपासुन सुरु होतो त्यात तीन चरण व चोवीस अक्षरे आहेत.
चरण -
- १. तत्सवितुर्वरेण्यम्
- २. भर्गो देवस्य धीमहि
- ३. धियो यो नः प्रचोदयात्
| अक्षरे | स्थान | देवता |
|---|---|---|
| १. तत | मेंदु | अग्नि |
| २. स | कपाळ | वायु |
| ३. वि | डोळा | सूर्य |
| ४. तुः | गाल | विद्युत |
| ५. व | नाक | यम |
| ६. रे | मुख | वरुण |
| ७. ण्यं | ओठ | बृहस्पती |
| ८. भ | चेहरा | पर्जन्य |
| ९. र्गो | हनुवटी | गंधर्व |
| १०. दे | गळा | पूषा |
| ११. व | खांदा | रुद्राक्ष |
| १२. स्य | उजवा हात | त्वष्ठा |
| १३. धी | डावा हात | वसु |
| १४. म | हृदय | मरुत |
| १५. हि | पोट | सोम |
| १६. धि | बेंबी | अंगिरा |
| १७. यो | कंबर | विश्वदेव |
| १८. यो | गुह्य इंद्रिये | अश्वीनी |
| १९. नः | माझ्या | प्रजापती |
| २०. प्र | गुडघे | सर्वेश्वर |
| २१. चो | पोटर्या | शिव |
| २२. द | घोटा | ब्रम्हा |
| २३. या | याय | विष्णू |
| २४. त | तळवा | विश्वदेव |
चोवीस अक्षरांचे स्पष्टीकरण...
२ हे अक्षर ब्रम्ह व माया ४ - २ = २ मन व बुद्धी
४ हे अक्ष र चार वेद ४ + २ = ६ सहा शास्त्रे
गायत्री मंत्राचा गुढार्य...
- १. तत - ईश्वराचा महिमा, स्वरुप, गुण, शक्ती अवर्णनीय असुन त्याचे वर्णन शब्दात करणे अशक्य आहे. तत् या शब्दाने भगवंताचा उल्लेख केला जातो. गीतेमधे ॐ तत् सत् ही ईश्वराची नावे सांगितली आहेत. त्यातील तत् हे ईश्वराचे निर्गुण स्वरुप आहे की ज्या स्वरुपामुळे विश्व निर्मिती, स्थिती व प्रलय होत असतो. गायत्री मंत्राच्या जपामुळे तत् चे आत्मस्वरुप कळते.
- २. सवितुः - सविताचा सर्वसामान्य अर्थ सुर्य असा आहे. ईश्वराच्या अनंत शक्तीचे व तेजाचे सविता हे प्रतिक आहे. वेद आणि उपनिषदांनी सविताला परब्रम्ह मानले आहे. गायत्री मंत्रात सविताला सुर्य म्हणुन चिंतन करण्यात आलं आहे यासाठीच की तो अज्ञानाचा अंधकार नाहीसा करुन आत्म प्रकाशाचा मार्ग दाखवतो. आजही सुर्य ईश्वराचे अंशात्मक रुप म्हणूनच उपासना केली जाते.
- ३. वरेण्यं - याचा अर्थ श्रेष्ठ व उत्तम असा आहे. ईश्वराच्या अद्भुत शक्तीमधे सत व असत ही दोन तत्वे सामावली आहेत. सत हेत श्रेष्ठ तत्व असुन सन्मार्गाची दिशा दाखवतो. ते धारण करण्या हेतु वरेण्यं शब्दाचा उपयोग केला आहे. म्हणुन सवितारुपी गायत्री आम्हाला बुद्धी, विवेक, सत्कर्म व ज्ञान प्रदान करो अशी प्रार्थना करण्यात येते.
- ४. भर्ग: - भर्ग म्हणजे ईश्वरी शक्ती जी आपल्या मनाच्या विकारांचा व पापांचा नाश करते. तसेच बुद्धीवर पसरलेल्या अज्ञानाचा मळ नाहीसा करुन बुद्धी सुक्ष्म करते. ईश्वराच्या या शक्तीतही वरेण्यंचा महत्वपुर्ण वाटा आहे. असत् गोष्टी नाहीश्या होण्यासाठी विवेकाचा आश्रय घ्यावा लागतो. गायत्री मंत्रात भर्ग शब्दाने विवेकला आवाहन करण्यात येते.
- ५. देवस्य - देवस्य म्हणजे देवरुपी व्यक्ती. जी आपले सर्वस्व देऊन दुसऱ्याचे कल्याण करण्याची कामना करते. ती संसारी उपभोगात रममाण नसते. दिन दुबळे व रंजले गांजल्यांची सेवा करणे हेच गायत्री मंत्रात सांगितले असुन आम्हीही संसारात न अडकता सद्गुरु सेवेसाठी बांधील राहू.
- ६. धीमहि - धीमहि म्हणजे धारण करणे. त्या देवत्वाला मन, काया व वाचेने धारण करण्याची क्षमता असावी अशी याचना गायत्री मंत्रात केली आहे. धीमहिचा शाब्दिक अर्थ ध्यान असा होतो. कारण ध्यान, विचार, भाव, गुण व कर्माचे ते बीजस्वरुप आहे. त्यायोगे देवत्वाचे दर्शन केले असता सर्व क्षेत्रात लाभ घडतो.
- ७. धियः - धि म्हणजे बुद्धी असा आहे. व्यवहारात बुद्धीचा अर्थ तल्लख मेंदु असा करतात. अविचारी व्यक्तीचा मेंदु तल्लख असला तरी बुद्धीवान असु शकत नाही. श्रेष्ठ अशा सात्त्विक व परमार्थिक बुद्धीला धि म्हणतात. सद्बुद्धी योगे मनुष्य जीवन सुखी होते.
- ८. यो - यो चा अर्य जोअसा असुन तो ईश्वरासाठी सांकेतिक शब्दात व्यक्त केला आहे. गायत्री मंत्राद्वारे दैवी गुणांच्या प्राप्तीसाठी ज्याची प्रार्थना केली जाते तो ईश्वर म्हणजे यो असा आहे.
- ९. नः - नः शब्द बहुवचनाचे रुपात उपयोगात आणला जातो. नः म्हणजे गायत्री मंत्राच्या जपाने स्वकल्याण व्हावे असा नसुन सर्व प्राणीमात्रांचे कल्याण व्हावे असा आहे.
- १०. प्रचोदयात - प्रचोदयात म्हणजे प्रेरित व उत्याहीत होणे. आमची बुद्धी शुभ कार्यासाठी जो प्रोत्याहीत करतो तो प्रकाशमान सर्वश्रेष्ठ सुर्य आहे.

.webp)


.png')
.webp)



%20-%20Copy-min.webp)


