विज्ञान आणि अंधश्रद्धा : श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील प्रत्यक्ष डोळस भेद कसा करावा...?


संसाराचं राहाटगाडग़ ढकलण्यासाठी मनुष्याला अतिरिक्त कार्यक्षमतेची गरज तर पदोपदी भासतेच ; पण अशा कामनापुर्ती हेतु आंधळा विश्वास कुठे घेऊन जातो, तसा शेवट कुठे होतो ? याचा परिपक्व अभ्यास कृतीपुर्वी मनुष्य करत नाही. त्यायोगे हाती अपेक्षाभंग आणि अपमानच शिल्लक राहातो. अशा परिणामांची पर्वा करत असाल तर श्रद्धा आणि अंध्रश्रद्धा यातील डोळस फरक आपल्याला क्षणात साधता आला पाहीजे. जेणेकरुन परिस्थितीचा परिपक्व पुर्वाभ्यास होऊन शेवट गोड होतो. यासाठीच दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट माध्यमातून सभासदांसाठी अभिलेख प्रकाशित करत आहोत.संसाराचं राहाटगाडग़ ढकलण्यासाठी मनुष्याला अतिरिक्त कार्यक्षमतेची गरज तर पदोपदी भासतेच ; पण अशा कामनापुर्ती हेतु आंधळा विश्वास कुठे घेऊन जातो, तसा शेवट कुठे होतो ? याचा परिपक्व अभ्यास कृतीपुर्वी मनुष्य करत नाही. त्यायोगे हाती अपेक्षाभंग आणि अपमानच शिल्लक राहातो. अशा परिणामांची पर्वा करत असाल तर श्रद्धा आणि अंध्रश्रद्धा यातील डोळस फरक आपल्याला क्षणात साधता आला पाहीजे. जेणेकरुन परिस्थितीचा परिपक्व पुर्वाभ्यास होऊन शेवट गोड होतो. यासाठीच दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट माध्यमातून सभासदांसाठी अभिलेख प्रकाशित करत आहोत.

कमकुवत व अज्ञानी मानसिकतेची परिपुर्ण ओळख काय आहे ?
काल्पनिक दुनियेत जगणं हीच दुबळी मानसिकता समजावी. माणसाच्या जीवनाचा जन्मापासुन ते मृत्युपर्यंताचा जीवन आलेख निरनिराळ्या मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक व आध्यात्मिक चढ उताराने भरलेला असतो. हे पाचही स्तर एकमेकांशी भावनिक व ज्ञान संवेदनेच्या माध्यमातून परीणामस्वरुप जोडलेले आहेत. ज्यावेळी आपण काल्पनिक अथवा मृगजळवादी भुमिकेत असतो तेव्हा आपल्या मानसिकतेचं वस्तुस्थितीरुपात बदल कधीही घडुन येत नाही. उलट वेळ, ऊर्जा आणि पैसा फुकट जाऊन अधिकाधिक खड्ड्यात रुतत जातो. ह्याच काल्पनिक जीवनाचा " अंधश्रद्धा " पाठीचा कणा आहे. जो योग्य वेळेतच मोडता आला पाहीजे. अन्यथा सर्वनाश निश्चितच आहे.

आध्यात्मिक जीवनात पिढीजात चालत येणाऱ्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील नेमका फरक ओळखण्यासाठी अधी मनुष्याने वास्तविक जीवन स्वीकारले पाहीजे. कोणत्याही जनवार अथवा जीवजंतुच्या उपहासाचा मानवी सुक्ष्म आध्यात्मवादाशी संबंध कधीही नसतो. उदा. मांजर आडवं जाणं, कुत्र रडणं, कावळा घास न घेणे वगैरे. याचा शोक करणे अज्ञान व मुर्खतेचं प्रतिक समजावं. ही सगळी मायेची मनुष्याला भटकवण्याची प्रावधाने आहेत. यात फसु नये. याच सोबत... बाबा, बुवा, भगतगिरी, अंगात देवी देव येणे ही सुद्धा वास्तविक जीवनाला अनुसरुन आंधळी प्रलोभने आहेत. यातही फसु नये. अशा अज्ञानी वर्तुळात आपण प्रवेश केल्यावर आपली कधीही सर्वांगीण प्रगती होणार का ? हा प्रश्न स्वतःला केला पाहीजे.


आध्यात्मिक अनुभव आणि प्रगती हवी पण ती डोळस व प्रात्यक्षिकतेच्या आधारावरच असली पाहीजे. " आध्यात्म " प्रत्येक जीव देहात सामावलेलं आहे त्याची फक्त ओळख पटायला पाहीजे. ही ओळख होण्यासाठी योग्य माध्यमाची आवश्यकता असते. माध्यमच जर अंधश्रद्धेला पोषक असेल तर योग्य आध्यात्मिक जीवन जगता येईल का ? मनाला अपेक्षित असणारा दैवि आधार आपल्याला प्राप्त होईल का ? आपण भवसागराच्या त्या पैलतीरी पोहोचु शकतो का जिथे स्वामीं आपली वाट पाहात असतात ? असे प्रश्न स्वतःलाच केले पाहीजे. म्हणुन आपण आणि स्वामींमधे कोणतेही माध्यम न स्वीकारता आपलं आध्यात्मिक आयुष्य कसं बळकट होईल याचाच विचार करावा.


संसाराचं राहाटगाडग़ ढकलण्यासाठी मनुष्याला अतिरिक्त कार्यक्षमतेची गरज तर पदोपदी भासतेच ; पण अशा कामनापुर्ती हेतु आंधळा विश्वास कुठे घेऊन जातो, तसा शेवट कुठे होतो ? याचा परिपक्व अभ्यास कृतीपुर्वी मनुष्य करत नाही. त्यायोगे हाती अपेक्षाभंग आणि अपमानच शिल्लक राहातो. अशा परिणामांची पर्वा करत असाल तर श्रद्धा आणि अंध्रश्रद्धा यातील डोळस फरक आपल्याला क्षणात साधता आला पाहीजे. जेणेकरुन परिस्थितीचा परिपक्व पुर्वाभ्यास होऊन शेवट गोड होतो. यासाठीच दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट माध्यमातून सभासदांसाठी अभिलेख प्रकाशित करत आहोत.

परिपक्व व स्वामी मानसिकतेची परिपूर्ण ओळख काय आहे ?

" सदैव सद्गुरुंच्या संधानात निमग्न राहुन आत्मिक जबाबदारी पार पडत राहाणे " हीच मनुष्याची परीपक्व मानसिकता आहे. अशा मनुष्याला " स्थितप्रज्ञ " असेही संबोधतात याचा अर्थ असा की, " सुख असो की दुःख, शुद्ध असो की अशुद्ध, ज्ञान असो की अज्ञान अशा कोणत्याही परिस्थितीशी समांतर राहुन साक्षी भावाने स्वामी प्राप्तीला वाहुन घेणे यालाच " स्वामी मानसिकता " असं म्हणतात जे तत्वाच्या आधारावर दत्त आधिष्ठानात सामावलेले आहे. भौतिक जीवनाच्याच परामर्शाने म्हणजे " स्वकीयांसोबत झालेली ताटातुट व आदारलेल्या कलंक आणि अपमानजनक वागणुकीतुनच " आपण आपली अंतर्मुखता सुनिश्चित करु शकतो. त्यासाठी कोणत्याही आध्यात्मिक दलालाच्याआधीन जाण्याची गरज नाही. आवश्यक आहे तर फक्त तत्वाचा गंभीर अभ्यास व तसं आचारण होणं... ! अशाप्रकारे सद्गुरुंसोबत आपलं संधान होतच... असा आमचा स्वतःचा अनूभव आहे.

श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील योगीक फरक काय आहे ?

दत्तप्रबोधिनी योगमार्गाद्वारे संबंधित मानवी जीवनात अमुलाग्र होकारार्थी बदल घडुन येणं स्वाभाविक आहेच पण प्रारंभावस्थेत थोडे फार कष्ट तर सोसावेच लागणार... याला पर्याय नाही. म्हणजे भव रोगीला अत्यंत कडु औषध बळपुर्वक घशात घातलेच जाणार... जो औषध प्राशन करतो तो काही काळातच बंधनमुक्तीचा अनुभव मिळवतो. अशावेळी औषध घेताना... आम्हालाही भव रोग्यांची ओरडाओरड सहन करावीच लागते पण आम्ही परिणाम जाणतो. जे वेळेवर संबंधिताला स्वामीसानिध्य प्राप्त करवुन देते.

श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक खालीलप्रमाणे...


  • १. अंधश्रद्धा बहिर्मुखी तर श्रद्धा अंतर्मुखी
  • २. अंधश्रद्धा भौतिकतेवर तर श्रद्धा आत्मस्थितीवर
  • ३. अंधश्रद्धा अज्ञानावर तर श्रद्धा ज्ञानावर
  • ४. अंधश्रद्धा शोकग्रस्त तर श्रद्धा अशोकी आनंदी
  • ५. अंधश्रद्धा आंधळी तर श्रद्धा डोळस
  • ६. अंधश्रद्धा मृगजळवादी तर श्रद्धा वास्तविक
  • ७. अंधश्रद्धा अंत दुःखद तर श्रद्धा अंत माधुर्यपुर्ण.

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...


अध्यात्माअभावी मानवी जीवनाची दुरावस्था आणि शेवट...!