स्वाधिष्ठान चक्र ( Swadhisthana Chakra ) साधना व शिव ध्यानयोग


स्वाधिष्ठान चक्र शुद्धीकरण पश्चात संबंधित साधना होण्यासाठी स्वमानसिकता शुद्ध आचरणयुक्त असायला हवी. देहांतर्गत असलेल्या सबळ आध्यात्मविरोधी तामस दुर्गुणांना मुळासकट उपटण्याची ईच्छा असल्यास शुध्द क्रियेचाच वापर करावा लागतो.

देहातील अत्यंत बलवान विकृतीचे मुळ स्थान स्वाधिष्ठान चक्राजवळच स्थित असते. ही विकृती देह वासनेच्या रुपात व्यक्त होत असते. हेच वासनेचे बीज मनुष्याला पतनाकडे जलदगतीने ओढून घेऊन जाते. याची हलकीशी जाणीवही माणसाला होत नाही.



प्रारंभिक अवस्थेत स्वाधिष्ठान चक्रस्थित वासनेचे मुळ बीज जाळणे हेतु संबंधित योगक्रियेचा आज प्रपंच करीत आहे. एकदा की हे बीज योगसाधनेने जळु लागले की, आध्यात्मिक प्रगतीसाठी अन्य ईतर फार मोठ्या अडचणी नाही. मनातील संभ्रम संपुन आपले ध्येय अधिकच स्पष्ट व तीव्र होते.

स्वाधिष्ठान चक्र साधना

आत्मसाक्षात्काराची तीव्र ईच्छाधारकांसाठी ही प्रथम पायरी आहे. फार कमी साधक या स्तरावर टिकु शकतात. बघण्यात किंवा वाचण्यात ही गोष्ट जरी सोपी सहज जाणवत असली तरी, प्रत्यक्ष कृती करताना वस्तुस्थितीची जाणीव होईल. आपण जर पारदर्शक आहोत तर महाराज नक्कीच मार्गदर्शक होतात, असा माझा वैयक्तिक सबळ अनुभव आहे.

सर्वप्रथम आपला स्वभाव अंतर्मुखी बनवण्याचा प्रयत्न करा. अंतर्मुखतेत आपलीच आपल्याशी मैत्री होते. स्वतःला समजणे हेतु वेळ देण्याची ईच्छा होते. वासनेवर विजय प्राप्त होण्यासाठी अधी आपल्याला आपल्या ईंन्द्रीयाचे ज्ञान होणे महत्त्वाचे आहे. आपल्या ईंन्द्रीय ज्ञान प्राप्तीनेच कर्मेंन्द्रीयांना आळा घालण्याची सद्बुद्धी प्रकट होते. थोडक्यात असं समजा की, एक भयानक विषारी सापाला मी नळीत भरुन सरळ करणार आहे.


आपल्या दैनंदिन मानसिकतेत स्वाधिष्ठान स्थित तमोगुणाचा ७०%+ हस्तक्षेप असतो. हा प्रवाहविरोध करणे हेतु सोपी आणि सरळ नित्य क्रियेचे विश्लेषण करत आहे.



साधना क्रीया व शिव ध्यानयोग

सुरुवातीला २० मिनिटे रात्री झोपण्यापूर्वी आपल्या झोपण्याच्या ठिकाणी आसनस्थ होणे. सोबत एक भरलेल्या पाण्याचा ग्लास जवळ ठेवणे. नाथपंथातील प्रसिद्ध ध्यानयोग साधना - २ मधे सांगितल्याप्रमाणे आपली चैतन्यावस्था धारण करा.

चैतन्य अवस्था धारण केल्यास आपले गुदद्वाराची जागा हळुहळु वरच्या दिशेला खेचण्याचा प्रयत्न करा. गूदद्वार आकूंचन करण्याच्या क्रियेला मुलबंध असे म्हणतात. मुलबंधचा चांगला अभ्यास करा. मुलबंध धारण करताना लिंगमुळाकडील जागा आपोआप वरच्या दिशेला ओढली जाते. कृपया मुलबंध साधनेवेळी सोडु नये.




वासनाबीजाच्या दहनाचे काम एकमात्र भगवान शिवाचे आहे. यायोगे आपल्या बंद नजरेसमोर "श्री स्वामी समर्थ महाराज शिव ज्योतिर्लिगाजवळ आसनाधिस्थ आहेत " अशी प्रबळ धारणा करा. 

धान धारणा करताना हाताची ज्ञानमुद्रा असावी.

ही प्रार्थमिक क्रीया आहे. धारणा करुन दम भरल्यास हळुहळु लक्ष श्वासावर केंद्रित करा. आपला मुलबंध हळुहळु सोडा व दोन्ही तळहात ऐकमेकांना घासुन कपाळाला स्पर्श करा. डोळे उघडा.






ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...