चक्र साधना - स्वाधिष्ठान चक्र शुद्धी ( Swadhisthana Chakra Purification ) व दैनंदिन आध्यात्म.


वं बीजात्मक स्वाधिष्ठान चक्र साधकाला प्रभुत्वाची अभिव्यक्ती बनवणारे चक्र आहे. स्वाधिष्ठान चक्र शुद्धीकरणाने देहातील जल तत्वाचे संतुलन राखले जाते. जल हे पंचमहाभुतांपैकी एक तत्व. आध्यात्मिक उन्नतीहेतु देहांतर्गत असलेल्या ज्ञानगंगाजल आत्मिक प्रवाह होणे हेतु ह्या चक्राचे शुद्धीकरण झालेच पाहिजे. स्वाधिष्ठान चक्र स्वर्गलोकाचे प्रतिनिधित्व करते.


आपल्या देहात असलेल्या पाच कोषांपैकी एक आनंदमय कोषाची प्रारंभिक सुरवात स्वाधिष्ठान चक्राच्या शुद्धीकरणानेच होते. हे चक्र आपल्या देहात लिंग मुळाजवळ मुलाधार चक्रावरती स्थित असते. जलतत्वाचे प्रधानत्व असलेल्या या चक्राची साधना एकधारी नामस्मरण अथवा शाश्वत सुक्ष्म चैतन्य प्रवाहाच्या मदतीने होते.


स्वाधिष्ठान चक्र साधनेसाठी आवश्यक असलेली पुर्व तयारी.

स्वाधिष्ठान चक्र प्रार्थमिकतेने मानवी आनंद आणि सत् चिद् परमानंदातील तादाम्य साधाणारे चक्र आहे. मृत् लोकातुन अथवा तळागाळातुन एक पाऊल पुढे पडणे म्हणजे स्वाधिष्ठान नाद.

पुर्वतयारीसाठी आपण अधी मुलाधार चक्र शुद्धी व मुलाधार चक्र साधना अग्रेसर राहाणे महत्वाचे आहे. मुळ तत्व माती असुन मातीचा साधनायुक्त कायापालट होऊन सोने बनायला पाहीजे. त्यायोगेच स्वाधिष्ठानाचे सत्व अंतरी योग्य पद्धतीने रुजायला व रुचायला सुरवात होईल.


स्वाधिष्ठान म्हणजे काय...?

स्वाधिष्ठान हे देहातीत असलेले अंतर्मुखी आधिष्ठान असते. स्वाधिष्ठान याचा अर्थ स्व+आधिष्ठान असा होते. ह्या आधिष्ठानाला अनुसरुन देहाच्या मातीचा ढिगारा अधी स्वच्छ करता आला पाहीजे. आपल्या देहात असलेल्या वासनेला प्रकट होणे हेतु मातीचा देहच मदत करतो.या मातीच्या देहाला शुद्ध करुन पुढील अवस्थेत आपण नेऊ शकतो.

आधिष्ठान श्री दत्त महाराजांचे अर्थात श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराजांचे असते. हे सुक्ष्म आधिष्ठान जागृत होणे हेतु देह प्रार्थमिकतेचे शुद्धतेने आचरता आला पाहीजे. एकदा की आपण सात्विकतेचे धडे गिरवायला लागलो की देहातीत वासनामय दोष कमी होण्यास सुरवात होते. आणि दत्त आधिष्ठानाच्या आशिर्वादाने योग साधनेत अग्रेसर होतो.


लिंगमुळ स्थित स्वाधिष्ठान चक्र फार भयानक द्वंद्व असते. कारण आपण अनंत जन्माच्या वासना विषयाच्या मुळाशी असतो. आनंदमय शरीर जागृत होणे हेतु वासनेचा तीव्र विरोध प्रारंभावस्थेत साधकाला झेलावा लागतो. स्वाधिष्ठान चक्रा ठिकाणी एके ठिकाणी जन्मजन्मांतराचे वासना विषय विकार आणि दुसऱ्या बाजुला असते ती प्रारंभिक निर्विकार आनंदमय आध्यात्मिक अवस्था...!


ह्या आत्मिक प्रसंगातुन जर सुखरुप मुक्तता हवी असेल तर श्री दत्त महाराजांच्या सुक्ष्म आधिष्ठानाला अनन्य भावाने शरण जाण्याशिवाय ईतर दुसरा पर्याय नाही. तेव्हाच आपण या आत्मिक द्वंद्वातुन बाहेर येऊ शकतो व वासनेवर विजय प्राप्त करुन घेऊ शकतो.


आपण पाहीलेल्या पंढरपुरातील भगवान श्री हरि विठ्ठलाची मुर्ती आपल्याला काही तरी आत्म संकेत देते. तो स्वतःच्या कमरेवर दोन्ही हात ठेऊन काय सांगतो...? ह्याचा कधी विचार केलाय का आपण...!


ह्या आध्यात्मिक जीवनात कोणताही साधक पथ्यपाणी पाळुन, प्रारंभिक सात्विक प्रवृत्ती प्राप्त करु शकतो पण त्या पुढे असलेली चित्त उपरती मिळवणे हेतु सद्गुरुकृपा अनिवार्य आहे.

विठु माऊली कमरेवर हाथ ठेऊन आपल्याला सांगत आहेत की, भवसागरातील वासनेचा प्रवाह कमरेपर्यंतच आहे. पण ईतका जलद आहे की, कोट्यानुकोटी भक्त त्यातही वाहुन जातात. सद्गुरु शरण असलेला तो एकमात्र साधक आपल्या कमरेपर्यंत रेंगाळणार्या वासनेवर विजय मिळवतो तोच माझ्या अंगा खांद्यावर खेळतो.स्वाधिष्ठान चक्र व आपले शरीर.

आधिष्ठान चक्र वं बीजात्मक असुन त्याचे वाहन मगर आहे. आधिष्ठान श्री गुरु आहेत. ह्या चक्राला ऐकुण सहा मातृका दलें आहेत. निळारंग असलेले हे चक्र नारायणाच्या अधीन आहे. आनंदमाय कोषाला जागृत करणाऱ्या ह्या चक्राच्या सहा दलांचे एक रहस्य आहे. या रहस्याची जाणीव होणे हेतु आपण आपल्या नामस्मरणावर योग्य भर दिला पाहीजे.


सहा दलांच्या ह्या चक्राचे चालक श्री गुरु महाराज आहेत. एकुण तीन तारक मंत्र आपण जाणतो त्यापैकी पहीला १. श्री स्वामी समर्थ २. ॐ नमः शिवाय आणि ३. दूं दुर्गायै नमः हे तारक मंत्र षडाक्षरी आहेत आणि संबंधित मातृका बीज मंत्राचे बं, भं, मं, यं, रं, लं उद्घोषक आहेत. 

अर्ध चंद्रकोर मनाच्या उन्मनी अवस्थेचे प्रतीक आहे. ही उन्मनी अवस्था फक्त गुरु महाराजच मिळवुन देऊ शकतात.


स्वाधिष्ठाध चक्र जागृतीचे प्रार्थमिक फायदे...

  • १. भेदक मनोवृत्ती प्राप्त होते.
  • २. माणसांची पारख एकाच क्षणात होते.
  • ३. भगवत्प्राप्तीच्या शक्यता वाढतात.
  • ४. आकर्षण शक्ती प्राप्त होते.
  • ५. विचारांमधे एक प्रभुत्वता येते.
  • ६. मन, काया आणि वाचा एकच भाषा बोलतात.
  • ७. मनाला विलक्षण शांतीचा अनुभव होतो.
  • ८. अति दुर्लभ अशा आत्मिक आनंदाची प्राप्ती होत आहे असे अनुभवास येते.
  • ९. विदेही अवस्था प्राप्त होणे साठी एक पाऊल आपण पुढे जातो.
  • १०. मनातील सर्व संभ्रम संपतात.ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

0