चंद्र त्राटक ( Moon Tratak ) - चंद्रकोर आणि प्राणशक्तीचा रहस्यमयी संबंध - Real unknown secrets explainedशुक्लपक्ष व कृष्णपक्ष अष्टमी, पौर्णिमा व अमावस्या ह्या काळचक्रांची मर्यादा आज मनुष्यासाठी फक्त एका दिनदर्शिकेपुरतीच आहे. चंद्राचा आपल्या मनावर, शरीरावर व सृष्टीवर होणाऱ्या सखोल परिणामांचा प्रभुत्ववादी अभ्यास आजच्या पिढीला अत्यंत दुर्मिळ झाला आहे. चंद्र त्राटक ही विद्या 'दुरदर्शी' सिद्धी देणारी ऐकमेव ब्रम्हांडीय विद्या आहे.


शुक्लपक्ष व कृष्णपक्ष अष्टमी, पौर्णिमा व अमावस्या ह्या काळचक्रांची मर्यादा आज मनुष्यासाठी फक्त एका दिनदर्शिकेपुरतीच आहे. चंद्राचा आपल्या मनावर, शरीरावर व सृष्टीवर होणाऱ्या सखोल परिणामांचा प्रभुत्ववादी अभ्यास आजच्या पिढीला अत्यंत दुर्मिळ झाला आहे. चंद्र त्राटक ही विद्या 'दुरदर्शी' सिद्धी देणारी ऐकमेव ब्रम्हांडीय विद्या आहे.

दुरदर्शी शक्तीं म्हणजे काय ?


सामान्यतः पृथ्वीचे कालचक्रात दोन भाग पाहाण्यात येतात. एक प्रकाशित आणि दुसरा अंधकारमय...! प्रकाशित भाग सुर्याकडुन व्यापलेला असतो जो अभंग आहे अथवा अखंड आहे. सुर्याच्या कलेमधे फरक पडत नाही अथवा तो अस्त होत नाही याचा अभिप्राय अभंग असा आहे. अंधकारमय भाग चंद्राकडुन व्यापलेला असतो जो भंग अथवा खंडीत आहे कारण चंद्र काळचक्राप्रमाणे स्वतःची कला बदलत असतो.दुरदर्शी अथवा दुरदर्शन शक्ती हीचा थेट संबंध आपल्या देहात स्थित असलेल्या बर्हीमनाशी आहे. जेथे आपण आपल्या मानसिक मर्यादेच्याही पलिकडे जाऊन अशा गोष्टी पाहु शकतो आणि समजु शकतो ज्या आपल्या आणि आपल्या सभोवतालच्या जीवनावर अकस्मात परिणाम करतात. ज्याअर्थी आपल्याला सावधानता बाळगून पुढील व्यवहार करता येईल आणि फसवणूक किंवा नुकसान टाळता येईल.

आपल्या डोळ्यांची दूरवर पाहाण्याची शक्ती सर्वसाधारण चार-पाच फर्लांगाची असते. त्या पलिकडील वस्तु अथवा वस्तुस्थिती आपण पाहु शकत नाही. दुरच्या पदार्थांवर चंद्र त्राटक केल्यास, आपल्या डोळ्यांची दुरवर पाहाण्याची शक्ती सर्वसाधारण नजरेच्या तुलनेत खात्रीने वाढते. बाह्यचक्षूंची शक्तीत वाढ झाल्यावर अंतःचक्षूंची दुरवर पाहाण्याची शक्तीही आपोआप वाढते. त्या मुळे दुरदर्शन सिद्धीसाठी चंद्र त्राटक महत्त्वाचे आहे.


चंद्र त्राटकामुळे आत्मबळात खुप वाढ होते. आकर्षणशक्ती व विद्युतशक्तीची वाढ होते. आपल्यात असलेल्या आकर्षण शक्तिंचा अनुभव येऊ लागतो. दुसरी व्यक्ती केवळ आपल्या दृष्टीक्षेपातुनच आपल्याला मान्य करते. चित्तवृत्तीला एक विलक्षण प्रकारची बळकटी येऊन आपले संस्कार, विचार आणि आचार सर्वसंमत होतात. चंद्र त्राटक एक प्राणाकर्षण विद्या असल्यामुळे ज्या मानवांना व्यक्तीमत्व विकास करण्याचा आहे ते या साधनेचा निश्चितच अपेक्षित आणि अनपेक्षित असे दोन्ही फायदे मिळवू शकताता.


चंद्रकलेच्या अभ्यासाप्रमाणे अमावस्या ते पौर्णिमा व पौर्णिमा ते परत अमावस्या अशा पक्षकारणात अनुक्रमे चंद्रकला हळुहळु वाढत जाऊन पौर्णिमेपासुन परत हळुहळु कमी होऊन शुन्य होते. याप्रकारे अमावस्या व पौर्णिमा हे सुमेरु आहेत ज्यांचे उल्लंघन होत नाही त्याअर्थी आपल्या भारतीय संस्कृतीत पौर्णिमेला सद्गुरुंचे पुजन केले जाते. त्याच बरोबर अमावस्येला महाशिवरात्रीसारखे मोठे सण साजरे केले जातात.


चंद्र त्राटक विद्येद्वारे पोर्णिमा ते अमावस्या आणि अमावस्या ते पौर्णिमा यातील चंद्रकलेवर होणारा आपल्या मनावर आणि देहावर होणाऱ्या परिणामांची पुर्वसुचना आपल्या अतींद्रींय शक्तींना प्राप्त होते. एक चंबकत्वीय तत्व अनुभवास येऊन सुक्ष्म जीवनाची जाणीव होण्यास मदत होते. आध्यात्मिक मार्गावर वाटचाल करण्यासाठी ही साधना महत्त्वाची आहे.


शिवपुराणात उल्लेख असल्याप्रमाणे भगवान शिवाने श्री काळभैरव अवताराबद्दल बदलत्या चंद्रकलेवर एक सुक्ष्म ज्ञान दिले ते असे, ' जे साधक माझी म्हणजे भगवान शिवाची उपासना करतात आणि श्री काळभैरवाला मानत नाहीत अथवा त्याचे दर्शन घेत नाहीत, अशा भक्तांचे पुण्यफळ पौर्णिमेपासुन ते अमावस्येपर्यंत कमी होणाऱ्या चंद्रकलेप्रमाणे कमी कमी होते जाते व शेवटी अमावस्येला तो पुण्यहीन होतो. या उलट जे साधक माझी म्हणजे भगवान शिवाची उपासना करतात आणि त्यापुर्वी श्री काळभैरवाचे स्मरण करतात, अशा भक्तांचे पुण्य अमावस्येपासुन ते पौर्णिमेपर्यंत कलेकलेने वाढत असते.'शुक्लपक्ष व कृष्णपक्ष अष्टमी, पौर्णिमा व अमावस्या ह्या काळचक्रांची मर्यादा आज मनुष्यासाठी फक्त एका दिनदर्शिकेपुरतीच आहे. चंद्राचा आपल्या मनावर, शरीरावर व सृष्टीवर होणाऱ्या सखोल परिणामांचा प्रभुत्ववादी अभ्यास आजच्या पिढीला अत्यंत दुर्मिळ झाला आहे. चंद्र त्राटक ही विद्या 'दुरदर्शी' सिद्धी देणारी ऐकमेव ब्रम्हांडीय विद्या आहे.

चंद्र त्राटक एक पारलौकीक अनुभव देणारी अभुतपुर्व व मानवी वृत्तीच्याही पलिकडील शक्तीमय साधना आहे. त्या साधकांना चंद्र त्राटकाबद्दल अधिक माहीती अपेक्षित असल्यास खालीलप्रमाणे संपर्क करावा...!


ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...
All about Swami Samarth, Real unknown secrets, Step by step Spiritual Growth explained, Build your soul, Boost your life on top. - Visit Website Here !


Embed श्री स्वामी समर्थ योग व गहन आध्यात्मिक मार्गदर्शन on Your Site: Copy and Paste the Code Below