बिंदू त्राटक ( tratak bindu ) - सुक्ष्म परकीय विचारग्रहण शक्तीसाधना कृतीसहित - Step by step


बिंदू त्राटक साधनेचा प्रकार बहुतेकांना परिचयाचा आहे पण या त्राटक साधनेची फलश्रुती आम्हाला काहीच अनुभवास आली नाही, असे अनेक साधकांचे म्हणणे आहे. याचा अर्थ या साधनेत काही दोष आहेत असा अर्थ होत नाही. संबंधित कृती आणि योग्य प्रकार आजही अनेक साधकांना माहीत नाही. वास्तविक हीच एक अशी साधना आहे, जी सुरु केल्यापासुन एका आठवड्यात दिव्य अनुभव यावयास सुरूवात करते. जनहीताच्या अपुर्ण आणि अज्ञानी धारणेला अनुसरुन बिंदू त्राटक साधनेची योग्य समज व कृती ' दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट ' च्या माध्यमातून दत्त साधकांसाठी प्रकाशित करत आहे.

बिंदू म्हणजे काय ?

बिंदू एक ब्रम्हाण्डीय क्षेत्र आहे जे दोन माध्यमातून निसर्गात अनुभवास येते ते खालीलप्रमाणे...

  • १. अक्षरब्रम्ह
  • २. चित्त निरंजन
१. अक्षरब्रम्ह

आपण जे मंत्रोच्चारण करतो, स्तोत्र पाठ, पारायण करतो त्या वैखरी अक्षरवल्लीतील सुक्ष्मभाव म्हणजे अक्षरब्रम्ह. हे अक्षरब्रम्ह ' व्यंजन व स्वर ' स्वरुपात व्यक्त होत असते. व्यंजन म्हणजे शिव व स्वर म्हणजे शक्ती असे पुरुष प्रकृति अनुसरुन सर्व वेद, उपनिषद् , पुराण व ग्रंथांची उत्पत्ती झाली. हेच अक्षर ब्रम्ह सद्गुरु महाराजांकडुन नाम अनुग्रहाच्या स्वरुपात मुमूक्षत्व असणाऱ्या साधकांना दिले जाते.

उदा. बीज मंत्र ' गं ' या मंत्रामधे व्यंजन ' ग ' आहे तर स्वर ' ं ' ग वरील अनुस्वार आहे. म्हणजेच ग हा शब्द शिवतत्व तर अनुस्वार बिंदू शक्तीचे प्रतिक आहे. अशाप्रकारे सर्व बीज मंत्र , उद्घोषणांची निर्मिती ऋषीमुनींकडून केली गेली.


२. चित्त निरंजन

आपण मंगलमय कार्य अथवा आशीर्वादाचे प्रतिक म्हणून कपाळाला तिलक लावण्याची प्रथा आहे. हा तिलक म्हणजेच अक्षरब्रम्हांतला बिंदु समजावा. बिंदू शक्ती जी तिलक म्हणुन आपल्या आग्या चक्र स्थित असलेल्या शिवलिंगाशी सुक्ष्मस्तरावर एकरुप होते व परिणामी शरीरात चैतन्याचा संचार होते. असे बिंदूच्या सुक्ष्मतेवर काही निवडक सत्व व्यक्त करत आहे.

बिंदू त्राटक सविस्तर कृती

बिंदू त्राटक ही साधना तीन टप्प्यावर पुर्ण करावयाची असते.

टप्पा : १



बिंदू त्राटक साधनेचा प्रकार बहुतेकांना परिचयाचा आहे पण या त्राटक साधनेची फलश्रुती आम्हाला काहीच अनुभवास आली नाही, असे अनेक साधकांचे म्हणणे आहे. याचा अर्थ या साधनेत काही दोष आहेत असा अर्थ होत नाही. संबंधित कृती आणि योग्य प्रकार आजही अनेक साधकांना माहीत नाही. वास्तविक हीच एक अशी साधना आहे, जी सुरु केल्यापासुन एका आठवड्यात दिव्य अनुभव यावयास सुरूवात करते. जनहीताच्या अपुर्ण आणि अज्ञानी धारणेला अनुसरुन बिंदू त्राटक साधनेची योग्य समज व कृती ' दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट ' च्या माध्यमातून दत्त साधकांसाठी प्रकाशित करत आहे.

प्रथम साधकाने साधारणतः जाड ड्राँईंग पेपर घ्यावा. त्याचा आकार ११ इंच लांब व ११ इंच रुंद असावा. या कागदाच्या मध्यभागी चांदीच्या रुपयाच्या आकाराचे एक वर्तुळ कढावे. ते वर्तुळ काळ्या रंगाने किंवा शाईने पुर्ण रंगवावे. यानंतर हा कागद एका पुठ्यास चिटकवावा. अशी पुर्वतयारी करावी.

या साधनेसाठी वेळ पहाटेची किंवा सायंकाळची निवडावी. या साधनेसाठी नैसर्गिक मंद प्रकाशाची आवश्यकता आहे. आता वरील काळ्या वर्तुळाचे पृष्ठ आपल्या नजरेला समांतर भिंतीला लावुन त्यापासुन सरासरी तीन ते साडी तीन फुट अंतरावर बसा. गुडघे दुखीच्या पेशन्टने खुर्चीवर ताठ बसुन केले तरी चालेल. आपल्या ईष्ट देवतेला नमस्कार करुन त्या काळ्या वर्तुळाकडे एकाग्र दृष्टीने पाहत राहा. प्रथम दोन- तीन दिवस डोळ्यांना जडपणा येईल. डोळ्यांतुन पाणी वाहु लागेल. अशा वेळी क्षणभर डोळे मिटुन घ्या व एकाग्र दृष्टीने पुन्हा वर्तुळाकडे पहा. सात - आठ दिवसांच्या सरावानंतर डोळ्यातील पाणी वाहाणे कमी होईल.


साधना सुरु केल्यापासुन एका आठवड्यातच साधकाला एक अद्भुत अनुभव येतो. काळ्या वर्तुळाकडे पाहात असताना एक ते दोन मिनिटात त्या काळ्या वर्तुळातुन एक प्रकाशमय वर्तुळ बाहेर निघुन ते काळ्या वर्तुळाभोवती फिरायला सुरवात होते. सतत फिरत असताना ते प्रकाशमय वर्तुळ काळ्या वर्तुळाला झाकून टाकत आहे असा अनुभव येतो. या वेळेस तुम्ही आपली दृष्टी काळ्या वर्तुळावर स्थिर न करता प्रकाशमय वर्तुळावर स्थिर करा. काळ्या वर्तुळाचे कार्य आता संपले आहे. आपल्या मनाचे अवधान त्या प्रकाशमय वर्तुळाकडे असु द्या.


यानंतर तुम्हाला असा अनूभव येईल , की काळे वर्तुळ पुर्णतः नष्ट होऊन त्या काळ्या वर्तुळाची जागा प्रकाशमय सुर्यासारखी चमकत आहे. ही स्थिती प्राप्त झाली म्हाणजे बिंदू त्राटक साधनेच्या यशाचा पहीला टप्पा तुम्ही काबीज केला. ही स्थिती म्हणजे तुमच्या बर्हीमनाचा सर्व व्यवहार, विचार बंद होऊन लुप्त झाले आहे असं समजावं. परंतु ही स्थिती काही क्षण टिकेल परत ते काळे वर्तुळ डोळ्यांना दिसु लागेल. हळु हळु प्रयत्नांनी मन परत एकाग्र करुन त्या अवस्थेत जाण्याचा प्रयत्न करा.


साधनेचे वैशिष्ट्य

बिंदू त्राटक साधना अतिशय उत्साहाने व चिकाटीने साध्य करावी. वरील दिव्य अनुभव ईतर त्राटक साधनांच्या तुलनेत बिंदू त्राटक साधनेस अतिशीघ्र प्रत्ययाला येतात. ज्या वेळेस काळे वर्तुळ आपल्या डोळ्यांसमोरुन पुर्ण नाहीसे होते व ती जागा अतिशय तेजस्वी प्रकाशाने दैदिप्यमान होताना दिसते, त्याच वेळी तो प्रकाश साधनेच्यावेळी आजुबाजुला देखील पसरतो. खोलीत अथवा देवघरात असलेल्या ज्या ज्या वस्तु त्या प्रकाशाच्या कक्षेत येतात व सर्व वस्तु देखील चकाकताना दिसतात. त्यावेळी साधक एका दिव्य आनंदाने भारला जातो. एका प्रकारचे सात्विक गोड तरंग साधकाच्या अंगावर उभे राहातात. या स्थितीचे व अवस्थेचे यथार्थ वर्णन करणे शक्य नाही.

बिंदू त्राटक साधनेत वरील दिव्य अनुभुती मुळे मुंगळा गुळाला चिटकुन बसण्यासारखे तसेच साधक दिव्य झोतात देहभान विसरतो.


महत्त्वाची सुचना...

  • १. बिंदू त्राटक साधनेचा पुढील टप्पा जाणुन घेण्यासाठी ईच्छुक साधकांनी प्रथम साधना वरील प्रमाणे करावी. मार्गदर्शन हेतु आपली प्रगती कळवावी.
  • २. जास्तीतजास्त १५ मिनिटे ह्या साधनेसाठी स्थानबद्ध व्हावेत.
  • ३. शुद्ध शाकाहारी व नामस्मरणाची गोडी असल्यास प्रार्थमिक अनुभूती द्विगुणीत होते.



महत्त्वाची टिप...

संबंधिक साधनाक्रीया संबंधित साधना तज्ञांच्याच मार्गदर्शनाखाली कराव्यात.