स्वस्तिक त्राटक - अर्थिक दारिद्रयाने त्रस्त असलेल्या साधकांसाठी - Works Quikly


मानसिक, शारीरिक, सामाजिक व आध्यात्मिक सोंग सहज घेता येते परंतु आर्थिक सोंगाडेपणा करता येत नाही. धगधगत्या जलद जीवनशैलीत दोन वेळच्या अन्नाची सोय होणे हेतु दैनंदिन कर्मात शरीर झिजत असते. काही मनुष्यांना अर्थिक समाधान मिळते परंतु बहुतांशी मनुष्ये स्वतःच्याच चुकांमधे संभ्रमित अवस्थेत अयोग्य निर्णय घेऊन फसतात, परीणामी हातात घेतलेले कार्य पुर्ण होत नाही त्यायोगे स्वस्तिक त्राटक साधना अशावेळी अत्यंत मोलाची कामगिरी पार पाडु शकते.

स्वस्तिक हे भारतीय संस्कृतीचे अजोड प्रतिक आहे. कोणतेही मंगल कार्याच्या आरंभी आपण स्वस्तिमंत्र म्हणतो...! कोणतेही आर्थिक कार्य पुर्णत्वास पोहोचणे हेतु कार्याची सुरवात मंगलाचरणाने करण्याची परंपरा आहे. आध्यात्मिक साहीत्यातील महाकवी स्वतःच्या ग्रंथाची सुरवात मंगलाचरणाचा एक श्लोक लिहुन मंगलमुर्ती भगवंताचे वाङमयीन पुजन करतात. अशाप्रकारची श्लोक रचना करणे हे सामान्य माणसाला शक्य नाही. म्हणून ऋषींनी त्याला एक चिन्ह दिले आणि ते म्हणजे स्वस्तिक...! हेच स्वस्तिक चिन्ह मंगलाचरणाच्या स्वरुपात कोणतेही आर्थिक कार्यसिद्धी संपन्न हेतु स्वस्तिक त्राटक साधनेत आत्मयोजलें जाते.


स्वस्तिक शब्द ' सु + अस ' धातु पासुन बनलेला आहे. ' सु ' म्हणजे चांगले कल्याणमय, मंगल आणि ' अस ' म्हणजे सत्ता, अस्तित्व. स्वस्ति म्हणजे लक्ष्मीदायक मंगयमय कल्याणाची सत्ता आणि त्यांचे प्रतिक म्हणजे स्वस्तिक. जेथे जेथे श्री आहे, शोभा आहे, सुसंवाद आहे; प्रेम, उल्हास, जीवनाचे औंदार्य आणि व्वयहारीक सौहार्द दिसते, तेथे तेथे स्वस्ति भावना सर्व व्यापुन राहीलेली आहे. स्वस्ति भावनेतुनच मानवाचा तसेच विश्वाचा सर्वांगीण विकास साठलेला आहे. 


स्वस्तिक त्राटक साधनेतुन लक्ष्मी मातेची अनुभुती सहज आणि अनायासे अनुभवास येते. स्वस्तिक हे अतिप्राचीन मानवाने निर्माण केलेले सर्वप्रथम धर्मप्रतीक आहे. प्राचीन मानवाकडुन पूजिल्या गेलेल्या अनेक देवांची शक्ती व मानवाची शुभ कामना ह्या दोहोंच्या संमिलीत कामनांचे प्रतिक म्हणजे स्वस्तिक...!

स्वस्तिक चिन्हातील सुक्ष्म त्राटक आत्मविश्लेषण

एक उभी रेषा आणि त्याच्यावर तेवढ्याच लांबीची दुसरी आडवी रेषा ही स्वस्तिकाची मुळ आकृती आहे. उभी रेषा ही ज्योतिलिंग दर्शन आहे. ज्योतिलिंग हे विश्वाच्या उत्पत्तीचे मुळ कारण आहे. आडवी रेषा ही विश्वाचा विस्तार दाखवते. ईश्वरानेच हे विश्व निर्माण केले व देवांनी स्वतःची शक्ती खर्च करुन त्याचा विस्तार केला असा मुळ स्वस्तिकाचा भावार्थ आहे. 

एकमेव व अद्वितीय ब्रम्ह विश्वरुपात विस्तार पावले ही गोष्ट स्वस्तिकाची उभी व आडवी रेषा स्पष्टरित्या समजावते. हे मुळ स्वस्तिक holy cross च्या रुपानेच आज ख्रिश्चन लोकांच्या उपासनेत पाहायला मिळते. त्याअर्थी holy cross ची उत्पत्ती हिंदु धर्माच्या स्वस्तिक मंगलदायी प्रतीमेतुन झाली. स्वस्तिकाची निर्मिती येशुच्या क्राँसपुर्वी हजारो वर्षे अगोदार झालेली आहे.


स्वस्तिकाच्या चार भुजा म्हणजे भगवान विष्णुचे चार हात. भगवान विष्णु स्वतःच्या चार हातांनी चारही दिशाचे पालन करतात. भगवन्ताचे चारही हात मला सहाय्य करणारे आहेत, तसेच चार दिशा मला माझ्या कार्यक्षेत्राची कक्षा सांगतात. आमच्या कोशात लिहीले आहे की,  ' स्वस्तिकः सर्वतो भद्रा ' स्वस्तिक म्हणजे सर्व बाजूंनी सर्वरित्या कल्याण असा ह्या प्रतिकाचा भाव आहे. 


सर्वांचेच मंगल व्हावे असे केवळ बोलुन मोकळे व्हायचे असे नाही त्याअर्थी स्वतः स्वस्तिक त्राटक साधनेतुन कार्यसिद्धी करुन इरांनाही संबंधित लाभ होण्यास प्रेरीत करणे असा आहे. स्वस्तिकाची उभी रेषा भगवान माझ्या सोबत आहे व आडवी रेषा म्हणजे तु भगवंताच्या सत्कर्मात विश्वरुपात व्याप्त होणे असा आहे.

त्राटक साधनेच्यामाध्यमातुन स्वस्तिकात देश व काळ ह्यांचा मिलनयोग पाहाता येतो. स्वस्तिकाचा मध्यबिंदु हा देश काळ ह्यांचा मिलन बिंदु आहे. देश व काळ ही सापेक्ष तत्वे आहेत. परमात्म्याच्या जवळ पोचणार्याला मनुष्याला देश - काळाची बंधने नडत नाहीत. देश कालातील आनंद हाच खरा आनंद, ज्याची अनुभूती माणसाला सहज समाधीच्या क्षणी शक्य आहे. 


स्वस्तिकाचा मध्यबिंदु हा भगवान विष्णुचे नाभीकमळ व ब्रम्हाचे उत्पत्ती स्थान आहे त्याअर्थी स्वस्तिक हे सर्जनाचे प्रतिक आहे. स्वस्तिकाच्या पाठीमागे श्री विद्यायुक्त परमलक्ष्मीदायक मंगलमय सद्भावना लपलेली आहे. विवाहयोग जुळवण्यातही स्वस्तिकाचे मांगल्य साक्ष घेण्यात येते. समृद्धी व संपन्नतेचा भाव त्यायोगे दर्शविला आहे. चातुर्मासात स्वस्तिक व्रत सौभाग्यवयी महीलांनी करावेत कारण सर्व समृद्धीकारक योग जुळुन येतात.


घराच्या दरवाज्यावर उंबरठा असलेल्या ठिकाणी स्वस्तिक काढण्याची प्रथा आहे. जेणेकरुन सौभाग्यदायी लक्ष्मीचे आवाहन सहजच होईल...! अशी मंगलमय कामना आहे. भारतीय नारीच्या मंगल भावानांचे मुर्तिमंत प्रतीक म्हणजे हे स्वस्तिक...!

अशा स्वस्तिक त्राटक विद्येत योग साधनारत होत असल्यास विष्णुपत्नी लक्ष्मीचे आवाहन अत्यंत सुलभ होते. घरातील कष्टांचे समुळ निराकरण होण्यासाठी सर्व तत्वे सामंजस्य वृत्तीने अंगीकारली पाहीजेत. जेणेकरुन स्वदुःखावर मात करता येईल व समृद्धी, सौख्यता स्वदारी नांदत येईल.


अर्थिक विवंचनेत असलेल्या मनुष्याने ही साधना करावी. संबंधित साधनेच्या अधिक माहीतीसाठी दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट संस्थेशी संपर्क करावा. चारही पुरुषार्थाचे ( धर्म, अर्थ, काम, मोक्ष ) आधारस्थान असलेल्या स्वस्तिकाचे त्राटक साधनायोग तरुण आथवा प्रौढवर्ग सहजच संधान साधु शकतो.




महत्त्वाची टिप...

संबंधिक साधनाक्रीया संबंधित साधना तज्ञांच्याच मार्गदर्शनाखाली कराव्यात.