यज्ञ त्राटक ( Yagya Tratak ) - अग्नी त्राटक ( Fire Tratak )


'यज्ञाने तुम्ही देवांना प्रसन्न करा. देव तुम्हाला प्रसन्न करतील आणि ऐकमेकांना प्रसन्न करता करता तुम्ही परम श्रेयाला प्राप्त व्हा.'

'यज्ञाने तुम्ही देवांना प्रसन्न करा. देव तुम्हाला प्रसन्न करतील आणि ऐकमेकांना प्रसन्न करता करता तुम्ही परम श्रेयाला प्राप्त व्हा.'

यज्ञ प्रजेच्या बरोबरच उत्पन्न झाला आहे आणि त्याच्याबरोबर तो मृत्यूपर्यंत राहातो. मनुष्य त्याच्यापासून अलग होण्याचा प्रयत्न करील तर तो मनुष्य मनुष्यत्वापासुन वंचित होईल. योग्य अर्थाने केलेला यज्ञ मनुष्यासाठी मनोकामना पुरी करणाऱ्या कामधेनूसारखा आहे. यज्ञ माणसाला कर्मबंधनापासुन मुक्त ठेवतो. त्यायोगे यज्ञाची अभिव्यक्ती समजावुन घेणे भौतिक व आध्यात्मिक दृष्टिकोनातून त्राटक करणेंहेतु अतिमहत्वाचे ठरते. जेणेकरुन दुरदृष्टीयुक्त साधकाला जीवनाच्या मुख्य प्रवाहात विनाअडचण कार्यसिद्धी सुरळीतपणे अवगत करता येईल.


यज्ञासाठी करण्यात येणाऱ्या कर्माशिवाय दुसऱ्या कर्मांनी ह्या लोकी बंधन निर्माण होतात. ज्या अर्थी आसक्ती सोडुन आपण यज्ञाच्या निमित्ताने कर्म केल्यास जीवन्मुक्त अवस्था प्राप्त होईल. आपल्या दृष्टीक्षेपात यज्ञ त्राटकाद्वारे साधन साध्य समाधी ज्ञानाची कार्यप्रणाली कळल्यास आपण जीवन-व्यवहारात क्षणोक्षणी यज्ञ करु शकतो. मनुष्याचे आयुष्य यज्ञमय झाले पाहीजे. सर्व दैनंदिन क्रीया यज्ञस्वरुप झाल्या पाहीजेत. यज्ञ समन्वयित करण्याच्या क्रीयेत त्राटकाद्वारे आपण अधी बहिर्मुख यज्ञ यागाकडे पाहुन आपल्याला हळुहळू त्राटक सराव वाढवता आला पाहीजे. जेणेकरुन आपल्या चित्तवृत्ती यज्ञकर्मभुमीचा आत्मबोध योग्यप्रकारे जागृत होईल. त्यायोगे आपला आत्मोद्धार होऊन उत्तम गती प्राप्त होते.


'यज्ञ' या शब्दाचा अर्थ असा की, 'यज्' धातुची देवपुजा, संगतीकरण-मैत्री आणि दान आसे तीन अर्थ आहेत. दैवी संपत्तीवाल्या लोकांचे नाव देव असे असते. त्यांचा सत्कार करणे, सामान्य जनाचे संगतीकरण म्हणजे संघटन उभे करुन, त्यांच्यात मैत्रीचा भाव जागवणे आणि दान करणे ह्या तीन गोष्ट जेथे येतात त्या कर्माचे नाव यज्ञ. ह्या दृष्टीने पाहता सत्कार, संघटन-मैत्री व दान ही तीन यज्ञाची लक्षणें आहेत. संबंधित यज्ञ शब्दाची सुक्ष्मता ध्यानात येण्याहेतु आपण आपली प्राणशक्ती त्राटक माध्यमातून संंबंधित ईष्ट देवांपर्यंत पोहोचवली पाहीजे अथवा पोहोचवता आली पाहीजे. याची प्रतिक्रीयेचे स्वरुप म्हणुन आपल्याला दैवी सान्निध्यामार्फंत सुक्ष्मज्ञान होण्यास सुरवात होते.

ज्या साधाकांना गुरुकृपा नाही. अनुग्रह नाही अशा साधकांनी यज्ञ अथवा अग्नी त्राटकवय भर द्यायला हवा. हे त्राटक आपला दैवी शक्तींसोबत त्वरीत संबंध प्रस्थापित करणें साधन आहे जेणेंकरुन आपला सद्मार्ग सद्गुरु आश्रीत राहुन आपण जीवनाचे अंतिम ध्येय गाठु शकतो. यज्ञात होम, हवनाचे प्राधान्य असते. आपले कितीतरी खरे संस्कार अग्नीच्या साक्षीने करण्यात येतात. होम-हवन हे अग्नी पुजनाचे प्रतिक आहे. अग्नित स्वाहाशक्ती व स्वधाशक्ती आहे. स्वाहाशक्ती आत्मसमर्पणाची प्रेरणा देते तर स्वधाशक्ती आत्मधारणा दर्शवते. यज्ञ त्राटक करणाऱ्या साधकाने नेहमी ह्या दोन शक्तींचे आत्मसंवर्धन केले पाहीजे.

अग्नी तेजस्वी आहे तरीपण नम्र आहे. मनुष्यही अग्नीसारखा तेजस्वी व्हायला पाहीजे. कोणतेही कार्य ह्दयपुर्वक व ईश्वर-प्रीत्यर्थ करण्यात आले तर ते सत्कार्य, यज्ञ म्हण्टले जाते. यज्ञाच्या पाठीमागे पाप प्रक्षालनाचा हेतु लपलेला असतो. मनुष्याकडुन जाणते अथावा अजाणतेपणाने होणाऱ्या पापाचे प्रक्षालन करण्याचे सामर्थ यज्ञ भुमीत आसते. हीच यज्ञ भुमी म्हणजे आपला देह. मनुस्मृतीतही प्रत्ञयेक गृहस्थाश्रमी मनुष्याने पंचयज्ञ करावा असे सांगितले आहे. सर्वपापांचे प्रायश्चित म्हणजे पंचयज्ञ आहे.


यज्ञ त्राटक हा ब्रम्हयज्ञ आहे. पितरांचे तर्पण हा पितृयज्ञ आहे. होम करणे हा देवयज्ञ आहे. बलि देणे हा भुतयज्ञ आहे आणि अतिथीपूजन करणें हा मनुष्य यज्ञ आहे. आत्मअध्ययन व अध्यापन करणें म्हणजे ब्रम्हयज्ञ. ऋषियज्ञ म्हणजे आपले मन, बुद्धी ह्यांची शुद्धी करण्यासाठी ऋषींनी दिलेल्या विचारांचे मनन व चिंतन. ते आत्मसमर्पणाद्वारे शक्य आहे. तर्पणाद्वारे माणसाने पितृयज्ञ केला पाहीजे. मनुष्यावर आई-बापाचे ऋण आहेत. देवयज्ञ म्हणजे देवप्राप्तीसाठी केलेले कर्म. भुतयज्ञ म्हणजे प्राणीमात्रांवर प्रेम...!


पाच विभिन्न यज्ञांचे कर्मस्वरुप म्हणजे यज्ञ त्राटक...! यज्ञ त्राटकाद्वारे होणाऱ्या सुक्ष्म यज्ञाला तपोयज्ञ असे म्हणतात. हे तप आपचरणात आणल्यास काय प्राप्त होते हे सांगण्यापेक्षा अनुभवणें महत्त्वाचे...! थोडक्यात फलश्रुती सांगण्यात आली तर ती म्हणजे, " मी यज्ञ आहे " ही भावना जागृत होऊन सर्व सुक्ष्मलोकांत भ्रमण करण्याची आत्मशक्ती प्राप्ता होणे.


आत्मसाक्षात्काराची तीव्र ईच्छा असलेल्या साधकांनी अंतर त्राटकावर विशेष भर दिला पाहीजे. अंतर त्राटकाचे प्रकार खालीलप्रमाणे दिले आहेत.


महत्त्वाची टिप...

संबंधिक साधनाक्रीया संबंधित साधना तज्ञांच्याच मार्गदर्शनाखाली कराव्यात.


0