अतिदुर्लभ सुर्य त्राटक विधी सोबत चक्षुष्मती विद्या पाठ व बत्तीसा यंत्र स्थापना Surya Tratak Ritual


सुर्य त्राटक - १

सकाळी सुर्योदयापुर्वी उठुन शौच, स्नानादी कर्मे करून शुचिर्भुत व्हावे. त्यानंतर जर थोडा प्राणायाम केला तर फारच उत्तम. नेत्ररोग दुर होण्यासाठी चक्षुष्मती विद्येच्या जपाचा संकल्प करावा. नंतर पंचोपचारयुक्त सुर्याचे पुजन करावेत. जर ही व्यवस्था नसेल तर डोळे मिटुन मानस पुजा करावी.

सकाळी सुर्योदयापुर्वी उठुन शौच, स्नानादी कर्मे करून शुचिर्भुत व्हावे. त्यानंतर जर थोडा प्राणायाम केला तर फारच उत्तम. नेत्ररोग दुर होण्यासाठी चक्षुष्मती विद्येच्या जपाचा संकल्प करावा. नंतर पंचोपचारयुक्त सुर्याचे पुजन करावेत. जर ही व्यवस्था नसेल तर डोळे मिटुन मानस पुजा करावी.

पुजा झाल्यावर एका काशाच्या थाळीत किंवा रुंद तोंडाच्या अन्य एखाद्या कास्यपात्रात शुद्ध पाणी भरुन या भांड्याला अशा जागेवर ठेवा की, त्यात सुर्याचे प्रतिबिंब सतत दिसत राहील. आता साधकाने या पात्रासमोर पुर्वाभिमुख बसुन सुर्याच्या प्रतिबिंबाकडे अचल नजरेने व एकाग्र चित्ताने पाहावं. प्रतिबिंबाकडे पाहात असताना चक्षुष्मती विद्येचे दहा, अठ्ठावीस किंवा शंभर पाठ करण्याचा प्रयत्न करावा. रोज पाठ झाल्यानंतर ' वर्चोदा असिवर्चो मेदेहि स्वाहा l' हा मंत्र म्हणत गायीच्या तुपाची दहावेळा पळीद्वारे अग्नित आहुती द्यावी. रविवारी वीस वेळा आहुती देणे आवश्यक आहे. जर पाठासोबत आहुती देणे शक्य नसेल तरीही चालेल पण सोबत आहुती दिल्यास विशेष लाभ होतो. सुरवातीला सुर्यबिंबाकडे पाहाताना त्रास होत असेल तर तुपाचा दिवा प्रयोगाकरिता वापरावा.


मेणबत्ती वापरली तरीही चालेल. पाठ पुर्ण झाल्यावर कास्यपात्रातील शुद्ध पाण्याने डोळ्यांवर हळुहळु शिडकाव करावा. डोळ्यांवर पाणी शिंपडल्यानंतर दोन्ही डोळे पाच मिनिटे बंद करावेत. त्यायोगे डोळ्यांना विश्रांती मिळेल मग आपल्या दैनंदिन कामास लागावे.

चक्षुष्मती विद्येचा पाठ देत आहे.

अस्याश्चक्षुष्मती विद्याया ब्रम्हा ऋषिः l गायत्री छंन्दः l श्री सुर्य नारायणो देवता l ॐ बीजम l नमः शक्तिः l स्वाहा कीलकम् l चक्षुरोगनिवृत्तेय जपे विनियोगः l

ॐ चक्षुश्चक्षुश्चक्षुः तेजः स्थिरो भव l मां पाहि पाहि l त्वरितं चक्षुरोगान् प्रशमय प्रशमय l मम आत्म रुपं तेजो दर्शय दर्शय l यथामहमधो न स्यां तथा कल्पय कल्पय l कृपया कल्याण कुरु कुरु l मम मानि यानि पुर्वजन्मोपार्जितानि चक्षुः प्रतिरोधक दुष्कृतानि तानि सर्वाणि निर्मुलय निर्मुलय l ॐ नमश्चउस्तेजोदात्रे दिव्य भास्कराय l ॐ नमः करुणा करायामृताय l ॐ नमो भगवते सुर्यायाक्षितेजसे नमः l ॐ खेचराय नमः l ॐ महासेनाय नमः l ॐ तमसे नमः l ॐ रजसे नमः l ॐ सत्वाय नमः l

ॐ असतो मा सद्गमय l ॐ तमसो मा ज्योतिर्गमय l ॐ मृत्योर्मा मृतं गमय l उष्णो भगवायछुचिरुपः हंसो भगवाय छुचिरप्रतिरुपः l

ॐ विश्वरुपं घृणिनं जातवेदसं हिरण्मयं ज्योतिरुपं तपन्तम् सहस्त्ररश्मिः शतधा वर्तमानः पुरः प्रजानामुदयत्येष सुर्यः ll ॐ नमो भगवते सुर्यायादित्याया क्षितज से होवाहिनी वाहिनी स्वाहा ll ॐ वयः सुपर्णा उपसेदुरिन्द्र प्रियमेघा ऋषयो नाममानाः l अप ध्वान्तमूणुहि पुर्धिचक्षुर्मुमुध्यस्मान्निधयवे बद्धान् ll

ॐ पुण्डरिकाक्षाय नमः l ॐ पुष्करेक्षणाय नमः ll ॐ कमलेक्षणाय नमः l ॐ विश्वरुपाय नमः l ॐ श्री महाविष्णवे नमः l ॐ सुर्यनारायणाय नमः ll

ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ll


हे सूर्यदेवा ! डोळ्यांच्याअभिमानी सूर्यदेवा, तुम्ही नेत्रांत नेत्रांच्या तेजस्वी रूपाने स्थिर व्हा, माझे रक्षण करा, रक्षण करा, माझ्या नेत्रांतील रोगाचे लवकरात लवकर निर्मूलन करा, निर्मूलन करा. मला तुमचे सुवर्णासारखे तेज दाखवा, तेज दाखवा. ज्यामुळे मी आंधळा होणार नाही, कृपा करुन असाच उपाय करा, उपाय करा. माझे कल्याण करा, कल्याण करा. दर्शनशक्तीचा विरोध करणारी माझी पूर्वजन्मीची एवढी पापे आहेत,  त्या सगळ्यांचे निर्मूलन करा, निर्मूलन  करा. ॐ नेत्रांना तेज प्रदान करणाऱ्या दिव्यस्वरूप भगवान भास्कराला नमस्कार असो. ॐ करुणाकर अमृतस्वरूपाला नमस्कार असो.  ॐ सूर्यदेवाला नमस्कार असो. ॐ नेत्रांना प्रकाश देणाऱ्या सूर्यदेवाला नमस्कार असो. ॐ आकाशात संचार करणाऱ्या सूर्यदेवाला नमस्कार असो. परमेश्वर स्वरूपाला नमस्कार असो.  ॐ सर्वांमध्ये क्रियाशक्ती निर्माण करणाऱ्या, रजोगुणस्वरूप सूर्यदेवाला नमस्कार असो.  अंध:काराला स्वतःमध्ये विलीन करणाऱ्या तमोगुणाच्या आश्रयस्थान असलेल्या सूर्यदेवाला नमस्कार असो. हे देवा ! तुम्ही मला असत्त्याकडून सत्याकडे घेऊन चला.अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन चला. मृत्यूकडून अमृताकडे घेऊन चला. उष्णस्वरूप भगवान सूर्य शुचिरुप आहे. जो सच्चीदानंदस्वरूप आहे. जो किरणांमध्ये सुशोभित आणि त्रिकालज्ञानी आहे. जो ज्योतिस्वरूप सुवर्णासारख्या कांतीमान पुरुषाच्या रूपात तळपत आहे, या संपूर्ण विश्वाचे जो एकमात्र निर्मितीस्थान आहे, त्या प्रचंड शक्तिशाली भगवान सूर्याला आम्ही नमस्कार करतो. ते सूर्यदेव सर्व प्राणिमात्रांच्या कल्याणार्थ उगवत आहेत. अशा सर्व प्रकारे ऐश्वर्यसंपन्न भगवान आदित्याला नमस्कार असो. त्यांचा प्रकाश दिवसाचा भार वाहणारा आहे. आम्ही त्या देवाकरिता उत्तम आहुती देत आहोत. ज्यांना मेघा अत्यंत प्रिय आहे, ते ऋषीगण उत्तम पंख असलेल्या पक्ष्यांच्या रूपात भगवान सूर्याजवळ गेले आणि त्यांनी याप्रमाणे प्रार्थना केली-

        " देवा ! या अंधाराला नष्ट कर, आमच्या नेत्रांना प्रकाशमय कर.  तसेच , अंधाराच्या बंधनात बांधल्या गेलेल्या सर्व प्राणीमात्रांना आपला दिव्य प्रकाश देऊन मुक्त करा."

           पुंडरीक्षाला नमस्कार असो.

           पुष्करेक्षणाला नमस्कार असो.

           निर्मळ नेत्रांच्या अमलेक्षणाला नमस्कार असो.

           कमलेक्षणाला नमस्कार असो.

           विश्वारूपाला नमस्कार असो.

           श्री महाविष्णूला नमस्कार असो.

           सर्वत्र शांती नांदो.सूर्यत्राटकाची  दुसरी पध्दत -

ही त्राटक -साधना बहुतेकांच्या परिचयाची आहे. सूर्योदयापूर्वीच उठून शौच मुखमार्जन वैगेरे प्रातर्विधी आटोपून नंतर थंड पाण्याने स्नान करावे. थंड पाणी सोसत नसेल,  तर थोड्या कोमट पाण्याने स्नान करावे; पण अति-उष्ण पाण्याने स्नान केव्हाही करू नये.  स्नानाबाबतची सविस्तर माहिती आपण 'शरीर-शुचिता' या प्रकरणात पुढे पाहणारच आहोत.

स्नान करीत असताना ' ॐ सूर्यनारायणाय नमः ।' हा जप स्नान संपेपर्यंत अखंड करावा. स्नान आटोपल्यानंतर थोडा प्राणायाम वैगेरे केला, तर फारच उत्तम.हे आटोपल्यानंतर सूर्योदयाच्या वेळी पूर्वेकडे तोंड करून मांडी घालून बसावे. पद्मासन घातले, तर अधिक उत्तम. कमरेवर अंगात कोणतेही वस्त्र घालू नये. उघड्या अंगानेच बसावे व बसताना ही काळजी घ्यावी, की आपल्या डोक्यावर कसलेही छप्पर व आच्छादन असणार नाही. बसण्यासाठी छोटी चटई वा धोतराची घडी घ्यावी. त्यावर अगदी ताठ बसावे. पाठीचा  कणा ताठ रहावयास हवा. दोन्ही हात घुटण्यांवर (गुडघ्यांवर) ताठ ठेवा. डोळे मिटून घ्या व पाच मिनिटे पुढील विचार आपल्या मनात सूर्यनारायणाचे स्मरण करून घोळवा, की ' सूर्य हा साऱ्या विश्वाचा चक्षू आहे. त्या चक्षूशी मी माझे चक्षू भिडवणार आहे. त्यामुळे सूर्याचे तेज माझ्या चर्मचक्षूद्वारे अन्त:चक्षूला तेजोमय करील व माझ्या चक्षूंचे सामर्थ्य वाढवील.

यानंतर हळूहळू डोळे उघडा व उगवलेल्या सूर्याच्या कोवळ्या सूर्यबिंबाकडे पाहताना डोळे जास्त ताणून पाहू नका. अगदी सहजपणे पाहावे, तसे पाहा. सुरुवातीला तीन मिनिटेच पाहा. एक आठवड्यानंतर हा अभ्यास वाढवीत पाच मिनिटांवर न्या. दहा मिनिटांपेक्षा मात्र जास्त वेळ हे त्राटक केव्हाही करू नये. कारण सूर्य हे प्रतीक फार तेजस्वी व प्रकाशमान असल्यामुळे जास्त वेळ त्राटक करू नये. सुरुवातीला सूर्याकडे पाहताना डोळ्यांतून पाणी येईल. पाणी गळणे आपोआप सात-आठ दिवसांत बंद होईल.  सूर्याकडे पाहत असताना जर डोळ्यांना कळ लागली, तर क्षणभर डोळे मिटून घ्या व पुन्हा डोळे उघडून सूर्याकडे पाहा. अर्थात सवयीने हा सारा त्रास काही दिवसांतच थांबतो.

साधना संपताच डोळ्यांवर थंड पाण्याचे हबके मारून ते थंड करावे व पाच मिनिटे डोळे मिटून स्वस्थ पडून राहावे. या वेळी तुम्हाला डोळे बंद असतानाही सूर्य दिसू लागतो, त्या गोलावर मन एकाग्र करता आले तर फारच उत्तम.  कारण अशा वेळी ते प्रकाशवलय अतिदिव्य व अलौकिक असल्यामुळे आपले मनही अलौकिक अवस्थेत जाते. मध्यान्हकालच्या सूर्यबिंबावरही बरेचजण त्राटक करताना आढळतात; पण तसे त्राटक डोळयांना अतिशय अपायकारक असल्यामुळे त्याचा अभ्यास कोणीही करू नये.

सूर्यत्राटक करणाऱ्या साधकाने शक्य असल्यास रविवारी उपवास करावा व शक्यतो निदान रविवारी तरी काळे कपडे वापरू नयेत. त्या दिवशी पांढरे , पिवळे किंवा जांभळ्या रंगाचे कपडे वापरावेत. साधक एखादी अंगठी वापरात असेल, तर ती अंगठी साधकाने  आपल्या रविबोटात ( मधल्या बोटानंतरचे करंगळी जवळचे बोट) घालावी. उत्तम फलदायी ठरते. सूर्यत्राटक साधनेची जी फलश्रुती आधीच्या पद्धतीत दिली आहे, तीच याही साधनेची आहे.

शेवटी मला माहीत असलेल्या व अनेक वेळा प्रचितीस आलेल्या तीन दिव्य सूर्योपासना सांगतो.

(1) कोणत्याही रविवारपासून ही साधना सुरू करावी. रविवारी सकाळी स्नान करून स्वतःच्या कपाळाला गंध-कुंकू लावून एका तांब्याच्या ताम्हनात एक विड्याचे पान ठेवावे. त्या पानावर रक्तचंदनाच्या गंधाने सूर्याची आकृती काढावी. एक रुपयाएवढा गोल काढावा. त्या गोलात आपल्याला जसे जमतील तसे , नाक-डोळे काढावे व आकृतीच्या कपाळावर इंग्रजी 'U' सारखे गंध काढावे व आकृतीच्या भोवती किरणे म्हणून उभ्या रेषा ओढाव्यात.

अशी आकृती काढल्यानंतर त्या आकृतीची कुंकू, लाल अक्षता, लाल फुले वाहून पूजा करावी. नंतर कोरे लाल वस्त्र घ्यावे ( साधारण हातरुमालाच्या आकाराचे). त्याचे  सात समान भाग (तुकडे) करावे. त्यातील एक भाग आपण काढलेल्या सूर्याच्या प्रतिमेला वाहून बाकीचे सहा तुकडे पुढील रविवारच्या पूजेकरिता आपल्याजवळ नीट जपून ठेवावेत. नंतर नीरांजन, उदबत्ती, धूप इत्यादींनी आकृतीला ओवाळावे व गुळाचा किंवा शिऱ्याचा नैवेद्य दाखवावा. पूजा करीत असताना 'ॐ ह्रीं सूर्याय नमः ।' हा मंत्र जपावा. दार रविवारी उपवास करावा. संध्याकाळी सूर्यास्ताला ही पूजा - म्हणजे विड्याचे पान, कापड वगैरे-विहिरीत किंवा नदीत विसर्जित करावी. ह्या सात रविवारपर्यंत वरील मंत्राचा जप एकूण सात हजार पूर्ण झाला पाहिजे. दर रविवारी एक हजार याप्रमाणे सात रविवारपर्यंत सात हजार मंत्र जप केला, तरी चालतो. या साधनेमुळे बेकारांना नोकरी, नोकरीत अधिकार, राजकारणात प्रगती व यश, घरात सुख व शांती, निरोगी शरीर हे फायदे हमखास होतात असा माझा अनुभव आहे.

(2) जेव्हा शुक्ल पक्षातील सप्तमीचा दिवस रविवार असेल, ती 'विजया सप्तमी' असते. त्या दिवशी सकाळी उठून स्नान करावे व उगवत्या सूर्याला नमस्कार करून त्या दिवशी आपल्या शक्तीप्रमाणे पैशाचे किंवा अन्नाचे दान गरीबांना करावे. त्या दिवशी केलेले दान अल्प फल देणारे असते. 'विजया सप्तमी' ला केलेली दाने, तप, होम आणि उपवास सर्व पापाचा नाश करणारे तर असतेच; पण आपल्या मनातील इच्छा व संकल्पसुद्धा यामुळे त्वरित पूर्ण होतात.

(3) रविवारी लवकर उठावे व प्रतिर्विधी आणि स्नान वगैरे करून चहापान न करता सोबतचे यंत्र भूर्जपत्रावर किंवा कागदावर काढावे. त्यासाठी हळद बारीक वाटून ती पाण्यात मिसळावी व लेखणी म्हणून डाळिंबाची बारीक फांदी घ्यावी. हळदीच्या मिश्रणाने व डाळिंबीच्या काडीने काढलेल्या यंत्राखाली आपली जी इच्छा किंवा संकल्प असेल, तो थोडक्यात लिहावा. नंतर या भूर्जपत्रावर कापूस पसरावा व डाळिंबाच्या लेखणीने वात तयार करावी व समईत ठेवून ती प्रज्वलित करावी. यानंतर हळदीच्याच माळेने ' ॐ ह्रीं हंस:' या भास्करबीजाच्या मंत्राचा एक हजार एकशेएक वेळा जप करावा. ही साधना सात रविवार करावी. आपली जी इच्छा अगर संकल्प असेल, तो सातव्या रविवारच्या आतच पूर्ण होतो.

बत्तीसा यंत्रमहत्त्वाची टिप...

संबंधिक साधनाक्रीया संबंधित साधना तज्ञांच्याच मार्गदर्शनाखाली कराव्यात.
Post a Comment

0 Comments

0