आध्यात्मिक श्रीफळ व चारित्र्यपूजनाचे माहात्म्य ( Spiritual Disciplines )- Simple and Easy


सज्जन नारळाच्या फळाप्रमाणे असतात तर दुसरे बोराप्रमाणे बाहेरुनच मनोहर दिसतात.

समाजाचा फार मोठा वर्ग बोराचे अनुकरण करणारा असतो. माणसाला चांगले बनण्यापेक्षा चांगले दिसणे अधिक आवडते. चांगले दिसणे हे सरळ आहे, परंतु चांगले बनण्यासाठी माणसाला कष्ट सहन करावे लागतात, झिजावे लागते. सारांश आजचा काळ फक्त धनाढ्य व्यक्तीत्व-पुजनाचा आहे आध्यात्मिक चारित्र्य पुजनाचा नाही.




नारळ आपल्याला चारित्र्यपुजनाची प्रेरणा देतो. बाह्य सौंदर्याचा अभावामुळे कमीपणा न मानता नारळाने स्वतःचे अन्तसौंदर्य फुलवुन दाखवले आहे आणि त्यामुळे ' श्रीफळ ' हे गौरववान नाव प्राप्त केले आहे. क्षणभंगुर बाह्यसौंदार्य मिळणे न मिळणे ही मानवाच्या हातची गोष्ट नाही परंतु मानव जर मनात आणील तर स्वतःचे अन्तःसौंदर्य यथेच्छ फुलवु शकतो. अन्तसौंदर्यापुढे बाह्यसौंदर्य गौण असते. माणसाजवळ अन्तसौंदर्य निरखण्याचा डोळा असला पाहीजे.


बोर तोंडात घालताच प्रथम गोड व नरम अनुभवाला येते. त्याच्या आतील बीजवळ कठोरता असते. दुर्जन बाहेरुन मृदु व गोड वाटतात पण त्यांचे अंतःकरण निर्दयी असते. नाराळाप्रमाणे सज्जनही बाह्यदेखाव्याचा आग्रह राखीत नसल्यामुळे त्यांना ओळखणे फारच कठीण जाते. बाहेरुन सामान्य व कठोर वर्तनी वाटणाऱ्या लोकांना ओळखण्यात आपण अधिक प्रमाणात चुक करुन बसतो. बाहेरुन कठोर व आतुन अतिमृदुल असे श्रीफळ हे महापुरुषाची महानता समजावणारे प्रतीक आहे. महापुरुष आत्मशासन करण्यात वज्राहुनही कठोर असातात तर दुसऱ्याला शिक्षा करण्यात फुलाहुनही कोमल असतात.


महापुरुष स्वतःच्या कर्तव्य पालनाच्या बाबतीत निष्ठुर असतात. भावनांचा मृदुल प्रवाह त्यांना कर्तव्यांच्या पाऊल वाटेवरुन विचलित करु शकत नाही. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ समजणारा राम भारतीय संस्कृतीत आदर्श पुरुषात अग्रस्थानी आहे. नारळ आपल्याला उत्कृष्ठ मनोवैभवाचे दर्शन करवतो. वैभव म्हणजे श्री; ह्या दृष्टीने नारळाला श्रीफळ असे म्हणतात.

समुद्राचा खारटपणा ह्दयात साठवुन लोकांना गोडपाणी देणारे श्रीफळ आपल्याला बहुमोल आध्यात्मिक संदेश देते. संसारीक जीवनात जगणारा भोगी हा जांभळाच्या वृक्षावरील एकमात्र जांभुळ असतो जो काही क्षणांतच भुमीवर पडुन चिरडला जातो मग त्याला ग्रहण करता येत नाही. त्याच प्रमाणे संसारीक गाढव मृत्युपश्चात त्याने केलेल्या कर्माव्यतिरीक्त मागे काहीच ठेवत नाही आणि कालांतराने समाजाकडुन विसरला जातो. व्यक्तीत्वाची पुजा होत नसते तर फक्त चारित्र्यच पुजनीय असते याचे उदा. भारतीय संत, महान शास्त्रज्ञ आणि योगीजने आहेत.


योगीजानांच्या मते श्रीफळाची अभिव्यक्ती...!

सज्जन नारळाच्या फळाप्रमाणे असतात तर दुसरे बोराप्रमाणे बाहेरुनच मनोहर दिसतात.

सर्व सामान्य दिसणारे नारळ, बाहेरुन टणक आणि आतुन मृदुल असा स्वभाव धारण करणारे आहे. या प्रमाणे नारळाला शेंडी असते त्याच प्रमाणे मानवी मस्तिष्कला सहस्रार स्थानी एक अथवा दोन भवरे नैसर्गिक स्वरुपात असतात. शेंडीनंतर तीन डोळे नारळावर पाहाण्यात येतात. त्याचप्रमाणे मानवालाही तीन नेत्र आहेत. त्यातील दोन चर्मचक्षु व एक सुक्ष्मचक्षु ज्याचे स्थान कपाळमध्यावर असते. एकाक्षी नारळही माहीती संग्रहात आहे परंतु तो अती दुर्लभ असा आहे.

नारळाचे बाह्य सौंदर्य गौण आहे. आध्यात्मिक जीवनात अंतर्मुख सौंदर्याचा प्रसार गणला जातो. त्याप्रमाणे नारळ आतुन पाहील्यास खोबर्याची वाटी ओली आसुन नारळाला सर्व बाजूंनी चिकटलेली असते. त्याचप्रमाणे माणुसही अंतर्मुख अवस्थेत विषयासक्त होऊन ईंद्रींयांमार्फत देहाला सर्व बाजुंनी आतल्याआत चिकटलेला असतो. त्याअर्थी क्षणभंगुर जीवन व्यतीत करत असतो. काळ पाठी आहे ह्याची क्षणभरही जाणीव त्याला होत नाही.



ज्या वेळेस नारळ सुकतो त्यावेळी आतील नारळाची वाटी नारळाची आतील सर्व चिकटलेली बाजु सोडुन देते व खोबरेल वाटी स्वतंत्र होते. त्याचप्रमाणे संसारात राहुनही योगीपुरुष देह आतुन स्पर्श करत नाहीत. देहात असुनही स्वतंत्र आणि मुक्त पारलौकिक आध्यात्मिक जीवन व्यतीत करत असतात. ऐकांतप्रिय असे योगीपुरुषांना समाजाने मान्य केल्यास ते समाजाच्या डोक्यावर एका फुलांच्या मुकुटाप्रमाणे शोभायमान होतात किंवा अशा योगीजनांना समाजात ओळखले नाही गेले तर से योगी अरण्यात ऐकांतात राहुन आपले स्थुलदेह सुकवत बसतात. आणि आतील ब्रम्हाण्डीय स्वतंत्र गोळा तेवत असतात.


दोन्हीं परिकल्पनांमधे योगींजनांना काहीच भेद नसतो. जर कोणाला फरक पडत असेल तर तो समाजाला पडतो कारण व्यक्तीत्वची पुजा करणारा समाज कधीही वेळेनी हिरावुन नेलेली चारित्र्याची अभिव्यक्ती ओळखु शकणार नाही आणि जीवनाचे शाश्वत आणि अंतिम सत्यापासुन अनिश्चित काळापर्यंत परत वंचित राहील.


ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...



0