चक्र साधना - मुलाधार चक्र शुद्धी ( Muladhara Chakra Purification ) आणि दैनंदिन आध्यात्म.


संसारीक माणसाला रोजच्या धावपळीतुन काही मोकळा वेळही ईश्वर उपासनेसाठी मिळत नसेल तर, त्याने उपासनाच करु नये का...?

परीवाराच्या दोन वेळच्या जेवणाची तयारी करणेसाठी रात्रंदिवस जीवाचे रान करणाऱ्या घरातील प्रमुख व्यक्तिला स्वतःसाठी काही आत्मशांती नियोजानात्मक साधना नको का..?


आयुष्य बघता बघता, घट्ट धरलेल्या वाळुच्या मुठीप्रमाणे निसटुन जाईल. आणि जीवनअंती पश्चात्तापाशिवाय काहीच राहात नाही. त्यावेळी काय करणार...?



घरातील सर्व सदस्यांसाठी सरळ आणि सोपी साधना माहीती मागील भागात प्रकाशित केली. त्याच साधनेचा परामर्श घेऊन आपण आपल्या देहस्थित रहस्यांना कशा पद्धतीने उलगडवु अथवा ओळखु शकतो...! या हेतुने प्रथम भागात षट् चक्रांचा आपल्या नामस्मरण साधनांशी असलेला संबंध प्रकाशित करत आहे.


आपण आपल्या दैनंदिन जीवनात संसारीक लोकांसाठी अनुभवसिद्ध व सोपी साधना -१  ,  संसारीक लोकांसाठी अनुभवसिद्ध व सोपी साधना - २ आणि संसारीक लोकांसाठी अनुभवसिद्ध व सोपी साधना - ३ या साधनांचा अवलंब करत आहात असे असल्यास मुलाधार चक्र ते  सहस्रार चक्रापर्यंतची आपल्या शरीराशी निगडीत असलेली मुलभुत माहीती आपल्याला कळु शकेल. संसारीक लोकांसाठी अनुभवसिद्ध व सोपी साधना - १ या साधनेत आपली धारणा यथाशक्ति महाराजांच्या चरणांशी एकनिष्ठ करावी.

मुलाधार चक्र आणि आपले साधनामय शरीर

आपण कृतीतुन करत असलेल्या तीन्ही साधनांच्या सतत अभ्यासक विष्लेशणातुन आपल्या देहात स्थित असलेल्या जड प्रकृतीस अनुसरुन नाडी शुद्धीस सुरवात होते. आणि शरीरात हालके पणाची जाणीव तयार होते. या नाड्यांमधे ईडा, पिंगला व सुषुम्ना नाडीचा प्राधान्यातः समावेश होतो.

आपल्या देहातील गुद्दद्वाराच्या दोन बोटावर एक सुक्ष्म मुलाधार चक्र असते. दिवसातुन सातत्याने केलेल्या सहा सामुहीक नामस्मरणाच्या फळस्वरुप शरीर शुद्धीमार्फत मुलाधार चक्राची शुद्धीकरणाची सुरवात होते. हे मुलाधार चक्र पृथ्वी तत्वाचे प्रतिक आहे. लं बीज हा बीजोक्त मंत्र व लंबोदर ( श्री गणेश ) ही देवता आहे. डाकिनी ही मातृका बीज मंत्राची शक्ती आहे. ऐरावत या चक्राचे वाहन आहे. आणि चार दलिय बीजमंत्र आहेत.  हे चक्र आपल्या अन्नमय कोषाला अनुसरुन आहे.



मुलाधार चक्र जागृत करणे हेतु "संसारीक लोकांसाठी अनुभवसिद्ध व सोपी साधना" समजावुन घेणे मुळ पाया आहे. कारण आपली योग्य धारणा आपल्याला योग्य मार्गदर्शन करण्यास महत्त्वाची ठरते. आपले दैनंदिन सामुहीक नामस्मरणच आपल्याला शरीरशुद्धी करवुन देउ शकते. आपले देह स्थित पंचकोष आपल्याला संबंधित चक्र तत्वाशी एकबद्ध करवुन देऊ शकते.

मुलाधार चक्र जागृत करणे हेतु आपल्याला एकाच ठिकाणी तासन् तास बसुन ध्यान लावण्याची गरज नाही. हेच कार्य नित्य व्यवहार व कर्म करत असातानाही आपण करु शकतो. देह स्वतंत्र ठेउनच परमार्थिक प्रगती साधता येते.



मुलाधार चक्र जागृत होण्याचे प्रार्थमिक फायदे -
  • १. आध्यात्मिक आवड निर्माण होणे.
  • २. सद्गुरु शोधण्याची ओढ लागणे.
  • ३. ईच्छ्याशक्ती अधिक तीव्र होणे.
  • ४. माणसांना ओळखण्याची कला अवगत होणे.
  • ५. नामस्मरणात लक्ष लागणे.
  • ६. दैवी सान्निध्यात वाढ होणे.
  • ७. शरीरात हलकेपणाची जाणीव होणे.
  • ८. मनात सदैव आनंददायक वातावरण असणे.
  • ९. आकलनशक्तीत अथवा ग्रहणशक्तीत वाढ होणे.





ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...






मुलाधार चक्र साधना व स्वामी ध्यानयोग



0