घरातील देवारा ( Pooja Room) व उंबरठ्याचे आध्यात्मिक महत्त्व - १- Read right Now


शुद्ध वास्तु विकत घेण्याचे कर्तव्य पार पाडण्याची जबाबदारी आपल्या हातात आहे तर विकत घेतलेल्या वास्तुला पवित्र व मंगलमय करण्याची जबाबदारी घरातील देवघराची असते. त्यायोगे यथाशक्ति आपण अपेक्षित ज्ञान संग्रहीत केल्यास आपलं जीवन सुगंधीत होऊ शकेल.


मानवी देहाच्या प्रतीकृतीवर संबंधीत वास्तु रेखाटनाची व्युह रचना अवलंबून असते. ज्याप्रमाणे मानवी देहात आत्म्याचे निवासस्थान ह्दयस्थ प्रदेश मानले जाते. त्याचप्रमाणे घरातील देवघर अथवा देवारा हा त्या घरातील ह्दयस्थ प्रदेश मानला जातो. ह्या ह्दयस्थ प्रदेशात अपेक्षित आध्यात्मिक साधनेने आपण नवचैतन्य निर्माण करतो त्यास प्राणप्रातिष्ठा असेही नामकरण केले जाते. संबंधित आध्यात्मिक साधना सात्त्विक स्वरुपातुन घडल्यास घरात होकारार्थी स्पंदनांसोबतच दैवी सान्निध्याचाही संचार अनुभवास येतो.




ज्याप्रमाणे घरातील सर्व सदस्य ऐकमेकांशी सलोख्याने, तर कधी तणावाने वागतात त्याचप्रमाणे देवतांमधेही सलोखा व तणावाची परिस्थिती उद्भवत असते. त्याअर्थी घरातील देवघर जर चुकीच्या पद्धतीने मांडले असल्यास अथवा दिशानिर्देशने चुकत असल्यास घरात वादविवाद अनायासे होत राहातात. देवघरात आपल्यावर अधिकार असणारे कुलदैवत अथवा ग्रामदैवत देवघरात स्थानबद्ध नसल्यामुळे आपण फार मोठ्या अडचणी सापडत असतो परंतु त्याची उपाययोजना आपण ओळखु शकत नाही. आपली मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक व आध्यात्मिक प्रगतीवर आपल्या घरातील देवघराचा फार मोठा परिणाम होत असतो.

आपल्या देवघरातील अपेक्षित देव पंचायतन कसे असावे याची कारणमीमांसा आपण स्वामींसेवेत दत्त उपासकांना देत असतो. देवघरातील सर्वात महत्वाचे तत्व म्हणजे घरातील निधान कुंभ ज्याला आपण देवघरातील कळस असेही म्हणतो. कळसाला नाममंत्राने व्यापक केल्यास कुंभ तयार होतो. नव्या घरात प्रवेश करण्यापुर्वी कुंभ ठेवण्याची प्रथा देखील प्रसिद्ध आहे. जलपुर्ण कुंभाप्रमाणे घरही भावपुर्ण व नवपल्लवित राहावे अशी मंगलमय कामना त्याच्या पाठीमागे आहे. जलपुर्ण कुंभातील जलाचे शुद्ध व निर्मळ स्वभाव घरातील वातावरणात दरवळत राहावा यासाठी कुंभाची सुक्ष्मता द्विगुणीत करण्यासाठी कळसावर श्रीफळ  ठेळण्याची प्रथा आहे. त्यायोगे घरात नाममंत्र स्वरातुन शक्तीस्वरुप घटाची स्थापना कुंभाच्या स्वरुपात केली जाते.

घरातील वास्तु पुरुष व राखणदाराचे अभिन्न प्रतिक म्हणुन कळसाचे अस्तित्व मानले पाहीजे. त्याअर्थी जमीनीच्या भुभाराचे सामर्थ्य संबंधित देवता आणि देवदैत्य शक्तींना प्राप्त होऊन, आपल्याला आपल्या कार्यसिद्धीत संबंधित शक्तींची मदत होऊ शकते. अन्यथा मुर्खपणा करत राहील्यास मदतीऐवाजी संबंधित शक्तींकडून अडचणी उत्पन्न होत राहातात. त्यासाठी आपण यथाशक्ति संबंधित ज्ञानार्जित करुन योग्यतो निर्णय दत्त सेवेच्या माध्यमातून घ्यावा व आपलं कौटुंबिक जीवन मंगलमय करावं. घरातील देवस्थानाचे यथार्थ आत्मचिंतन करुन योग्य ती उपाययोजना अमलात आणावी. जेणेकरुन घरात होकारार्थी स्पंदनांचा प्रसार होईल.


वास्तुतील उंबरठा

प्राचीन काळात वास्तु बांधताना क्वचितच ऐखादे घर उंबरठ्याशिवाय असेल. प्रत्येक वास्तुला उंबरठा असण्याचे महत्वाचे कारण आहे. उंबरठा घरातील अब्रुचे रक्षण करणारा आहे. ज्याप्रमाणे मानवी नितिमत्ता अतिशय चंचल असते त्याचप्रणाणे घरातील सुख, सौख्य व मंगलमय स्पंदनेही कोणाला नको असतात. त्यांची चंचलता नियंत्रित करणे हेतु आपल्याला उंबरठा महत्त्वाचा आहे. आजची दुर्भाग्यपुर्ण परिस्थिती अशी आहे की कित्येक नवीन वास्तुला उंबरठाच नसतो त्यायोगे संबंधित घरातील मांगल्य फार काळ टिकु शकत नाही. परिणामी घरात अवदसा येऊन सर्व स्थाथित्वाची वाताहात करुन टाकते.

उंबरठाची अभीव्यक्ती अतीशय सुक्ष्म आणि सखोलतापुर्ण आहे. घरातील सत्वाचे घराबाहेर अतिक्रमण न होऊ देणे व घराबाहेरील अवदसेचे घरात प्रवेश करुन आतिक्रमण न होऊ देणे यासाठी उंबरठा मर्यादा ही लक्ष्मणरेषा समजावी. घरातील सर्व सदस्यांची झडती घेण्याचे काम उंबरठ्याचे असतो त्यायोगे उबंरठा आध्यात्मिक योगे कार्यान्वित करावा. घरात प्रवेश करणाऱ्या सुक्ष्म शक्तिंची शहानिशा करण्याचे कार्य उंबरठा करत असतो. त्याअर्थी आपण आपल्या नित्य आध्यात्मिक साधनेच्या माध्यमातून उंबरठ्याचे सुक्ष्म पुजन करावे.


उंबरठा म्हणजे घराच्या मांगल्याचा रक्षक. आपल्या घरातील बातमी देणारा, वैभव व चारित्र्याचे रक्षण करणारा, लक्ष्मण रेषा दर्शक त्याचप्रमाणे मर्यादा पालनाचा प्रेरक असा उंबरठा प्रत्येक वास्तुसाठी यथाशक्ति स्थिर असायला पाहीजे. घरातील प्रवेश द्वारावर ज्याप्रमाणे देवाची प्रतिमा बसवली जाते त्याच प्रमाणे उंबरठाजवळ संध्याकाळी दिवा लावल्यास आपल्या घरात कधीही दुष्ट शक्तिंचा प्रादुर्भाव होणार नाही. ईतकी अमोघ शक्ती उंबरठ्यात आहे. याचे प्रात्यक्षिक अवश्य करुन पाहावं.


ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...




0