मुलाधार चक्र ( Muladhara Chakra ) साधना व स्वामी ध्यानयोग


मुलाधार चक्र शुद्धी आणि दैनंदिन आध्यात्म ह्या अभिलेखाचा परामर्श घेऊन आणि दत्तप्रबोधिनी स्वामी साधकांची कृतीशील नित्यसेवा पार्श्वभूमीवर अवलंबुन पुढील योग क्रीयेचा प्रपंच करत आहे. या योगक्रियेत चिंतनात्मक वृत्ती जागृत होणे हेतु संबंधित मुलाधार चक्र शुद्धिकरण होणे महत्वाचे आहे. 



नित्य सद्गुरु उपासनेच्या आधारावर शुद्ध मुलाधार चक्राची लक्षणे खालील...

  • १. सहज नामस्मरण होणे.
  • २. मनाला शांती प्राप्त होणे.
  • ३. जीभेवर नियंत्रण येणे.
  • ४. आचरण शुद्ध असल्याची जाणीव होणे.
  • ५. जलद गतीने चालण्याची ईच्छा होणे.
  • ६. पहाटेच्या स्वप्नात शिवलिंग दिसणे.
  • ७. गुद द्वाराच्या दोन बोट उंचीवर सतत स्पंदने होणे.
  • ८. श्वासगती वाढणे.
  • ९. निवडक आहाराविषयी आसक्ती न राहाणे.
  • १०. स्वभाव ऐकांतप्रिय होणे.


मुलाधार चक्र साधना...

वरील प्रार्थमिक लक्षणांच्या अनूशंघाने मुलाधार चक्राची साधना करण्यास साधक तत्पर होतो. मुलाधार म्हणजे मुळ पाया अर्थात आध्यात्मिक पायाभरणी असे समजावे. हे चक्र तामसी वृत्तींनी वेढलेले असल्याने, साधकाला प्रारंभावस्थेत शुद्धीकरण हेतु काही प्रमाणात त्रास होण्याची शक्यता असते. हा त्रास फार काळ टिकुन न राहावा यासाठी श्री सद्गुरु दत्त महाराजांची निःस्वार्थी सेवा अनिवार्यआहे.

मुलाधार चक्र शुद्धीच्या लक्षणांचा अंतरंगात प्रकटीकरणाचा अनुभव येऊ लागल्यास खालीलप्रमाणे चक्र ध्यानयोग करण्यास सुरुवात करावी...



साधना क्रीया

सुरुवातीला २० मिनिटे रोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या झोपण्याच्या ठिकाणी आसनस्थ होणे. सोबत एक भरलेल्या पाण्याचा ग्लास जवळ ठेवणे ( साधनाअंती तहान लागु शकते ).  नाथपंथातील प्रसिद्ध ध्यानयोग साधना - १ मधे सांगितल्याप्रमाणे आपली चैतन्यावस्था धारण करा.

एकदाकी चैतन्य अवस्था धारण केल्यास आपले गुदद्वाराची जागा हळुहळु वरच्या दिशेला खेचण्याचा प्रयत्न करा. काही वेळेनंतर तुम्हाला मुलाधाराजवळ कंपने अनुभवण्यास सुरवात होईल. गूदद्वार आकूंचन करण्याच्या क्रियेला मुलबंध असे म्हणतात.




हा मुलबंध धारण करताना आपल्या बंद नजरेसमोर श्री स्वामी समर्थ महाराजांचे अजानुबाहु रुपाचे स्मरण करा.( लक्ष विचलित होता कामा नये ). हे स्मरण करत असताना मुलबंध सोडु नये. ही ह्या साधनेची प्रथम पायरी समजावी. अंतःकरण शुद्ध व पारदर्शक ठेऊन श्रद्धा आणि स्वामींवर अतुट विश्वासाने ही प्रार्थमिक साधना केली तर पुढील मार्ग महाराज स्वतः दाखवतात.


यथाशक्ति एकाग्रता करुन झाल्यानंतर, मुलबंध सोडा( गुदद्वाराचे आकुंचन थांबवा व ती जागा मोकळी सोडा ), डोळे उघडण्यापुर्वी आपल्या श्वासावर लक्ष केंद्रीत करा. अंदाजे ३ मिनिटानंतर आपले तळहात ऐकमेकांना घासुन उत्पन्न झालेल्या उर्जेने आपले कपाळ स्पर्श करुन हळुहळु डोळे उघडा.




ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...



मुलाधार चक्र शुद्धी आणि दैनंदिन आध्यात्म.