चक्र साधना - अनाहत चक्र शुद्धी ( Anahata Purification ) व दैनंदिन आध्यात्मज्याप्रमाणे कोणत्याही मंदिरात गेल्यावर जी वास्तुरचना आपण बघतो मग त्यात आपल्याला सर्वप्रथम मंदिराच्या पायऱ्या, सभामंडप, गाभाऱ्यात शिरण्यासाठी ऐक छोटी चौकट, गाभारा, अंतर्घुमट पोकळी व कळस अशी कलाकृती बघण्यात येते. त्याचप्रमाणे आपल्या स्थुल देहाचीसुद्धा योगात्मक अशीच रचना ईश्वराने केली आहे.


ज्याप्रमाणे कोणत्याही मंदिरात गेल्यावर जी वास्तुरचना आपण बघतो मग त्यात आपल्याला सर्वप्रथम मंदिराच्या पायऱ्या, सभामंडप, गाभाऱ्यात शिरण्यासाठी ऐक छोटी चौकट, गाभारा, अंतर्घुमट पोकळी व कळस अशी कलाकृती बघण्यात येते. त्याचप्रमाणे आपल्या स्थुल देहाचीसुद्धा योगात्मक अशीच रचना ईश्वराने केली आहे.

आपल्या ह्दयस्थित असलेल्या आत्मिक उर्जेला आपण गाभारा असे संबोधतो. पुरातन काळी महात्मा, थोर सिद्ध पुरुष ज्या ठिकाणी स्थुल देह त्याग करत असत, त्याच पवित्र स्थानी त्यांच्या परमप्रकृतीला अनुसरून त्यांचा भक्त समुदाय शरीरदेहाची प्रतिकृती अनुसरून मंदिर उभारत असत. त्या मंदिराच्या वास्तुविश्लेषणाच्या आधारे मंदिराच्या पायऱ्या त्यांचे चरण, मंदिराचे सभामंडप त्यांचे शरीर, मंदीराचा गाभारा त्यांचे ह्दयस्थान, गाभाऱ्यातील अंतर्घुमट कंठस्थित प्रदेश व मंदिराचा कळस आग्या चक्र अशी स्वरुप संरचना असते.अनाहत चक्र आपल्या ह्दयस्थ आत्मलिंगाचे आसन असते. ज्याप्रमाणे शिशुची स्थुल देहाची नाळ गर्भात असताना त्याच्या जन्मदात्री मातेच्या स्थुल देहाशी जोडलेली असते. त्याचप्रमाणे आपल्या ह्दयस्थ आसलेल्या अज्ञानी अनादी तेजपुंज आत्म्याची सुक्ष्म नाळ आत्मलिंगस्थित परमेश्वर अर्थात परमशिवाशी जोडलेली असते.

आपल्या जन्मापासुन ते मृत्युपर्यंत फक्त आणि फक्त आपल्या बहिर्मुखी वृत्तीस्तव आपण अंतरात्म्यातील परमात्म्याचे हितसंबंध ओळखु शकत नाही. हे ओळखण्याची जर तीव्र ईच्छा व चिकाटी असेल तर अनाहत चक्र शुद्धीकरणावर प्रामाणिक व सद्गुरु एकनिष्ठ अंतःकरणाने प्रयत्न सुरु करायला पाहीजेत.


आपल्या शरीरातील मुलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र व मणिपुर चक्र हे भवविग्रही आहेत. अर्थात यांची परिसीमा किंवा मर्यादा भवसागरा पुरतीच असते. परंतु अनाहत चक्र हे मोक्षदायक परमतत्व आहे.


अनाहत चक्राचा अभ्यासामुळे मुलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र व मणिपुर चक्र अनायाचे शुद्ध होतात. त्यांसाठी विशेष कष्ट घेण्याची गरज नाही.अनाहत चक्र वायु तत्वाचे प्रतिक आहे. यं बीजात्मक या तत्वाचे वाहन मृग आहे. या चक्राची देवता ईशान रुद्र आहे. आपल्या ह्दयस्थ असलेले आत्मलिंग आकाशगंगेशी जोडलेले असते. चित्त आकाशस्थित ज्ञानगंगेच्या प्रवाहासाठी अनाहत नादयुक्त आत्मतत्व जागृत करता आलं पाहीजे.


ज्या साधकांना योगी जीवन व्यतीत करण्याची ईच्छा आहे. त्यांनी स्वतःचे सर्व चित्त ह्दयस्थ असलेल्या अनाहत तत्वाकडे केंद्रित केले पाहीजे. आपल्या अंतरी अनाहत चक्रापासुन ते आग्या चक्रापर्यंत तीन ग्रंथी आहेत. अनाहत चक्रस्थित ब्रम्ह ग्रंथी, विशुद्धी चक्रस्थित विष्णू ग्रंथी व आग्या चक्रस्थित रुद्र ग्रंथी...!


अनाहत चक्राची शुद्धी हेतु, अनाहत नाद आपल्या बुद्धीत प्रकट होणे हेतु आपले अंतःकरण भगवत्मय करता आले पाहीजे. ऐकदाकी आत्मगुहेत स्थित असलेली भगवत्मय अंताःकरणयुक्त आत्मबुद्धी जागृत झाली की मग सद्गुरु महाराजांची चरणसेवा कशी करायची याचे आत्मज्ञान प्राप्त होते व आपण आध्यात्मिक जीवनात क्रमाक्रमाने सद्गुरु आज्ञेने अग्रेसर होतो.


आपल्या ह्दयस्थ असलेल्या अनाहत स्थानी सद्गुरुकृपेचा फवारा उडल्याशिवाय तो शाश्वत परमानंदाची प्राप्ती होणे कठीणच असते. त्यायोगे अनाहत चक्र शुद्धीवर प्रार्थमिक स्तरावर विशेषभर दिला पाहीजे. ज्याप्रमाणे या चक्राचे वाहन मृग आहे. त्याअर्थी मृगाची एक अभिव्यक्ती कस्तुरीमृग म्हणुन आहे.


कस्तुरी मृग बनण्याची ईच्छा असल्यास अनाहत चक्राचा अभ्यस करावा लागेल. कारण आपल्या नाभीत असणाऱ्या दिव्यसुगंधी कस्तुरीसुवास प्राप्ती हेतु कोठेही भटकण्याची गरज नाही. ते कस्तुरी द्रव्य रसायन आपल्या ह्दयस्थ आत्मगुहेतच स्थित असते.


अनाहतचक्र शुद्धीकरण हेतु आवश्यक असलेली पुर्वतयारी...


१. रोज सकाळी १० मिनिटे अनुलोम विलोम करणे.

२. सखोल ग्रंथ वाचनाचा अभ्यास असणे.


३. एका ठिकाणी ३ तास ५५ मिनिटे बसण्याचा सराव करणे.


४. नाथपंथीय प्रसिद्ध ध्यानयोग - १ वर ध्यान ग्रहण शक्ती वाढवणेंज्याप्रमाणे कोणत्याही मंदिरात गेल्यावर जी वास्तुरचना आपण बघतो मग त्यात आपल्याला सर्वप्रथम मंदिराच्या पायऱ्या, सभामंडप, गाभाऱ्यात शिरण्यासाठी ऐक छोटी चौकट, गाभारा, अंतर्घुमट पोकळी व कळस अशी कलाकृती बघण्यात येते. त्याचप्रमाणे आपल्या स्थुल देहाचीसुद्धा योगात्मक अशीच रचना ईश्वराने केली आहे.


अनाहत चक्र जागृत होण्याचे फायदे खालीलप्रमाणे...

१. परमेश्वराशी प्रत्यक्ष तादाम्य साधात येते.

२. आत्मसाक्षाकारासाठी अतिमहत्वाची तयारी.


३. सद्गुरु महाराजांचे आपल्यावर लक्ष केंद्रित होणे.


४. मानवी सद्गुण आणि दुर्गुणांच्याही पलिकडे जाणे.


५. देह असुनही विदेही अवस्था येणे.


६. सहज समाधी हेतु प्रार्थमिक पायरी समजा.


७. भगवत्मय अंतकरणाला आणि प्रारब्धाला अनुसरून सद्गुरु अनुग्रह प्राप्त होणे.


८. आत्मबळात प्रचंड वाढ होणे.


९. त्रिकालज्ञानी होण्याची पात्रता येणे.


१०. आकाश हेच स्वगृह आहे याची कठोर धारणा होणे.

संबंधित ध्यानसिद्धी अनुसरुन सविस्तर, अधिक सखोल, गहन व कुठेही उपलब्ध नसलेली विशेष आध्यात्मिक साधना माहीती लिंक स्वरुपात खालीलप्रमाणे उपलब्ध आहे. दिलेल्या विशेष लिंकचा पासवर्ड हटवण्यासाठी संस्थेत सक्रीय सभासद होणे आवश्यक आहे.

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

अनाहत चक्र ( Anahata Chakra ) साधना व सद्गुरु ध्यानयोग ( Meditation )

दत्ततत्व ( साध्य ) व हठयोग ( साधन ) म्हणजे दत्तप्रबोधिनी आचरण ( समाधि )

दत्त संप्रदाय व साधन, साध्य, समाधी

सर्व स्वामींशिवभक्तांसाठी अद्वितीय शिवसाधना पद्धती...!!!

श्री गुरुचरित्राच्या सप्ताहवाचनाच्या पद्धती व संक्षिप्त रसग्रहणसंपर्क : श्री. कुलदीप निकम
भ्रमणध्वनी : 9619011227


GET FRESH CONTENT DELIVERED BY EMAIL:


FOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीतीAll about Swami Samarth, Real unknown secrets, Step by step Spiritual Growth explained, Build your soul, Boost your life on top. - Visit Website Here !


Embed श्री स्वामी समर्थ योग व गहन आध्यात्मिक मार्गदर्शन on Your Site: Copy and Paste the Code Below