जीवनातील प्रत्येक वस्तुची अंतिम अवस्था काळाच्या ओघात येतच असते. त्यायोगे भौतिकवादातील वस्तुंचा शेवट हा क्षणभंगुरतेतुन ' नाश पावणे ' आणि आध्यात्मिक जीवनातील सुक्ष्मतेचे अंतिम तत्वविश्लेषण ' भस्म होणे ' ही देहबीद्धीच्या पलिकडील कर्मफळे आहेत. त्यायोगे संसारीक जीवाच्या कष्टांची माती होणे आणि चोचले पुरवलेल्या देहाची राख होणे हे तर अतुट सत्य आहे.
दत्त संप्रदायातील दत्ततत्वे अत्यंत गहन व आत्म रहस्यमयी आहेत. ह्या सर्व आत्मानुभुतीचा संसारीक मानवला कमी जास्त प्रमाणात कोणत्याही मध्यस्थीच्या हस्तक्षेपाशिवाय ( स्वामींधर्माच्या ठेकेदारांना बाजुला करुन ) प्रत्यक्ष अनुसंधान साधता यावे यासाठी ' दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट ' या आत्मनिर्भर संस्थेची स्थापना करण्यात आली. दत्त भक्तीतील परम पावन थोर संतजनांना ' दत्त विभुती ' अशी आत्मसंज्ञा असते. ही एक अत्यंत पराकोटीची आणि सद्गुरु स्वरुप अवस्था आहे. त्यायोगे संबंधित योगी दोन प्रकारचे जीवन जगत असतो. प्रथमतः जर समाजाने त्या दत्त योगीचे विचार, आचार व प्रत्याहार समजुन घेऊन त्यायोगे आचरण केल्यास, तो योगी समाजात राहुन दत्तभक्तीचा सहज व सामंजस्यतेने प्रसार करुन स्वतःचं आत्म कर्तव्य पार पाडत असतो. दुसऱ्या अवस्थेत सामान्यतः जर त्या दत्त योगीचे आचरण, तत्वे व सत्वांचा प्रसार न झाल्यास, एकांत काळी अरण्यावस्थेत जाऊन स्वतःच शरीर सुकवत असतात. दोन्हीही अवस्थांमधे दत्त योगींजनांना समाजाने प्रतिसाद देणे अथवा न देणे, यावर त्यांचे जीवन अवलंबून नसते. ते सदाकाळी दत्तकर्मात रममाण असतात.
महाराष्ट्रातील एकुण १०८ संतांची चरित्रे वाचल्यानंतर कोणत्याही कट्टर व अंतर्मुखी दत्तभक्ताला महाराज कशाप्रकारे योगीजनांच्या जीवानात लीला घडवतात याचे प्रत्यक्ष उदाहरण प्राप्त होते. जेणेकरुन आपल्याही जीवनात सरासरी कशाप्रकारे सद्गुरु महाराज आपला योगक्षेम सांभाळुन आपल्याला आध्यात्मिक प्रगती करवुन देतील याचे आकलन होण्यास सुरवात होते. सामान्यतः सर्व संत चरित्रांमधे संबंधित दत्तभक्तांच्या संसारीक जीवनाचे यथार्थ वर्णन व त्या अनुशंघाने त्या़ंची यशस्वी आध्यात्मिक वाटचाल याचा सारांश आपल्या अंतःकरणात प्रतिबिंबित झाल्यास आपण कधीही संसारीक दुःखात भरकटुन न जाता सहजच दत्तभक्तीत स्थिर राहु शकता. याचे अवश्य अनुभव घेऊन पहा. तुम्हाला एक कठोर व तठस्थ भुमिका अनुभवास येईल.
भगवान श्री दत्तात्रेय स्वामीं महाराजांच्या चरणरजात निर्विकल्प, निर्गुण व विदेही अवस्थेत जीवन व्यतीत करणारे सिद्ध योगीपुरुष...! आपल्या जीवनाचे दत्त चरणरजाच्या परमपावन आत्मस्पर्शाने संसारीक आणि उपाधीयुक वासनाबीजे, षोडशतत्वे व चित्तनिरंजनाचे भस्म स्वरुप होणे म्हणजेच दत्त विभुती होणे. ही अवस्था फक्त गुरु शिष्य परंपरेतच अस्तित्वात असते. वंशवादात अथवा खानदानी देवधर्म करणारे व्यावसायिक ह्या अवस्थेतील दत्त महाराजांचे परमकारुण्यमयी कृपेची सोळाव्वी कलाही समजुन घेण्यास पात्र नसतात. त्याअर्थी आपण स्वतःच त्रिवेणी बंध अंतःकरणाने महाराजांचे आत्मस्मरण करावेत. संसारीक मनुष्य जर योग्य प्रकारे दत्त तत्व समजुन घेण्यास तत्पर होत असल्यास जीवन सफल झाले असे अवश्य समजा कारण आध्यात्मिक जीवनात सर्वात कठीण आणि गहानात्मक विचारसरणी म्हणजे दत्ततत्व...! अशा परम तत्वावर अनंत ब्रम्हाण्डीय चैतन्यशक्ती कार्यक्षम असते. हे एक अत्यंत सद्बुद्धीवादी व अंतर्मुखी योगकर्मवादी आचरण आहे जे कोणत्याही पुस्तकात स्थुलरुपात उपलब्ध नाही.
१. संसारीक लोक स्वतःच्या ईच्छ्येत स्वामीं ईच्छ्या मिसळतात. ही सर्वात मोठी घोडचुक आहे. हे आध्यात्मिक जीवनास बाधक असे दुषित मतलबी अपरीपक्व आचरण आहे.
तत्वाला अनुसरुन - स्वामींईच्छ्येतच आपली ईच्छ्या, आकांक्षा व नितिमत्ता समजावी. तरच योग्य दिशा उमगेल.
२. स्वामींना परिस्थिती समजवण्याचा प्रयत्न करणे ही एक दुसरी घोडचुक समजावी.
महाराजांना काहीही समजवण्याच्या भानगडीत न पडता, त्यांना जर सद्बुद्धीने समजुन घेण्यात यश आलं तर अंतरीतील मधुस्पर्श सहजच जाणवेल. कोणत्याही गोष्टींचा आतिरेक केल्यास महाराज दुर्लक्ष करतात.
३. चार भिंतीतील मठ, मंदीर, केंद्रे यांवर भौतिक व आध्यात्मिक प्रगतीसाठी अवलंबून राहाणे .
महाराज चराचरात आहेत. आज कलीच्या अंतिम पर्वात सुक्ष्म सत् युगाची सुरवात झाली आहे. अशा पावन वेळी महाराज स्वयंभु तत्वाचे पृथ्वीतलावर विराजमान आहे. त्या अर्थी कुठलीही भौतिक मध्यस्थी न जुमानता आपण स्वतः स्वकर्म आचरणाने स्वामींचे आवाहन केले पाहीजे.
एका ठराविक स्वामीं भुमिकेने जर आपण आपले सुंदर आयुष्य जगण्यस सुरवात केली तर भुत, भविष्य व वर्तमानस्थिती आत्मनियंत्रणात आल्याशिवाय राहाणार नाही. त्यायोगे सर्वप्रथम दुसऱ्यांच्या ओंजळीने पाणी पिणे टाळावे.
संतांच्या दुर्लभ माहिती
श्री
गुरुचरित्राच्या सप्ताहवाचनाच्या पद्धती व संक्षिप्त रसग्रहण

आपल्या ब्लाँगवर संतांची चरित्रे का प्रकाशित करण्यात येतात ?मला बरेच साधक संसारातील व आध्यात्मिक जीवनातील मधल्यामधे होणारी कोंडी बद्दल विचारत असतात. संसारीक मनुष्य आत्मप्रेरणेने दैवभक्तीमार्गात येतो आणि महाराजांच्या मागे धावुन आपले मनोगत व्यक्त करतो. ह्या प्रारंभिक अवस्थेत मानवाला ईच्छ्यापुर्ती व कष्टोधाराची तात्काळ फळे मिळतातच. परंतु द्वीतीय अवस्थेत जेव्हा याचककर्त्याच्या मागे स्वामीं स्वतः येतात तेव्हा जीवनाची दिशा बदलण्यास सुरवात होते. अशा परिस्थितीत भक्तगण भौतिक जीवनातील होणाऱ्या अनपेक्षित उठाठेवींनी हतबल होतात. त्यायोगे भक्तीमार्गात खंड पडून मोर्चा दुसऱ्या देवाकडे अथवा पंथाकडे वळतो किंवा परिस्थितीतील जीवनव्यथा ही ' महाराज आपली परीक्षा घेत आहेत ',' आपलं आत्मधैर्य निरखुन घेत आहेत ' याची मनाला घट्ट जाणीव होऊन पुढील स्वामींभक्तीत आनंदाने आत्ममार्ग क्रमण करतात.
महाराष्ट्रातील एकुण १०८ संतांची चरित्रे वाचल्यानंतर कोणत्याही कट्टर व अंतर्मुखी दत्तभक्ताला महाराज कशाप्रकारे योगीजनांच्या जीवानात लीला घडवतात याचे प्रत्यक्ष उदाहरण प्राप्त होते. जेणेकरुन आपल्याही जीवनात सरासरी कशाप्रकारे सद्गुरु महाराज आपला योगक्षेम सांभाळुन आपल्याला आध्यात्मिक प्रगती करवुन देतील याचे आकलन होण्यास सुरवात होते. सामान्यतः सर्व संत चरित्रांमधे संबंधित दत्तभक्तांच्या संसारीक जीवनाचे यथार्थ वर्णन व त्या अनुशंघाने त्या़ंची यशस्वी आध्यात्मिक वाटचाल याचा सारांश आपल्या अंतःकरणात प्रतिबिंबित झाल्यास आपण कधीही संसारीक दुःखात भरकटुन न जाता सहजच दत्तभक्तीत स्थिर राहु शकता. याचे अवश्य अनुभव घेऊन पहा. तुम्हाला एक कठोर व तठस्थ भुमिका अनुभवास येईल.
थोर दत्त विभुती म्हाणजे काय ?
भगवान श्री दत्तात्रेय स्वामीं महाराजांच्या चरणरजात निर्विकल्प, निर्गुण व विदेही अवस्थेत जीवन व्यतीत करणारे सिद्ध योगीपुरुष...! आपल्या जीवनाचे दत्त चरणरजाच्या परमपावन आत्मस्पर्शाने संसारीक आणि उपाधीयुक वासनाबीजे, षोडशतत्वे व चित्तनिरंजनाचे भस्म स्वरुप होणे म्हणजेच दत्त विभुती होणे. ही अवस्था फक्त गुरु शिष्य परंपरेतच अस्तित्वात असते. वंशवादात अथवा खानदानी देवधर्म करणारे व्यावसायिक ह्या अवस्थेतील दत्त महाराजांचे परमकारुण्यमयी कृपेची सोळाव्वी कलाही समजुन घेण्यास पात्र नसतात. त्याअर्थी आपण स्वतःच त्रिवेणी बंध अंतःकरणाने महाराजांचे आत्मस्मरण करावेत. संसारीक मनुष्य जर योग्य प्रकारे दत्त तत्व समजुन घेण्यास तत्पर होत असल्यास जीवन सफल झाले असे अवश्य समजा कारण आध्यात्मिक जीवनात सर्वात कठीण आणि गहानात्मक विचारसरणी म्हणजे दत्ततत्व...! अशा परम तत्वावर अनंत ब्रम्हाण्डीय चैतन्यशक्ती कार्यक्षम असते. हे एक अत्यंत सद्बुद्धीवादी व अंतर्मुखी योगकर्मवादी आचरण आहे जे कोणत्याही पुस्तकात स्थुलरुपात उपलब्ध नाही.
आध्यात्मिक जीवनातील मनुष्याकडुन घडणाऱ्या तीन प्रमुख घोडचुका...!
१. संसारीक लोक स्वतःच्या ईच्छ्येत स्वामीं ईच्छ्या मिसळतात. ही सर्वात मोठी घोडचुक आहे. हे आध्यात्मिक जीवनास बाधक असे दुषित मतलबी अपरीपक्व आचरण आहे.
तत्वाला अनुसरुन - स्वामींईच्छ्येतच आपली ईच्छ्या, आकांक्षा व नितिमत्ता समजावी. तरच योग्य दिशा उमगेल.
२. स्वामींना परिस्थिती समजवण्याचा प्रयत्न करणे ही एक दुसरी घोडचुक समजावी.
महाराजांना काहीही समजवण्याच्या भानगडीत न पडता, त्यांना जर सद्बुद्धीने समजुन घेण्यात यश आलं तर अंतरीतील मधुस्पर्श सहजच जाणवेल. कोणत्याही गोष्टींचा आतिरेक केल्यास महाराज दुर्लक्ष करतात.
३. चार भिंतीतील मठ, मंदीर, केंद्रे यांवर भौतिक व आध्यात्मिक प्रगतीसाठी अवलंबून राहाणे .
महाराज चराचरात आहेत. आज कलीच्या अंतिम पर्वात सुक्ष्म सत् युगाची सुरवात झाली आहे. अशा पावन वेळी महाराज स्वयंभु तत्वाचे पृथ्वीतलावर विराजमान आहे. त्या अर्थी कुठलीही भौतिक मध्यस्थी न जुमानता आपण स्वतः स्वकर्म आचरणाने स्वामींचे आवाहन केले पाहीजे.
एका ठराविक स्वामीं भुमिकेने जर आपण आपले सुंदर आयुष्य जगण्यस सुरवात केली तर भुत, भविष्य व वर्तमानस्थिती आत्मनियंत्रणात आल्याशिवाय राहाणार नाही. त्यायोगे सर्वप्रथम दुसऱ्यांच्या ओंजळीने पाणी पिणे टाळावे.
ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...
संतांच्या दुर्लभ माहिती
दत्ततत्व ( साध्य ) व हठयोग ( साधन ) म्हणजे दत्तप्रबोधिनी आचरण ( समाधि )
तत्वातुन स्वामींना आत्मसमर्पण् करा - Step by step