तत्वज्ञान म्हणजे काय ?- Read right Now


जे निरंतर निर्गुणरुपात अनंतकाळापासुन सृष्टीनियमन हेतु अणुरेणु व्याप्त आहे, जे सदैव प्रकृतीपुरुष व त्याही पलिकडील परमप्रकाश व्यापून आहे. जे कधीही भस्म होऊ शकत नाही. जे शाश्वत आहे. ज्याच्या ऐकमेव आधारावर नियती निसर्गाचे सुत्रसंचलन करते, अशा सत्वकारणाला " तत्व " असं म्हणतात. तत्वाचं आपल्या मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक व आध्यात्मिक जीवनात असलेल्या अग्रणीय स्थानाचे महत्त्व कळावं यासाठी दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट माध्यमातुन संस्थेच्या सभासदांसाठी प्रकाशित करत आहोत.


जे निरंतर निर्गुणरुपात अनंतकाळापासुन सृष्टीनियमन हेतु अणुरेणु व्याप्त आहे, जे सदैव प्रकृतीपुरुष व त्याही पलिकडील परमप्रकाश व्यापून आहे. जे कधीही भस्म होऊ शकत नाही. जे शाश्वत आहे. ज्याच्या ऐकमेव आधारावर नियती निसर्गाचे सुत्रसंचलन करते, अशा सत्वकारणाला " तत्व " असं म्हणतात. तत्वाचं आपल्या मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक व आध्यात्मिक जीवनात असलेल्या अग्रणीय स्थानाचे महत्त्व कळावं यासाठी दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट माध्यमातुन संस्थेच्या सभासदांसाठी प्रकाशित करत आहोत.

मानवी जीवनात तत्व जागृती कोठुन व कशी होते ?

आज समाजात अध्यात्माच्या नावाखाली चालणाऱ्या द्युत कर्मांपासुन अलिप्त राहाण्यासाठी तत्व संधान अवगत केले पाहीजे जी आज काळाची गरज आहे. सर्वसामान्यपणे मानवाला त्रिगुणाची माहीती असते ज्यात सत्वगुण, रजोगुण व तमोगुणाचा समावेश होतो. जन्मभर याच त्रिगुणांच्या त्रिकुटात कुटला गेलेला संसारीक मानव सद्गुरुकृपेशिवाय मुक्त होऊ शकत नाही. असे सद्गुरु तत्व दत्तप्रबोधिनी कार्यप्रणालीद्वारे सक्रीय आहे. अशावेळी " तत्व " आचरण अर्थात आत्मिक नियमनाद्वारे मनुष्य सत्व, रज व तमोगुणापासुन मुक्त होऊ शकतो कारण सत्व, रज व तमोगुणाचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे संबंध सगुणरुपाशी येतो जो मायेच्या बंधनात अडकलेला आहे. या परिस्थितीतुन मुक्त होण्याची तीव्र ईच्छा असल्यास तत्वाचा अभ्यास करावा तो ही अतीगांभीर्याने...!

सगुणरुपाने त्रिवार कष्ट देणाऱ्या त्रिगुणानेच आपला भक्तीमार्ग खंडीत होत असतो कारण सत्व, रज व तम मायेने ग्रासलेले आहे जे कधीही सुदृढ आध्यात्मिक वस्तुस्थितीसाठी कधीही पोषक नाही. म्हणुनच सगूण आध्यात्मातुन तत्व संधानाद्वारे निर्गुणात आत्मप्रवेश केला गेला पाहीजे आणि तो ही आपल्या देहाची व्याधीमुक्त साथ असतानाच...! नाहीतर जीवन फुकट गेलं असं समजायला काहीच हरकत नाही.तत्व संधान म्हणजे One Man Army...!

आयुष्यभर दुष्कर्मी ओंजळीने आध्यात्मिक जल पिणार्यांना कर्माचा शेवट अवगत नसतो. स्वार्थ साधण्यासाठी होणारी तडफड सहजच आध्यात्मिक चोरांना अनायासे फळते त्यायोगे अज्ञानी भावनिक मुर्ख लोकांचा गळा कापला जातो. सततच्या होणाऱ्या फसवेगिरीमुळे मनुष्य मुळ आध्यात्मापासुन दुरावत चालला आहे. यात बदल घडावा असा ध्यास असेल तर तत्वाचा अभ्यास करावा.

दैविक, भौतिक व आध्यात्मिक दोषांचे समुळ निराकरण तत्वाच्याच माध्यमातून होते. जे दत्तप्रबोधिनी तत्वातुन सहज साध्य आहे. तसा निर्गुणभाव प्रकट करता आला पाहीजे, जो त्रिगुणातीत आहे. ऐकदा की आपण तत्वातुन जीवन जगण्याची सुरवात केली की, निर्गुणातुन आपल्या सगुणाला सहजच सद्गुरुकृपे लगाम बसते. जिथे विलक्षण आत्मिक शांतीचा अनुभव येतो. जे एकदा अनुभवल्यावर अनायासे आपला आत्मविश्वास सद्गुरुंप्रती अधिकच दृढ होतो.तिथुन पुढे कधीही आपल्याला कोणत्याही मध्यस्थी, दलाल अथवा कर्मकांडाची कधीही गरज भासत नाही. याची स्पष्ट जाणीव होते. मुळातच आध्यात्म अगदी सोपे व सरळ आहे. आजच्या धर्म मार्तंडांनी स्वतःच्या मतलबासाठी पुस्तकी ज्ञानाद्वारे मुद्दाम प्रकाशन विस्कळीत आणि अशुद्ध करवुन घेतलेलं आहे ज्यात अज्ञानी मुर्ख सहज फसतात.यातुन बाहेर पडायचय तर तत्व ऐकमेव आश्रयस्थान आहे. वस्तुतः धर्म मार्तंडांना कोणाचीही आध्यात्मिक प्रगती होऊ द्यावयाची नाही कारण ते स्वतः अशुद्ध व सडलेले असतात.ऐसे कैसे झाले भोंदू l कर्म करुनी म्हणती साधू ll

अंगी लावूनिया राख l डोळे झाकून करती पाप ll

दावून वैराग्याच्या कळा l भोगी विषयाचा सोहळा ll

तुका म्हणे सांगू किती l जळो तयांची संगती ll

दत्तप्रबोधिनी तत्व काय आहे...?

तत्व आचरण होण्यासाठी आपण नियमांच्या चौकटीत बसायला हवं... सवयी नियमांच्या आड येतात म्हणुन मनुष्य तत्वाचा टाळाटाळ करतो पण तत्व अभावी उद्भवणार्या परिणामांचा अभ्यास करत नाही आणि कालांतराने दुःखाच्या दरीत कोसळला जातो. ही तर मानवीवृत्तीची घोर शोकांतीका आहे. 

श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामीं महाराजांनी त्यांच्या दत्तकार्य काळात " दत्तप्रबोधिनी " नामक दत्तसंधानाची कार्यकारणशक्ती समाजहीतासाठी प्रकट केली. भगवान श्री दत्तात्रेय परम सद्गुरु महाराजांचा आपल्या जीवनात कशाप्रकारे प्रत्यक्ष समन्वय साधता येईल याच हेतुने थोरले स्वामीं महाराजांनी दत्तप्रबोधिनी कार्यकारण तत्व प्रसारित केले.भगवान श्री दत्तात्रेय परम सद्गुरु महाराजांचा बोध होण्यापुर्वी आवश्यक असणारी दत्त प्रबोधावस्था व दत्तप्रबोधावस्थेला जागृत करणारी कार्यकारण भावारुढ तात्विक शक्ती म्हणजेच " दत्तप्रबोधिनी तत्व ". जे सत्व, रज व तमौगुणाच्याही पलिकडे आहे. जे साध्य केल्यावर जीवनातील आध्यात्मिक स्तर अत्यंत सरस व बळकट होतो.ज्या आत्मपरिवर्तनात कोणतीही मध्यस्थी अथवा देहीक ढवळाढवळ नाही. दत्तप्रबोधिनी कार्यकारण तत्व...श्री दत्त महाराजांचे अनुशासन व श्री काळभैरव शासनावर आधारलेले आहे. 


ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

आत्मरत्न ( Soul Gem ) म्हणजे काय ? माणुस का भरकटतो ?

अध्यात्माअभावी मानवी जीवनाची दुरावस्था आणि शेवट...!

श्री काळभैरव माहात्म्य

ब्रम्ह अंतःकरण कसे बनते ? अनुकरणशील स्वतंत्र सद् मार्ग...!

आध्यात्मिक श्रीफळ व चारित्र्यपूजनाचे माहात्म्य ( Spiritual Disciplines )

अंतरीक परिणामकारक वासना बीज कसे ओळखावे ?
0