शिव साधना ( Shiv and Evil ) व पिशाच्चशक्तीसंबंधी सुक्ष्मज्ञात वास्तविकता...!


बर्याच वास्तूंमधे, मानवी देहात आणि बहुतांशी प्राण्यांमधेही पिशाच्चबाधेचा परिणाम निःसंकोच जाणवत असतो. बाधीत लोकांना अशावेळी मांत्रिकाच्या सहाय्याने त्या भुताला मार देऊन, दमदाटी करुन अथवा मंतरलेले नीर किंवा उडीद वगैरे झपाटलेल्या व्यक्तीच्या अंगावर टाकुन भुत काढण्याचा प्रयत्न होतो. ही फार मोठी चुक आहे. अशा कृतीमुळे पिशाच्च निघुन जाण्याऐवाजी पिसळण्याचाच जास्त संभव असतो.

भुतपिशाच्च्यांना मानवासारखेच मन व विकार असतात. अभाव फक्त स्थुलरुप लिंगदेहाचा असतो. पिशाच्यांचे मन चतुर्मिर्ती अवस्थेतील असते. मानवी मनापेक्षा अनेक पटीने बलवान असल्यामुळे विशेषतः चतुर्मिर्ती म्हणजे चारही दिशांना वेढलेले असल्यामुळे सामान्य माणसे त्यांचा प्रतिकार करु शकत नाहीत. याउलट अल्पकाळातच सदेह बळी पडुन जीवनाची वाताहात करवुन घेतात.

बाधीत परिस्थितीत गोड बोलुन, त्यांना योग्य मान देऊन व सर्वसाधारण वासना तृप्त करुन कष्टांचे निवारण करता येते. कोणताही राग द्वेष न धरता, भुतपिशाच्यांविषयी भीति व शत्रुत्वाची भावना नष्ट करुन उचित पाऊले उचलल्यास आपल्या जीवनातील बर्याच कष्टांचे निराकरण होऊ शकते.

प्रसन्नचित्त पिशाच्च चतुर्मिर्ती मनामुळे आपले कल्याणच करतील त्याच सोबत मानवी अंतर्मनाशी असलेला पिशाच्च्यांचा संबंध आपली अर्थिक परिस्थिती सुधारणे, गृहकलह नष्ट करणे, वितुष्ट निर्माण झालेल्या पतिपत्नीत ऐकोपा घडवुन आणणे अशा गोष्टी सहज शक्त आहेत.


पिशाच्च अतृप्त वासना न कामनेमुळेच व्यक्तीस धरते. खाणे, पिणे, विषयसुख, द्रव्यरक्षण व सवतीमत्सर ई. असे वासनांचे स्वरुप असते. अमावस्येच्या रात्री दहिभात व तळलेला पापड पानावर ठेवुन ते पान पिंपळाच्या झाडाखाली ठेवले तर अन्नाची वासना असलेले पिशाच्च शांत होतात. भुतपिशाच्यांचा योग्य सन्मान केला तर ते तुमचे मित्रच बनतील. अशाप्रकारे मानवाचे किती कल्याण करतील त्यास मर्यादा नाही.



प्रामाणिक शिवदत्त साधकांच्या सान्निध्यात सामान्य लोकांच्या तुलनेत पिशाच्यरुपी शक्तिंचा वावर जास्त प्रमाणात असतो. ज्याप्रमाणे साधारण व्यक्तींच्या देहावर पिशाच्यशक्ती परिपुर्ण नियंत्रण प्राप्त करतात याउलट शिवदत्त साधक त्यांच्या सभोवताली वावरत असणाऱ्या भुतपिशाच्यांसोबत अनायासे आपुलकी प्रकट करतात. त्यायोगे साधकांना त्यांच्या अडचणीच्या काळात पिशाच्चगणांची बरीच अनपेक्षित मदत मिळते.

सद्गुरुज्ञात विचारसरणीप्रमाणे, भुतप्रेत पिशाच्चगणांनी शिवदत्त साधकांना यथार्थ सहयोग करायला हवे कारण त्यायोगे संबंधित भुतशक्तींची प्रेतपिशाच योनीतुन मुक्त होण्याची संभावना प्रकट होऊ लागते. त्याअर्थी तापयोनीतुन आपली त्वरीत मुक्ती होऊन पुढील नियतीमार्ग क्रमण करता यावा यासाठी पिशाचगण शिवदत्त साधकांना यथाशक्ति सहकार्य करण्याचा प्रयत्न करतात.




ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...