देवी अथर्वशीर्ष ( Shree Devi Atharvashirsa ) उपनिषद् माहात्म्य व नवार्ण मंत्र साधना


घरातील देवघर देवपंचायतनातील भगवती स्थानाधिष्ठीत प्राणोपासना होण्यसाठी वेदोक्त अथर्वशीर्ष पाठ होणे महत्त्वाचे आहे. प्रारंभिक प्राणोपासनेपासुन प्रणव उपासने पर्यंत आध्यात्मिक प्रगतीची अंतरीक प्रबळ ईछ्या असल्यास त्यायोगे सद्गुरु महाराज मार्गदर्शक तत्वावर दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट माध्यमातून परमार्थिक साधन सरीता प्रकाशित करण्यात येते. साधन, साध्य व समाधी अवस्थेपर्यंत तात्त्विक आत्ममार्गक्रमणहेतु पारदर्शक व प्रामाणिक नितिमत्ता असल्यास संस्थेचे आध्यात्मिक साधना आधोरेखित सर्व ब्लाँग पोस्टस् व्यवस्थित समजावुन घेणे व त्यायोगे संपर्क करावा.


प्राणशक्ती व संसारीक जीवन

प्राणशक्तीच्या उपासनेशिवाय मानवाचे जीवन फुलणार नाही. प्राणशक्तीची उपासना त्याच्या व्यक्ती जीवनाला, कौटुंबिक जीवनाला, सामाजिक जीवनाला व राष्टीय जीवनाला प्राणवान बनवते. ही समग्र दृष्टी प्राणवान लोकांची आहे. निष्प्राण लोक कोणतेच कार्य पार पाडू शकत नाही. ईतकेच नाही तर त्यांचे अस्तित्व या पृथ्वीवर फक्त भार म्हणुन राहाते. पंचप्राणापैकी ह्दयस्थ प्राणवायु अंतर्निहीत प्राणशक्ती स्वदेहासाठी मृतसंजीवनीच आहे. आज वर्तमान स्थितीत कोणालाही या स्वतःच्या ह्दयात असणाऱ्या शक्तीचा अभ्यास नाही हे तर दुर्दैवच समजायला हवे. ईतर कोषांप्रमाणेच मानवी देहात पंचप्राण कोष असतात. त्यापैकी प्राणमय कोष सर्वात मोठा व गहन शक्तीप्रणालीयुक्त आहे.

ह्दयस्थ असलेल्या प्राणशक्तीचे काम आपले चित्त शुद्धीकरणाचे आहे. हे कार्य बरोबर चालत राहिले तर मानवात स्फुर्ती व उत्साह राहातो. प्राणशक्तीच्या अभावी मनवात दुःख क्लेश व दारिद्रयाचे थैमान दिसुन येते. संसारीक जीवनात मानव दगावतो व संंबंधित हाती घेतलेले कार्य अडकुन पडते.जीवनात प्राणशक्तीची उपासाना म्हणजे प्राणवान विचारांची उपासना. निष्प्राण व निषेधात्मक विचार जीवनचे हनन करतात. मानव निराशावादी व नास्तिक होतो. तो सतत संसारिक लघुताग्रंथीनी पछाडलेला राहातो. याउलट प्राणशक्तीमय मानव कधीही निराश होत नाही. परीस्थीती पालटण्याचे अद्भुत व अनाकलनीय सामर्थ्य त्याच्यात सामावलेले असते. त्याला स्वतः बद्दल आत्मगौरव असतो. जीवनाची प्रकाशमय बाजु पाहाण्यासाठी त्याची बाजु विकसित झालेली असते.


अशा आत्मउत्साही मानवाच्या घरात निवास करण्याच्या हेतुने लक्ष्मी स्वतःच धावत येते.


कुटूंबात जर प्राणशक्तीची उपासना होत नसेल तर संसारीक जीवन शुष्क व यंत्रवत् बनते. उत्याहशुन्य मानवामुळे कोणत्याही कार्यात जडत्व येते. नचिकेता हे प्राणवान मानवाचे प्रतीक आहे. नचिकेता म्हणजे प्रलोभनाला बळी न पडणारा, भीतीमुळे न पळणारा तसेच भोगामुळे नष्ट न होणारा...! असा निष्ठावान मनुष्यच जगाला बदलवु शकतो.


प्राणशक्तीमय मनुष्य अमुल्य असतो तर निष्प्राण मनुष्याला काही किंमत असत नाही. राष्ट्रातुन प्राणशक्ती निघुन गेली तर राष्ट्रही हतवीर्य, गलितगात्र बनुन कोणाचीही शरणागती स्वीकारते उदा. आपल्या शेजारील म्लेच्छीत यवनांचे पापीस्थान राष्ट्र...!


प्राणशक्तीच्या उपासनेतुनच पुढील आध्यात्मवादी गहनात्मक सुक्ष्म कार्यप्रणाली उदयास येऊ शकते. ईतर कोणताही दुसारा मार्ग या पृथ्वीतलावर उपलब्ध नाही. अशा प्राणशक्तीच्या उपासनेसाठी देवी भगवतीच्या अथर्वशीर्ष उपनिषदाचे स्मरण सर्व नवरात्रीत रात्री करावेत. नवार्ण मंत्राचे श्री विद्यात्मक साधन करण्याची उत्सुकता असल्यास संस्थेशी संपर्क करावा.

आपल्या स्वदेह, घरात व घरातील सदस्यांना प्राणशक्तीचे परम सान्निध्य मिळण्यासाठी श्री देवी अथर्वशीर्ष उपनिषद् खालीलप्रमाणे साधनात स्मरण करावेत....!


श्रीदेव्यथर्वशीर्षम्


ll शांती पाठ ll
ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः । भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः ॥

स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः । व्यशेम देवहितं यदायुः ॥
ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः । स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः ॥
स्वस्तिनस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः । स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ॥ॐ शांतिः । शांतिः ॥ शांतिः॥।ॐ सर्वे वै देवा देवीमुपतस्थुः कासि त्वं महादेवीति ॥१॥साब्रवीत्- अहं ब्रह्मस्वरूपिणी । मत्तः प्रकृतिपुरुषात्मकं जगत् । शून्यं चाशून्यम् च ॥२॥ll भावार्थ llॐ सर्व सुरगण एकदा आदिमाता चण्डिकेजवळ जाऊन तिची प्रार्थना करू लागले, ‘‘हे महादेवी! तू कोण आहेस ?  ॥ १ ॥ती आदिमाता म्हणाली, ‘‘मी ब्रह्मस्वरूप आहे. माझ्यापासूनच प्रकृति-पुरुषात्मक म्हणजेच कार्य-कारणरूप जगताची उत्पत्ति होते. शून्य आणि अशून्य मीच आहे. ॥ २ ॥ll स्वरुप तत्व llअहमानन्दानानन्दौ । अहं विज्ञानाविज्ञाने । अहं ब्रह्माब्रह्मणी वेदितव्ये । अहं पञ्चभूतान्यपञ्चभूतानि । अहमखिलं जगत् ॥३॥वेदोऽहमवेदोऽहम्। विद्याहमविद्याहम्। अजाहमनजाहम् । अधश्चोर्ध्वं च तिर्यक्चाहम् ॥४॥ll भावार्थ llमी साक्षात आनन्द असून अनानन्दरूपही आहे. मीच विज्ञानरूप आणि अविज्ञानरूप आहे. ब्रह्म आणि अब्रह्म यांतही मलाच जाणा. पंचीकृत व अपंचीकृत महाभूतेही मीच आहे. हे सर्व जगत् मीच आहे ll ३ llवेद आणि अवेद मी आहे. विद्या आणि अविद्या मी आहे. ‘अजा’ (जिला जन्म नाही अशी मूळप्रकृति) आणि ‘अन्-अजा’ही (मूळप्रकृतिपेक्षा वेगळे असे जे ते) मीच आहे. खाली, वर, आजूबाजूला अशी सर्वत्र मीच व्यापलेली आहे ॥ ४ ॥अहं रुद्रेभिर्वसुभिश्चरामि । अहमादित्यैरुत विश्वदेवैः ।

अहं मित्रावरुणावुभौ बिभर्मि । अहमिन्द्राग्नी अहमश्विनावुभौ ॥५॥अहं सोमं त्वष्टारं पूषणं भगं दधामि। अहं विष्णुमुरुक्रमं ब्रह्माणमुत प्रजापतिं दधामि ॥६॥ll भावार्थ ll
मीच एकादश (अकरा) रुद्रांच्या रूपाने आणि अष्ट (आठ) वसुंच्या रूपाने सर्वत्र संचार करते. मीच आदित्य व विश्वदेव ह्यांच्या रूपात विचरण करते. मित्र आणि वरुण, इन्द्र आणि अग्नि, तसेच दोन्ही अश्‍विनीकुमार ह्यांचे भरण-पोषण मीच करते.॥ ५ ॥


मीच सोम, त्वष्टा, पूषा आणि भग ह्यांना धारण करते. तसेच विष्णु, उरुक्रम (त्रिविक्रम), ब्रह्मदेव आणि प्रजापति ह्यांचा आधार मीच आहे. ll ६ ll


अहं दधामि द्रविणं हविष्मते सुप्राव्ये उ यजमानाय सुन्वते ।
अहं राष्ट्री सङ्गमनी वसूनां चिकितुषी प्रथमा यज्ञियानाम् ।
अहं सुवे पितरमस्य मूर्धन्मम योनिरप्स्वन्तः समुद्रे ।
य एवम् वेद। स देवीं सम्पदमाप्नोति ॥७॥


ll भावार्थ ll


देवांना हवि पोहोचविणार्‍या व सोमरस काढणार्‍या यजमानांसाठी हवियुक्त धन मीच धारण करते. मीच संपूर्ण विश्वाची ईश्वरी, उपासकांना धन देणारी, ज्ञानवती व यज्ञीय लोकांत (यजन करण्यास योग्य अशा देवतांमध्ये) मी मुख्य आहे. 

संपूर्ण जगत् ज्या तत्त्वांपासून उत्पन्न होते अशा आकाश आदि सर्व मूळ तत्त्वांना मीच प्रसवते. (सर्वांचे अधिष्ठान असलेला परमात्मा माझ्यातूनच उत्पन्न झाला आहे.) 
माझे मूळ स्थान समुद्र-जलात आहे. (आदिमाता चण्डिकेचे मूळ स्थान क्षीरसागरातील मणिद्वीपात आहे.)’’ 
हे जो जाणतो त्याला ईश्‍वरी संपदा प्राप्त होते.   ॥ ७ ॥


ll माता स्तुती llते देवा अब्रुवन् - नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः ।

नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणताः स्म ताम् ॥८॥


तामग्निवर्णां तपसा ज्वलन्तीं वैरोचनीं कर्मफलेषु जुष्टाम् ।

दुर्गां देवीं शरणं प्रपद्यामहेऽसुरान्नाशयित्र्यै ते नमः ॥९॥


ll भावार्थ ll


ते देवगण म्हणले- 

‘‘हे देवीमाते ! तुला नमस्कार असो. कल्याण करणार्‍या महादेवीला आमचा नित्य नमस्कार असो. गुणसाम्यावस्थारूपिणी मंगलमयी देवीला नमस्कार असो. नियमशील आम्ही (मर्यादाशील असे आम्ही) तुला प्रणाम करतो.
॥८॥


अग्निसमान वर्णाच्या, ज्ञानतेजाने देदीप्यमान असणार्‍या, प्रदीप्तमति, कर्मङ्गलप्राप्तिसाठी जिची उपासना केली जाते अशा दुर्गादेवीस आम्ही पूर्णपणे शरण आहोत. असुरांचा नाश करणार्‍या हे आदिमाते दुर्गे! तुला नमस्कार असो.’’  ll ९ ll


देवीं वाचमजनयन्त देवास्तां विश्वरूपाः पशवो वदन्ति
सा नो मन्द्रेषमूर्जं दुहाना धेनुर्वागस्मानुप सुष्टुतैतु ॥१०॥


 कालरात्रीं ब्रह्मस्तुतां वैष्णवीं स्कन्दमातरम् ।

सरस्वतीमदितिं दक्षदुहितरं नमामः पावनां शिवाम् ॥११॥


ll भावार्थ ll


प्राणरूपी देवांनी ज्या प्रकाशमान वैखरी वाणीची उत्पत्ती केली, ती कामधेनुतुल्य आनंद देणारी, अन्न आणि सामर्थ्य प्रदान करणारी वाक्-रूपिणी भगवतीदेवी आदिमाता उत्तम स्तुतीने संतुष्ट होऊन आमच्या निकट यावी आणि सदैव असावी.  ॥ १० ॥


काळाचा नाश करणारी, वेदांकडून स्तविली जाणारी, वैष्णवी (विष्णुशक्ति), स्कन्दमाता (शिवशक्ति), सरस्वती (ब्रह्मशक्ति), अदिति, दक्षकन्या (सती), पावन करणारी, कल्याण करणारी अशी जी शिवा आहे, तिला प्रणाम करतो. 

(शिवा हे संबोधन देवमाता (आदिमाता चण्डिका) आणि भक्तमाता (परमात्मशक्ति आह्लादिनी) या दोघींसाठीही आहे. अदिति हे परमात्म्याच्या मातेचे म्हणजेच देवमातेचे नाम आहे, तर दक्षदुहिता हे भक्तमातेचे नाम आहे. पुढे तेराव्या श्‍लोकात ह्या दोघींचे माता-कन्येचे नाते सांगितले आहे.) ॥ ११ ॥ 


ll गायत्री मंत्र ll


महालक्ष्म्यै च विद्महे सर्वशक्त्यै च धीमहि।तन्नो देवी प्रचोदयात् ॥१२॥


अदितिर्ह्यजनिष्ट दक्ष या दुहिता तव l तां देवा अन्वजायन्त भद्रा अमृतबन्धवः ॥१३॥ कामो योनिः कमला वज्रपाणिर्गुहा हसा मातरिश्वाभ्रमिन्द्रः । पुनर्गुहा सकला मायया च पुरूच्यैषा विश्वमातादिविद्योम् ॥१४॥


ll भावार्थ ll


आम्ही महालक्ष्मीला जाणतो आणि त्या सर्वशक्तिस्वरूपिणीचे ध्यान करतो; ती  आदिमाता चण्डिकादेवी आम्हाला ध्यानाद्वारे तिचे सामीप्य प्राप्त करण्यात प्रबळ प्रेरणा देवो.  ॥ १२ ॥


हे दक्ष ! तुझ्या कन्येला त्या अदितिनेच जन्माला घातले. तिच्यापासून अमृततत्त्व लाभलेले (मृत्युरहित) व स्तुति करण्यास योग्य असे देव उत्पन्न झाले.  ॥ १३ ॥


काम (क), योनि (ए), कमला (ई), वज्रपाणि- इन्द्र (ल), गुहा (ह्रीं), ह, स हे दोन वर्ण, मातरिश्वा- वायु (क), अभ्र (ह), इन्द्र (ल), पुनः गुहा (ह्रीं), स, क, ल हे तीन वर्ण आणि माया (ह्रीं) ही (पंचदशाक्षरी) सर्वात्मिका जगन्मातेची म्हणजेच आदिमाता चण्डिकेची मूळ विद्या (श्रीविद्या) तसेच ब्रह्मस्वरूपिणी आहे. 

(ह्या मंत्राचा भावार्थ= शिव-शक्ति अभेदरूपा, ब्रह्म-विष्णु-शिव-तत्त्वात्मिका, सरस्वती-गौरी-लक्ष्मी-तत्त्वात्मिका, अशुद्ध-मिश्र-शुद्ध-उपासनात्मिका, समरसीभूत शिवशक्त्यात्मक ब्रह्मस्वरूपाचे निर्विकल्प ज्ञान देणारी अशी सर्वतत्त्वात्मिका महात्रिपुरसुन्दरी. 
हा मन्त्र सर्व मंत्रांचा मुकुटमणि समजला जातो आणि मंत्रशास्त्रांत पंचदशी ‘कादि’विद्येच्या नावाने प्रसिद्ध आहे. 
ह्याचे भावार्थ, वाच्यार्थ, संप्रदायार्थ, कौलिकार्थ, रहस्यार्थ आणि तत्त्वार्थ असे सहा प्रकारे अर्थ नित्या-षोडशिकार्णव नांवाच्या ग्रंथात आले आहेत. तसेच वरिवस्यारहस्य ग्रंथामध्ये आणि अनेक अर्थ दर्शविले गेले आहेत. 
ह्यावरून दिसून येते की हा मंत्र किती गोपनीय आणि महत्त्वाचा आहे.) ॥ १४ ॥एषात्मशक्तिः । एषा विश्वमोहिनी । पाशाङ्कुशधनुर्बाणधरा । एषा श्रीमहाविद्या । य एवं वेद स शोकं तरति ॥१५॥नमस्ते अस्तु भगवति मातरस्मान् पाहि सर्वतः ॥१६॥ll भावार्थ llही आत्मशक्ति आहे. ही विश्वमोहिनी आहे. पाश, अंकुश, धनुष्य आणि बाण धारण केलेली आहे. ही श्रीमहाविद्या आहे. 

हे जो जाणतो तो शोकापासून मुक्त होतो.  ॥ १५ ॥भगवती माते ! तुला नमस्कार असो, सर्व प्रकारे आमचे रक्षण कर. ॥ १६ ॥सैषाष्टौ वसवः। सैषैकादशरुद्राः । सैषा द्वादशादित्याः । सैषा विश्वेदेवाः सोमपा असोमपाश्च । सैषा यातुधाना असुरा रक्षांसि पिशाचा यक्षाः सिद्धाः । सैषा सत्त्वरजस्तमांसि । सैषा ब्रह्मविष्णुरुद्ररूपिणी। सैषा प्रजापतीन्द्रमनवः । सैषा ग्रहनक्षत्रज्योतींषि । कलाकाष्ठादिकालरूपिणी। तामहं प्रणौमि नित्यम् ।

पापहारिणीं देवीं भुक्तिमुक्तिप्रदायिनीम् । अनन्तां विजयां शुद्धां शरण्यां शिवदां शिवाम्॥१७॥ll भावार्थ ll( मन्त्रदृष्टा ऋषी म्हणतात ) - हीच अष्ट वसु आहे. हीच एकादश रूद्र आहे. 

हीच द्वादश आदित्य आहे. सोमपान करणारे व सोमपान न करणारे विश्वदेवही हीच आहे. 
हीच यातुधान, असुर, राक्षस, पिशाच, यक्ष व सिद्ध आहे. 
हीच सत्त्व-रज-तमरूपिणी आहे. हीच ब्रह्म-विष्णु-रुद्ररूपिणी आहे. हीच ग्रह-नक्षत्र-तारे आहे आणि हीच कला-काष्ठादि कालरूपिणी आहे. 
अशा या आदिमाता चण्डिकेस मी नित्य प्रणाम करतो.॥ १७ ॥ll देवीप्रणव बीज मंत्र llवियदीकारसंयुक्तं वीतिहोत्रसमन्वितम् । अर्धेन्दुलसितं देव्या बीजं सर्वार्थसाधकम् ॥१८॥ एवमेकाक्षरं ब्रह्म यतयः शुद्धचेतसः ध्यायन्ति परमानन्दमया ज्ञानाम्बुराशयः ॥१९॥ll भावार्थ llवियत् म्हणजे आकाश (हं बीज) व ईकार यांनी युक्त, तसेच वीतिहोत्र (सूर्य/ अग्नि) (रं बीज) आणि अर्धचन्द्राने अलंकृत ( ँ ) असे जे आदिमाता चण्डिकेचे बीज (ह्रीं) आहे, ते सर्व पुरुषार्थ सिद्ध करणारे आहे.  ॥ १८ ॥ ज्यांचे चित्त शुद्ध, परम आनंदपूर्ण झालेले आहे, जे स्निग्ध ज्ञानाचे साक्षात सागर आहेत असे यति ‘ह्रीं’ ह्या एकाक्षर मन्त्राचे ध्यान करतात.  ॥ १९ ॥ll नवार्ण मंत्र llवाङ्माया ब्रह्मसूस्तस्मात् षष्ठं वक्त्रसमन्वितम् सुर्योऽवामश्रोत्रबिन्दुसंयुक्तष्टात्तृतीयकः। नारायणेन संमिश्रो वायुश्चाधरयुक् ततः विच्चे नवार्णकोऽर्णः स्यान्महदानन्ददायकः ॥२०॥ll भावार्थ llवाणी (ऐं), माया (ह्रीं), ब्रह्मसू:-काम (क्लीं), ह्यापुढे सहावे व्यंजन ‘च’ हे कान्यासहित (।) घ्यावे म्हणजेच ‘चा’ असे घ्यावे, अवाम (दक्षिण) कर्ण ’उ’ अनुस्वारयुक्त सूर्यसहित घ्यावा म्हणजेच ‘मुं’ असे घावे, नारायणातील ‘आ’ ने युक्त वर्गातील तिसरे अक्षर अर्थात ‘ड’ हे अक्षर घ्यावे म्हणजेच ‘डा’ असे घ्यावे, अधर (ऐ) ने युक्त वायु म्हणजेच ‘यै’ असे घ्यावे आणि ह्या सर्वांनंतर ‘विच्चे’ घ्यावे. असा एकूण नऊ वर्णांचा मंत्र म्हणजेच ‘ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे’ हा नवार्ण मन्त्र आदिमाता चण्डिकेच्या लेकरांना, उपासकांना आनंद व ब्रह्मसायुज्य मिळवून देणारा आहे.  ॥ २० ॥ll चण्डि सगुण ध्यान llहृत्पुण्डरीकमध्यस्थां प्रातः सूर्यसमप्रभां

पाशाङ्कुशधरां सौम्यां वरदाभयहस्तकाम् ।
त्रिनेत्रां रक्तवसनां भक्तकामदुघां भजे ॥२१॥नमामि त्वां महादेवीं महाभयविनाशिनीम् ।

महादुर्गप्रशमनीं महाकारुण्यरूपिणीम् ॥२२॥ll भावार्थ llहृदयरूपी कमलात राहणार्‍या, प्रात:काळच्या सूर्यासमान गुलाबी रंगाची प्रभा असणार्‍या, तेजस्वी असणार्‍या, पाश व अंकुश धारण करणार्‍या, सौम्य, जिचा एक हात वरदमुद्रेत व एक हात अभयमुद्रेत आहे अशा, तीन नेत्र असणार्‍या, लाल रंगाची वस्त्रे परिधान करणार्‍या, भक्तांसाठी जणू कामधेनुच असणार्‍या आदिमाता चण्डिकेची मी भक्ती करतो.  ॥ २१ ॥महा-भयाचा नाश करणार्‍या, महा-अवरोधांचे निवारण करणार्‍या, महाकारुण्यस्वरूपिणी महादेवी दुर्गे, तुला मी नमस्कार करतो.    ॥ २२ ॥ ll चण्डि निर्गुण ध्यान llयस्याः स्वरूपं ब्रह्मादयो न जानन्ति तस्मादुच्यते अज्ञेया। यस्या अन्तो न लभ्यते तस्मादुच्यते अनन्ता । यस्या लक्ष्यं नोपलक्ष्यते तस्मादुच्यते अलक्ष्या । यस्या जननं नोपलभ्यते तस्मादुच्यते अजा । एकैव सर्वत्र वर्तते तस्मादुच्यते एका । एकैव विश्वरूपिणी तस्मादुच्यते नैका । अत एवोच्यते अज्ञेयानन्तालक्ष्याजैका नैकेति ॥२३॥मन्त्राणां मातृका देवी शब्दानां ज्ञानरूपिणी । ज्ञानानां चिन्मयातीता शून्यानां शून्यसाक्षिणी। यस्याः परतरं नास्ति सैषा दुर्गा प्रकीर्तिता॥२४॥तां दुर्गां दुर्गमां देवीं दुराचारविघातिनीम्। नमामि भवभीतोऽहं संसारार्णवतारिणीम् ॥२५॥ll भावार्थ llब्रह्मादिकांना जिच्या स्वरूपाचा पार लागत नसल्याने जिला ‘अज्ञेया’ म्हणतात, जिचा अंत न कळल्यामुळे जिला ‘अनंता’ म्हणतात, जिचे स्वरूप दृग्गोचर होत नसल्यामुळे जिला ‘अलक्ष्या’ असे संबोधिले जाते, जिच्या जन्माचे रहस्य न कळल्यामुळे जिला ‘अजा’ म्हणतात, सर्वत्र जिचे एकीचेचे अस्तित्व असते म्हणून जिला ‘एका’ म्हणतात आणि ती संपूर्ण विश्वरूपाने नटलेली असल्यामुळे जिला ‘नैका’ म्हणतात, 

अशी ही आदिमाता चण्डिका ‘अज्ञेया’, ‘अनंता’, ‘अलक्ष्या’, ‘अजा’, ‘एका’ आणि ‘नैका’ म्हटली जाते.  ॥ २३ ॥सर्व मन्त्रांमध्ये मातृकारूपाने राहणारी, शब्दांमध्ये अर्थ, तत्त्व व ज्ञानरूपाने राहणारी, ज्ञानाच्या सर्व प्रकारांमध्ये चिन्मयातीतरूपाने राहणारी आणि सर्व प्रकारच्या शून्यांमध्ये शून्यसाक्षिणी म्हणून राहणारी आणि जिच्या पलीकडे, जिच्याहून श्रेष्ठ असे काहीही नाही अशा त्या आदिमाता चण्डिकेला ‘दुर्गा’ असे म्हणतात.  ॥ २४ ॥जाणता न येणार्‍या, दुराचाराचा समूळ नाश करणार्‍या, संसारसागरातून तारून पलीकडे नेणार्‍या अशा त्या दुर्गामातेस भवभयाने ग्रस्त असा मी नमस्कार करतो. ॥ २५ ॥ll फलश्रुती llइदमथर्वशीर्षं योऽधीते स पञ्चाथर्वशीर्षजपफलमाप्नोति ।

इदमथर्वशीर्षमज्ञात्वा योऽर्चां स्थापयति शतलक्षं प्रजप्त्वाऽपि सोऽर्चासिद्धिं न विन्दति । शतमष्टोत्तरं चास्य पुरश्चर्याविधिः स्मृतः ।
दशवारं पठेद्यस्तु सद्यः पापैः प्रमुच्यते । महादुर्गाणि तरति महादेव्याः प्रसादतः ॥२६॥ll भावार्थ llह्या अथर्वशीर्षाचा जो प्रेमभावाने अभ्यास करेल, त्याला पाच अथर्वशीर्षांच्या जपाचे फल प्राप्त होते. 

ह्या अथर्वशीर्षाला प्रेमभावाने न जाणता जो पूजा-अर्चा मांडतो, त्याने लाखो वेळा जप केला तरीही त्यामुळे त्याला काहीच साध्य होत नाही. 
शत-अष्टोत्तर-जप ह्याचा पुरश्चरण विधी आहे म्हणजेच पुरश्चरणासाठी ह्याचा 108 वेळा जप करावा. दहा वेळा पठण केल्याने महादेवीच्या प्रसादामुळे तत्काळ पापापासून मुक्ती मिळते आणि अत्यंत दुस्तर अशा संकटांचेही निवारण होते.  ॥ २६ ॥सायमधीयानो दिवसकृतं पापं नाशयति।प्रातरधीयानो रात्रिकृतं पापं नाशयति । सायं प्रातः प्रयुञ्जानो अपापो भवति।निशीथे तुरीयसन्ध्यायां जप्त्वा वाक्सिद्धिर्भवति । नूतनायां प्रतिमायां जप्त्वा देवतासान्निध्यं भवति । प्राणप्रतिष्ठायां जप्त्वा प्राणानां प्रतिष्ठा भवति । भौमाश्विन्यां महादेवीसन्निधौ जप्त्वा महामृत्युं तरति । स महामृत्युं तरति य एवं वेद। इत्युपनिषत् ॥२७॥


 ( विविध प्रयोग )ह्या अथर्वशीर्षाचे जो प्रात:काळी पठण करतो, त्याच्याकडून रात्री घडलेल्या पापांचा नाश होतो. तसेच संध्याकाळी जो पठण करतो, त्याच्याकडून दिवसभरात घडलेल्या पापांचा नाश होतो. सायंकाळी आणि प्रात:काळी प्रेमभावाने ह्याचा आश्रय करणारा पापमुक्त होतो. मध्यरात्रीस किंवा चौथ्या संध्याकाळी ह्याचा जप केल्याने वाचासिद्धी प्राप्त होते. समोर नूतन प्रतिमा ठेवून जप केल्याने महादेवीचे म्हणजेच आदिमाता चण्डिकेचे सान्निध्य लाभते. प्राणप्रतिष्ठेवेळी जप केल्यास प्राणांची प्रतिष्ठा होते. ‘भौमाश्विनी’ योग असताना जप केल्याने श्रद्धावान महामृत्युलाही तरून जातो. अशी ही अविद्येचा नाश करणारी वेदस्वरूपा ब्रह्मविद्या आहे. ॥२७॥॥ शान्ति मंत्र ॥ॐ सहनाववतु ॥ सहनौभुनक्तु ॥ सह वीर्यं करवावहै ॥ तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॥

ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः । भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः ॥ स्थिरैरंगैस्तुष्टुवांसस्तनूभिः ।
व्यशेम देवहितं यदायुः ॥
ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः । स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः ॥ स्वस्तिनस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः ।
स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ॥
ॐ शांतिः । शांतिः ॥ शांतिः ॥।ll श्री स्वामी समर्थ महाराज चरणार्पणमस्तु ll

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...संसारीक लोकांसाठी अनुभवसिद्ध व सोपी साधना - २