चक्र साधना - मणिपूर चक्र शुध्दी ( Manipur Chakra Purification ) व दैनंदिन आध्यात्म


आपल्या देहात मुळाधार चक्रापासुन ते मणिपुर चक्रापर्यंत एक भवविग्रही वलय असते. म्हणजे सत्व, रज आणि तम हे तिन्ही गुण आळीपाळीने अस्थिर होत असतात. हे तिन्ही गुण अथर्व अथवा स्थिर करणें हेतु मणिपुर चक्र अतिसहाय्यक आहे.

मुलाधारचक्राशी आपली अन्नमय वासना अन्नमय कोषला जोडलेली असतो. स्वाधिष्ठान चक्राशी आपली देहीक वासना अर्थात आनंदमय कोषाशी जोडलेली असते. मणिपूर चक्राशी आपली ईच्छा वासना मनोमय कोषाला जोडलेली असते. ह्या तिन्ही संबंधित वासना आळीपाळीने माणसाला हैरान करुन सोडतात व त्याची सुक्ष्म जाणीवही होत नाही.


नाभीस्थित मणिपूर चक्र अग्नि तत्वाचे प्रतिक आहे. रं बीजयुक्त या चक्राचे वाहन मेंढा आहे. रुद्र देवता आहे. आपल्या वृद्धत्वाचेही रहस्य याच चक्राशी जोडलेले आहे. मनुष्य म्हातारा का होतो ..? याचे मुळ कारण मणिपूर चक्रस्थित अधोमुखी अग्नित्रिकोण आहे.

आपल्या ब्रम्हरंद्ध्रातुन सतत सहस्त्रार चक्रस्थित शितल चंद्रमा अमृत रसाची धार देहात अधोमुखी दिशेला म्हणजेच खाली मुलाधार पर्यंत पडत असते. जे साधक खेचरी मुद्रा करू शकतात त्यांनाच या अमृत धारेची कल्पना असते. ही अमृत धार अधोमुखी असताना नाभीस्थित असलेल्या विरूद्ध त्रिकोण अथवा अधोमुखी त्रिकोणात येऊन मिळते.


मणिपुरस्थित अधोमुखी त्रिकोण विषाचे कार्य साधत असते. नाभीवर पडणारी अमृत धार अधोमुखि त्रिकोणामुळे तात्काळ लोप पावते. त्यायोगे मानवाला त्याचा काहीच उपयोग होत नाही. प्रथम अमृत धारेच नाभीस्थित अधोमुखी त्रिकोणामुळे लोप पावणे व अधोमुखी त्रिकोणातुन सतत विषस्त्राव स्वाधिष्ठान व मुलाधार दिशेला होणे. ह्या अनादी काळापासुन होणाऱ्या क्रियेमुळे आपण जन्म मृत्यूच्या दाढेत अडकलो आहोत. याच क्रियेमुळे आपण सर्व योनींत वृद्ध होऊन जीव त्यागत असतो.



मणिपूर चक्र शुदूधीकरणहेतु आवश्यक असलेली पुर्वतयारी...
  • १. सर्वप्रथम मुलबंध व नाभीबंधाचा दिवसाला कमीतकमी २० मिनिटांचा अभ्यास करावा. नाभीबंध म्हणजे आपली नाभी यथाशक्ति आत ओढून घेणे. ही क्रिया आपण दिवसभरातही करु शकता.
  • २. ध्यानयोगाचा प्रार्थमिक स्तरावर फक्त २० मिनिटांसाठी सराव अपेक्षित आहे.
  • ३. नाथपंथातील प्रसिद्ध ध्यानयोग साधना - ३ मधे स्पष्ट केलेली क्रिया करणे.
  • ४. शुद्ध शाकाहारी व चितपावन राहाणे.

मणिपूर चक्र जागृत होण्याचे प्रार्थमिक फायदे...
  • १. अकाली वृद्धत्व कमी होणे.
  • २. मन सतत आनंदात असणे.
  • ३. देहांतर्गत रहस्य जाणुन घेण्याची जिद्द तयार होणे.
  • ४. परमेश्वराचा कार्यकारण आत्मविश्वास तयार होणे.
  • ५. भक्तीमार्गात सायुज्यता अनुभवणे.
  • ६. निरंतर सद्गुरु दास्यभक्तीची आसीम उत्कंठा प्राप्त होणे.
  • ७. आचार विचार अतिशय तीक्ष्म व सरस होणै.
  • ८. आचरणात निरामय निर्विकार शांती प्रतीत होणे.
  • ९. सगुण आणि निर्गुणाच्याही पलिकडील अभिव्यक्तीची जाणीव होणे.
  • १०. ध्यान धारणेत कठोर अनुशासनाची प्राप्ती होणे.





ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...



बेल पत्र त्राटक ( Bilva patra Tratak ) - सोपी व सर्वश्रेष्ठ शिवशक्ती साधना

दासबोध ( Dasbodh ) परमतत्वाचे आत्मनिरुपण कसे करावे


प्रतिमा त्राटक ( Image Tratak ) - विचार संक्रमण करणारी विद्या...!


बैठकीचे आसन ( Spiritual Sitting Mat ) म्हणजे काय ? आध्यात्मिक आसनाचे प्रकार...!


पितृदोषांबद्दल ( Pitra dosh ) संवेदनशील आणि दैनंदिन जीवनाशी जोडलेलें दुष्प्रभाव ...!




0