दत्ततत्व ( साध्य ) व हठयोग ( साधन ) म्हणजे दत्तप्रबोधिनी आचरण ( समाधि )


दत्तावतारी श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामीं महाराजांनी दत्ततत्वाचा दास्यभक्ती व हठयोग मार्गातुन सुनिश्चित दत्तलय बद्ध प्रसार जनहीतासाठी सर्वाभुती होण्याहेतु अतोनात परीश्रम घेतले आणि आजही घेत आहेत. त्यायोगे सद्गुरु कार्यकारणभावावर आरुढ असणारी दत्तप्रबोधिनी योगशक्ती मुमुक्षुत्वाच्या प्राप्तीची तीव्र तळमळ असणाऱ्या भक्तगणांना निर्गुणाद्वारे अर्थात सुक्ष्म अभिव्यक्तीतुन आजही संधान साधुन देत आहेत. दत्तप्रबोधिनी सभासदांना सदगुरुंची समन्वय आत्मलिला कशी अनुभवता येईल यासाठीच दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट च्या माध्यमातुन जनलेख प्रकाशित करत आहोत.दत्तप्रबोधिनी उपासना मार्ग - श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य श्री कृष्णानंद विद्याभारती स्वामी महाराज

दत्ततत्व ( साध्य ) ओळख होण्याचा या पृथ्वीतलावर ऐकमेव मार्ग कोणता आहे ?


आध्यात्मवादाच्या परामर्शाने सनातन धर्मात गुरुशिष्यांचे ऋणानुबंधच नियाती चलायमानाने अधिकृत व तात्विक असतात. गुरु कसा असावा याचीही प्रार्थमिक प्राधान्यतः काही मुलभुत प्रावधाने आहेत. ज्यायोगे विनयशील प्रसंगावधान राहुन आत्मसमर्पणानेच सद्मार्ग प्राप्तीची अर्थपुर्ण आशा जागृत होऊ शकते. दत्ततात्विक सद्मार्गप्राप्ती हेतु सगुण रुपात स्थिर व मायेच्याही पलिकडे जाऊन साक्षीभावाने दत्तमार्ग अनुग्रहीत करणाऱ्या गुरुंनाच शरण गेलं पाहीजे. याची प्रमुख तीन लक्षणे खालीलप्रमाणे आहेत.  • १. गुरुंची ( सद्गुरु शिष्य परंपरेलाच अनुसरुन ) एकवचनी तळमळ फक्त आध्यात्मिक प्रगतीला अनुसरुनच असणारी पाहीजे. ईतर विषय रस घेणारा व देणारा गुरु विषयोपभोगी मायाधीन असतो. त्यायोगे यातील उचित फरक योग्य वेळी समजावा.
  • २. संबंधित गुरुंच्या मार्गदर्शनाने तुमच्या प्रस्थानापुर्वी एका तरी साधकाचं परित्राण दत्त आधिष्ठानातुन अनुभवातुन स्पष्ट झाले पाहीजे. त्यायोगे संबंधित गुरुची योग्यता त्यांच्याच संगतीतुन सहजच प्रकट होते. असे होकारार्थी आध्यात्मिक वातावरणच आपल्याला आत्मपोषक आहे.
  • ३. संबंधित गुरु पंचमहाभुतापलिकडील असायला पाहीजे म्हणजेच समाधी पुर्व प्रगाढ अवस्थेत स्थिर असला पाहीजे. जेथे वायु त्याला सडवु शकत नाही. जल डुबवु शकत नाही. आग जाळु शकत नाही. आकाश भ्रष्ट करु शकत नाही व माती त्यांना गाडु शकत नाही. वरील तिन्ही सुलक्षणांपैकी कमीतकमी एक तरी लक्षण स्वयंसिद्धतेच्या पार्श्वभूमीवर आपल्याला स्पष्ट करता आलं पाहीजे तरच तिथे थांबण्यात अर्थ आहे नाहीतर अतिलालसे पोटी तुमचाच गळा कापला जाईल यात शंका नाही.

वरील लक्षणांचा ज्या गुणिजनांना आकलन झालं अथवा होत नसल्यास पर्याय म्हणुन काय कराल ?


गुरुकृपेशिवाय कुणाचीही तीळमात्रही आध्यात्मिक प्रगती होऊ शकत नाही. जर तुम्हाला निष्ठावंत दत्ततात्विक गुरु व पाखंडी गुरुघंटालातील फरक करता येत नसल्यास सरळ सद्गुरुंना अनन्यभावाने शरण जावं याची कारणे खालीलप्रमाणे आहेत....  • १. गुरु सगुणात असल्याने माया, ईंद्र व कलीच्या अधीन आहे म्हणुन आत्मघात होण्याची ९९.९९% संभावना आहे तर सद्गुरु निर्गुण असल्याने माया, ईंद्र व युगातीत आहेत अर्थात सुर्य चंद्राच्याही पलिकडे आहेत म्हणुन त्यांच्या शरणाने आत्मसार्थक होणारच...!
  • २. गुरु दिक्षा तुम्ही घेतली तरीही तुम्हाला सगुणातुन निर्गुणाकडे यावच लागणार यात वेळ, ऊर्जा व ध्यासाचा अपव्यव होतो तर सद्गुरुंच्या सान्निध्यात फक्त ध्यास व जिज्ञासा अभिप्रेत आहे. त्यांना संबंधित दासाला दिक्षा असो अथवा नसो याने काहीही फरक पडत नाही.
  • ३. गुरुच्या मार्गदर्शनात विघ्र उत्पन्न झाल्यावर दुसऱ्या गुरुकडे गेल्यास सगुण भेदातुन भक्तीमार्ग खंडीत होण्याचा धोका असतो तर सद्गुरुंचे सान्निध्य निर्गुण असल्याने मायेला सगुणरुपात ढवळाढवळ करुन पथभ्रष्ट करता येत नाही.

दत्तप्रबोधिनी योगमार्ग सद्गुरुंच्या आधिष्ठानावर म्हणजे श्री दत्त महाराजांच अनुशासन व श्री काळभैरव शासनावर आधारीत आहे. जेथे साधकाला सगुणातुन निर्गुणात सहज प्रवेश मिळतो व सद्गुरुंशी अनायासे शाश्वत आत्मसंधान जोडले जाते.

दत्तप्रबोधिनीतील दत्ततत्व हठयोग सोबत शाश्वत समन्वय दत्तावतारी श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामीं महाराजांनी दत्ततत्वाचा दास्यभक्ती व हठयोग मार्गातुन सुनिश्चित दत्तलय बद्ध प्रसार जनहीतासाठी सर्वाभुती होण्याहेतु अतोनात परीश्रम घेतले आणि आजही घेत आहेत. त्यायोगे सद्गुरु कार्यकारणभावावर आरुढ असणारी दत्तप्रबोधिनी योगशक्ती मुमुक्षुत्वाच्या प्राप्तीची तीव्र तळमळ असणाऱ्या भक्तगणांना निर्गुणाद्वारे अर्थात सुक्ष्म अभिव्यक्तीतुन आजही संधान साधुन देत आहेत. दत्तप्रबोधिनी सभासदांना सदगुरुंची समन्वय आत्मलिला कशी अनुभवता येईल यासाठीच दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट च्या माध्यमातुन जनलेख प्रकाशित करत आहोत.

थोरले स्वामीं महाराजांनी दत्तभक्तांना दास्यभक्तीसोबत योगाभ्यास करण्याचेही मार्गदर्शन केले आहे. मानवी जीवनातील अंतिम धेय्य " समाधी " प्राप्त करणेंहेतु साधन + साध्य + समाधी आत्मिक शृंखला अधिकाधिक घट्ट होण्यासाठी अभिव्यक्तीच्या दोन्ही बाजुंना परिपक्व करावेच लागते. यातील स्थुल बाजु जी अत्याधिक जड आहे त्या प्रकृतीला अनुसरून दत्तप्रबोधिनीत पद्मासनयुक्त दत्तसाधनेचे प्रावधान आहे सोबतच देहाला पोषक असणाऱ्या योगाभ्यासाची विविध अंगे खालीलप्रमाणे आचरणात बसवणे अनिवार्य आहे...


१. आसन 


मनुष्याला नियतीने पाठीचा एक ताठ कणा दिलेला आहे जो ताठच राहीला पाहीजे. पाठीला बाक आल्यावर मनुष्य निरंतर व्याधीमुक्त राहु शकत नाही परिणामी देह दुःखाने ग्रस्त होऊन भौतिक जीवनाचीही नासाडी करवुन घेतो त्यात आध्यात्मही जीवनात अंधुकच राहुन जातं म्हणून दत्तप्रबोधिनीत पद्मासन व ईतर आध्यात्म व देहोपयोगी आसनांचे प्रात्यक्षिक विश्लेषणें दिली आहेत.


२. मुद्रा


मानसिक संतुलनासाठी मुद्रा महत्वाची आहे. विविध मुद्रेद्वारे देहातील शक्तीकेंद्रातुन अनायासे ऊर्जा संक्रमित करण्यात येते. योग साधनेत आसन जयाच्या माध्यमातुन मुद्रा सिद्ध करण्यात येते ज्यात दत्तप्रबोधिनीद्वारे साधकांमधे आत्मजिज्ञासा वाढवलीं जाते.


३. बंध


देहातील विविध स्थुल व सुक्ष्म कोषाची स्वच्छता + ग्रहण क्षमता व कार्यक्षमता अधिकाधिक शाश्वतेच्या आधारावर सक्रीय करण्यासाठी बंधांचा वापर करण्यात येतो यात मुलबंध + उड्डीयान + जालंदर बंध करण्यात येतात. 


४. नाडीशोधन व प्राणायाम


देहातील नाडी शुद्धी होण्याने देहातील आत्मा देहापलिकडे जाण्याचा मार्ग प्रशस्त होतो त्यायोगे अत्याधिक पायाभुत योग आसाने व श्वास प्रश्वासाच्या सारावाने बंधात्मक प्राणायामावर जोर दिला जातो. प्राणांना देहस्थ आराम अथवा स्थिर केल्याने साधकाला देहाबाहेरील अतिरिक्त प्राणवायु अथवा oxygen ची गरज भासत नाही. त्याचे स्थुलकायेचं चलनवलन सुक्ष्मस्तरावर होते. ज्या स्थितीत साधक जीवनमुक्तावस्थेचा अनुभव सहज प्राप्त करवुन घेतो. दत्तप्राबोधिनी योगाद्वारे दत्त आधिष्ठानातुन सद्गुरुकृपे थोरले स्वामीं महाराजांना अभिप्रेत असाणारी योगिक अभिव्यक्ती सहज प्राप्त होते.


संपर्क : श्री. कुलदीप निकम 
Dattaprabodhinee Author )

भ्रमणध्वनी : +91 9619011227 
Whatsapp Or Sms Only )

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट सभासदत्व उपयुक्तता...!

शरीर रचना विज्ञान ( Body structure ) आध्यात्मिक क्षेत्र

सहज समाधी योग : नाम प्राणायाम व त्रिवेणी बंध

दत्त उपासना, दत्त संप्रदाय ( Datt Sampraday ) व साधन, साध्य, समाधी

मनाची शक्ती... त्राटक विद्या ( Tratak Vidya ) म्हणजे काय ? त्राटक विद्या व साधना महत्व...!
GET FRESH CONTENT DELIVERED BY EMAIL:


FOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीतीCure Problems With Divine Powers. 100s Of People Cured ! Chakra Healing balancing. Ancient Indian Science. Based on Ashtaang Yog. Learn Yogic Healing. Types: Learner's Workshops, Stress Management, Divine Karma Cleansing, Mind empowerment, Chakra Balancing. - Visit Website Here !


Embed दत्तप्रबोधिनी न्यास on Your Site: Copy and Paste the Code Below