सुर्य त्राटक ( Sun Tratak ) - एक अद्भुत रहस्यमय विद्या - Real unknown secrets explained


त्राटक साधनेत सुर्य त्राटक साधनेस अनन्यसाधारण महत्त्व आहे. या त्राटकाचा अभ्यास आध्यात्मिक जीवनास पुष्कळ लाभदायक ठरतो.

त्राटक साधनेत सुर्य त्राटक साधनेस अनन्यसाधारण महत्त्व आहे. या त्राटकाचा अभ्यास आध्यात्मिक जीवनास पुष्कळ लाभदायक ठरतो.

योगक्रीया शास्त्रानुसार सुर्यत्राटकाचा नियमित सराव केल्यास संपुर्ण सुक्ष्म भुवनांचे प्रत्यक्ष ज्ञान होते. भुवन शब्दाचा तात्पर्य येथे चतुर्दश लोकांशी आहे. सात उर्ध्व लोक आहेत - भूर्लोक, भूवर्लोक, स्वरर्लोक, महर्लोक, जनलोक, तपोलोक व सत्यलोक असे अंतर सुक्ष्मक्रम आहेत. म्हणजेच हे लोक ऐकमेकांमधे सामावलेल्या सुक्ष्ममाध्यमाद्वारे जोडलेले आहेत. त्यात सत्यलोक हे अंतिम सुक्ष्मपर्व जेथे परमात्मा स्थित असतो.


सात अधोलोक आहेत - महातल, रसातल, अतल, सुतल, वितल, तलातल आणि पाताल असे बाह्य सुक्ष्मक्रम आहेत. पाताल हे प्रथम बाह्य सुक्ष्मपर्व आहे जेथे परमात्मा स्थित आहे. पाताळस्थित वर्गीकरणात वैकुंठ, रुद्रलोक व भरतखंडाचे विविध लोक आहेत. नरक कोठी पाताळलोकातच मोजण्यात येते. त्या नरक कोठीत अजुन खोलवर ऐकवीस कोठ्या आहेत. ईतर महातल ते तलातल येथे नागदेव, अनंग देवांचा आणि दैत्याचा वास असतो.


सुर्य त्राटक साधना करणारा साधक या क्षेत्रात यश मिळवतो. तेव्हा तो चतुर्दश लोकांमधे काय घटना घडत आहेत. हे अंतरज्ञानाने पाहावे तसे स्पष्प घटनाचित्र पाहु शकतो. पंचायतन शास्त्रात पाच देवांचे माहात्म्य वर्णित केले आहे. त्यात भगवान सुर्य ऐक आहेत. भगवान सुर्य चेतना आहेत. प्रेरकता चेतनेचाच गुण आहे. परंतु दुर्दैव असे की आज आपण सुक्ष्म अनुभुती विसरत आहोत.


ज्यांना दृष्टीदोष आहे कींवा नेत्रांची शक्ती वाढवायची आहे त्याकरीता सुर्यत्राटक एक महान योग साधना आहे. या साधनेमुळे नेत्रांना अतिशय तेज येते. मनाची शक्ती तसेच आत्मबल वाढते. शरीर आरोग्य संपन्न होते. अनेक सिद्धी साधकाला प्राप्त होतात.

महत्त्वाची टिप...

संबंधिक साधनाक्रीया संबंधित साधना तज्ञांच्याच मार्गदर्शनाखाली कराव्यात.


0