आपल्या देहस्थित एकूण ११ रुद्रांपैकी प्राण, अपान, समान, व्यान व उदान हे प्रमुख रुद्र आपले सुक्ष्मदेह सुत्रसंचलन हेतु कारणीभुत आहेत. आपल्या देहात एक विद्युत चुंबकीय तत्व अस्तित्वात असते. हे विद्युत चुंबकीय तत्व आपल्या देहांतर्गत असलेल्या चैतन्यशक्तीची प्रवाहवाहीनी आहे.
सर्व श्री दत्त क्षेत्रे व सद्गुरु महाराजांच्या समाधीची रोज सकाळी काकडा आरती घेण्याची पुरातन परंपरा आहे. हा काकडा करणे म्हणजे काय...? याचा अभिप्राय समजावुन घेणे महत्त्वाचे आहे. श्री दत्तात्रेय स्वामीं महाराजांची काकडा आरती प्रभात काळी घेण्याची परंपरा आहे. प्रभातकाळीच का म्हणुन महाराजांची काकडा आरती केली जाते आणि त्याचा आपल्या शरीराशी आणि आत्मानुसंधानाशी काय संबंध आहे हे जाणुन घेतल्याशिवाय सद्गुरु कृपा होणे केवळ अशक्यच समजावेत.
सर्व श्री दत्त क्षेत्रे व सद्गुरु महाराजांच्या समाधीची रोज सकाळी काकडा आरती घेण्याची पुरातन परंपरा आहे. हा काकडा करणे म्हणजे काय...? याचा अभिप्राय समजावुन घेणे महत्त्वाचे आहे. श्री दत्तात्रेय स्वामीं महाराजांची काकडा आरती प्रभात काळी घेण्याची परंपरा आहे. प्रभातकाळीच का म्हणुन महाराजांची काकडा आरती केली जाते आणि त्याचा आपल्या शरीराशी आणि आत्मानुसंधानाशी काय संबंध आहे हे जाणुन घेतल्याशिवाय सद्गुरु कृपा होणे केवळ अशक्यच समजावेत.
देहांतर्गत असलेली अविद्या, वासना बीज, माया व तामसी वृत्तींना नाम रुद्राग्नित दहन करणे व महाराजांच्या दत्त स्वरुपाचे शाश्वत स्मरण होता येईल असे आत्मस्नेह जागृत करणे. याचा अर्थ काकडा करणे असा आहे. हा काकडा प्रभात काळीच केला जातो याचे तात्त्विक कारण असे की, मनुष्य जन्माला आल्यापासुन मरेपर्यंत झोपाच काढत असतो. सद्गुरु कृपायोगाला अनुसरुन जर त्याची झोप मोडलीच तर आत्म प्रभात होणार हे निश्चितच...! ही आत्मप्रभात होताना मनोमय कोषाचा चित्त संधानात्मक सदुपयोग करता दत्त ध्यानशिखर गाठता आले पाहीजे. हे ध्यानयोग सिद्ध होणे हेतु आपल्या देहांर्गत प्राण, अपान, समान, व्यान व उदान यांचा योग अथवा ऐकत्रीकरण करता आले पाहिजे.
देह स्थित श्वासात्मक ईडा व पिंगला नामक नाडी व्यतिरिक्त सुषुम्ना नाडी असते, हीच ब्रम्हांडीय नाडी अथवा नील सरस्वती असे संबोधले जाते. ह्या नाडीत आपल्या देहस्थित रुद्रांचा सद्गुरुकृपे प्रवाह होणे म्हणजे हंसः सोहं अर्पण करणे असा अर्थ होतो.
मणिपूर चक्र अतिरहस्यमय आणि शरीराचे केंद्रस्थान आहे. हंसः सोहं आजपाजपाचे परीचालन येथुनच कार्यान्वित होते. हंसः अजपाजप मानवाला जन्माला येण्यापुर्वीच गर्भधारण अवस्थेत असताना प्राप्त होतो. आपल्या श्वासांचे संक्रमण सुनिश्चित कालावधीपर्यंत सुव्यवस्थित राहाणे हेतु ब्रम्हदेवाने हंसःत्मक बीजाचे अंतर्भुत नियोजन रचले. ज्या वेळी सद्गुरुकृपा होऊन भाव पालटला जातो तेव्हा हंसःचे स्वरुप सोहं आत्मनियोजनावर सक्रिय होते. आणि मानव हळुहळु सिद्धावस्थेला प्राप्त होतो.
मणिपूर चक्र साधना
आत्मप्राप्तीहेतु ही प्रथम पायरी समजावी. मुलाधार व स्वाधिष्ठान हे चक्र साधन सत्वाची गंभीरता व सद्गुरु चरण प्राप्तीच्या सुदृढ निश्चयावर भर देतात तर मणिपुर चक्र सद्गुरु चरणांपर्यंत पोहोचण्याचा आत्म मार्ग प्रकाशित करते. आत्म प्रकाश येणे म्हणजेच अज्ञानरुपी अंधाराचे समुळ उच्चाटन होउन आत्मज्ञान व आत्मबळात वाढ होणे.
मणिपूर चक्र ब्रम्हांडाचे द्वार आहे. हे द्वार उघडणे हेतु मुलधार व स्वाधिष्ठानाची प्रबळ तत्वप्राप्ती असायला हवी. आपण जो सुर्य आकाशात बघत आहोत तेच ते मणिपुर चक्र जे आपल्या नाभीत स्थित आहे. या चक्रातील अग्नित्रिकोण अधोमुखी असल्यामुळेच आपण संसारात रमतो व ओझरता बैल होऊन मरतो.
साधना क्रिया व रुद्र ध्यानयोग
जेवणाच्या सरासरी २ तासानंतर सुरुवातीला २० मिनिटे रात्री झोपण्यापूर्वी आपल्या झोपण्याच्या ठिकाणी आसनस्थ होणे. सोबत एक भरलेल्या पाण्याचा ग्लास जवळ ठेवणे. नाथपंथातील प्रसिद्ध ध्यानयोग साधना - ३ मधे सांगितल्याप्रमाणे आपली चैतन्यावस्था धारण करा.
एकदाकी चैतन्य अवस्था धारण केल्यास आपले गुदद्वाराची जागा हळुहळु वरच्या दिशेला खेचण्याचा प्रयत्न करा. गूदद्वार आकूंचन करण्याच्या क्रियेला मुलबंध असे म्हणतात. मुलबंधचा चांगला अभ्यास करा. मुलबंध धारण करताना लिंगमुळाकडील जागा आपोआप वरच्या दिशेला ओढली जाते. कृपया मुलबंध साधनेवेळी सोडु नये.
समांतराने आपली नाभीसुद्धा आतल्या बाजुस खेचुन धरावी. नाभीबंध व मुलबंध यथाशक्ति धारण करा.
संबंधित मणिपुर चक्राची देवता रुद्र असल्याने यास्थानी आपण आपल्या बंद डोळ्यांसमोर " श्री स्वामी समर्थ महाराज आसनाधिस्थ आहेत व सोबत दोन्ही बाजुस श्री काळभैरव व श्री बटुक भैरव ऊभे आहेत" अशी प्रबळ धारणा करा. धान धारणा करताना हाताची ज्ञानमुद्रा असावी.
ही प्रार्थमिक क्रीया आहे. धारणा करुन दम भरल्यास हळुहळु लक्ष श्वासावर केंद्रित करा. आपला मुलबंध हळुहळु सोडा व दोन्ही तळहात ऐकमेकांना घासुन कपाळाला स्पर्श करा. डोळे उघडा.
मणिपूर चक्र शुध्दी ( Manipur Chakra Purification ) व दैनंदिन आध्यात्म