ध्यान कसे करावे, अनाहत चक्र ( Anahata Chakra ) साधना व सद्गुरु ध्यानयोग ( Meditation )- Simple and Easyआत्मिक गगनभरारी घेण्याची तळमळ आहे पण मार्गच सापडत नाही. ईतरांच्या बोलण्यावर कसा विश्वास ठेवायचा कारण विश्वास तर पाणिपतच्या युद्धातच वारला. आध्यात्मिक पुस्तके कुठ पर्यंत साथ देतील...? आध्यात्मिक घुसखोरांपासुन कसं सुरक्षित अंतर ठेऊन सद्गुरु समर्पित आपली आध्यात्मिक प्रगती साधता येईल...? महाराज आपल्याला दर्शन देतील का...? आपण रोजच्या धावपळीतुन कसा आध्यात्मासाठी वेळ काढायचा...? असे असंख्य प्रश्न आपल्य डोक्यात फिरत असतात.

या सर्व प्रश्नांचे एकच उत्तर " आपल्या ह्दयस्थ असलेल्या अनाहत चक्राची आत्मिक साधना" यापलिकडे या पृथ्वीवरच काय तर ब्रम्हांडातच कुठे दुसरा पर्याय नाही. अनाहत नाद हा ब्रम्हनाद समजला जातो. ह्या अनाहत नादाला धारण करण्याची क्षमता स्वर्गलोक, मृत्यूलोक, पाताळ लोक व आकाशाला ही नाही.


ब्रम्हांड भेदुन टाकणार्या या अनाहत नादाची अभिव्यक्ती व्यक्तीच्या ह्दयस्थ असलेल्या आत्मिक अनाहत तत्व संधानातुन उत्पन्न होते. आपल्या ह्दयातील आत्मा आणि जीव अर्थात जीवात्माचे शिव परमात्मात परिवर्तन होणेसाठी अथर्व किंवा अभंगत्वाचा अंगिकार करता आला पाहीजे. हा अंगिकार सद्गुरु तत्वाचा व गुरु कार्यप्रणाली अनुसरुनच असायला हवा.


अंगिकार करणे अथवा धारण करण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुळात सर्वप्रथम आध्यात्मिक गोडी असायला हवी. त्यानंतर आध्यात्मिक साहीत्य वाचनावर भर दिला पाहीजे. हे वाचन वरवरचे नसुन स्थुल डोळ्यांना दिसणाऱ्या स्थुल शब्दांच्याही पलिकडे एक सुक्ष्म शब्द रचना असते. ही सुक्ष्म शब्द रचना थेट आपल्या अंतकरणातीला आत्मगुहेत असणाऱ्या भगवत्मय आत्मबुद्धीला जाऊन मिळते.सुक्ष्म शब्दरचना आपल्या आत्मबुद्धीत प्रकट होताच, आपली सद्बुद्धी प्रकट होते. हीच सद्बुद्धी आपल्याला आध्यात्मिक जीवनात सद्गुरुनिष्ठायुक्त आचरण करण्यास मदत करते. या सद्बुद्धीचा आपण संपुर्ण आदर व त्यायोगे प्रामाणिक सुदृढ भावनेने आचरण करायला पाहीजे.

दत्ततत्वाचे आत्म आचरण म्हणजेच सद्गुरुंचे परमपवित्र मार्गदर्शन असते. हे आचरण होण्यासाठी अनाहत चक्र साधनेवर आपण टप्याटप्याना भर दिला पाहीजे. हा आत्मिक भर देताना आपण यथाशक्ति सामुहीक नामस्मरणाचा आधार घेतल्यास, सामुहीक बळाच्या योगतत्वाने आपली प्रगती व पुण्यसंचय होण्यास वैयक्तिक स्तराच्या तुलनेत जास्त गती प्राप्त होते.

अनाहत चक्र साधनाआत्मिक गगनभरारी घेण्याची तळमळ आहे पण मार्गच सापडत नाही. ईतरांच्या बोलण्यावर कसा विश्वास ठेवायचा कारण विश्वास तर पाणिपतच्या युद्धातच वारला. आध्यात्मिक पुस्तके कुठ पर्यंत साथ देतील...? आध्यात्मिक घुसखोरांपासुन कसं सुरक्षित अंतर ठेऊन सद्गुरु समर्पित आपली आध्यात्मिक प्रगती साधता येईल...? महाराज आपल्याला दर्शन देतील का...? आपण रोजच्या धावपळीतुन कसा आध्यात्मासाठी वेळ काढायचा...? असे असंख्य प्रश्न आपल्य डोक्यात फिरत असतात.


अनाहत चक्राचा बीजमंत्र " यं " असा आहे. याचे कारण असे की मनुष्याचे कर्म दोन ठिकाणी लिहीले जातात. एक यम दैनंदिनत व दुसरी शिव दैनंदिनत...! जे जन्मभर स्वतःच्या जीवनकाळात दुष्कृत्य करतात त्यांची नोंद यम दैनंदिन होते. जे स्वतःच्या अंतर्गुणांना सद्गुरुतत्वाचा अविभाज्य घटक बनवतात तशी नामसाधना करतात, जे दुष्कर्म, सत्कर्म व अकर्मही करत नाहीत, आत्मसमर्पण सद्गुरु महाराजांना असते त्यांची नोंद शिव दैनंदिनत होते.

यम दैनंदिनतील नोंद म्हणजे यं बीजाची मुळ अभिव्यक्ती, जी थेट यमदुत त्या दुरात्म्या जीवाला मारत मारत घेऊन जातात. नकरावस्था प्राप्त करवुन देतात. याउलट शिव दैनंदिनतील नोंद म्हणजे यं बीजाची आदीकारण अभिव्यक्ती (ॐ नमः शिवायं) , जी थेट शिवदुत किंवा दत्तदुत त्या परमपावन शिवस्वरुपाला भवसागराच्या, सुर्य चंद्राच्याही पलिकडे असलेल्या हिरण्यलोकातील सुक्ष्म कर्दळी वनात घेऊन जातात. तो सद्गुरु चरणांचा दास... सहस्त्रमाता करुणा प्रेम असलेल्या श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांच्या चरणी पोहोचुन परमानंदात शाश्वतारुपात सामावुन जातो.


अनाहत चक्राच्या ह्या दोन बाजु आहेत. ज्याला जी बाजु आवडते ती त्याने परीणामांची पर्वाकरुन अथवा न करुन आत्मसात करावी. व अंत त्यायोगे प्राप्त करावा.


साधना क्रिया व सद्गुरु ध्यानयोग


सुरुवातीला २० मिनिटे रात्री झोपण्यापूर्वी आपल्या झोपण्याच्या ठिकाणी आसनस्थ होणे. सोबत एक भरलेल्या पाण्याचा ग्लास जवळ ठेवणे. नाथपंथातील प्रसिद्ध ध्यानयोग साधना - २ मधे सांगितल्याप्रमाणे आपली चैतन्यावस्था धारण करा.


एकदाकी चैतन्य अवस्था धारण केल्यास आपले गुदद्वाराची जागा हळुहळु वरच्या दिशेला खेचण्याचा प्रयत्न करा. गूदद्वार आकूंचन करण्याच्या क्रियेला मुलबंध असे म्हणतात. मुलबंधचा चांगला अभ्यास करा. मुलबंध धारण करताना लिंगमुळाकडील जागा आपोआप वरच्या दिशेला ओढली जाते. कृपया मुलबंध साधनेवेळी सोडु नये. नाभीबंध यथाशक्ति धारण करा.
वासनाबीजाच्या दहनाचे काम एकमात्र भगवान शिवाचे आहे. यायोगे आपल्या बंद नजरेसमोर "श्री स्वामी समर्थ महाराज शिव ज्योतिर्लिगाजवळ ह्दयासनाधिस्थ आहेत " अशी प्रबळ धारणा करा. 

धान धारणा करताना हाताची ज्ञानमुद्रा असावी.

ही प्रार्थमिक क्रीया आहे. धारणा करुन दम भरल्यास हळुहळु लक्ष श्वासावर केंद्रित करा. आपला मुलबंध हळुहळु सोडा व दोन्ही तळहात ऐकमेकांना घासुन कपाळाला स्पर्श करा. डोळे उघडा.

संबंधित ध्यानसिद्धी अनुसरुन सविस्तर, अधिक सखोल, गहन व कुठेही उपलब्ध नसलेली विशेष आध्यात्मिक साधना माहीती लिंक स्वरुपात खालीलप्रमाणे उपलब्ध आहे. दिलेल्या विशेष लिंकचा पासवर्ड हटवण्यासाठी संस्थेत सक्रीय सभासद होणे आवश्यक आहे.


ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...


दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट सभासदत्व उपयुक्तता...!

शरीर रचना विज्ञान ( Body structure ) आध्यात्मिक क्षेत्र

सहज समाधी योग : नाम प्राणायाम व त्रिवेणी बंध

दत्त उपासना, दत्त संप्रदाय ( Datt Sampraday ) व साधन, साध्य, समाधी

मनाची शक्ती... त्राटक विद्या ( Tratak Vidya ) म्हणजे काय ? त्राटक विद्या व साधना महत्व...!

अनाहत चक्र शुद्धी ( Anahata Purification ) व दैनंदिन आध्यात्म


GET FRESH CONTENT DELIVERED BY EMAIL:


FOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती
All about Swami Samarth, Real unknown secrets, Step by step Spiritual Growth explained, Build your soul, Boost your life on top. - Visit Website Here !


Embed श्री स्वामी समर्थ योग व गहन आध्यात्मिक मार्गदर्शन on Your Site: Copy and Paste the Code Below