त्राटकाद्वारे रोगोपचार : मधुमेह विकारावर उपाय - २


मधुमेह विकार बाधीत व्यक्तींचा असा समज असतो की, ' आपला हा विकार कधीच बरा होणार नाही. तो आपला बळी घेणारच. ' हा घातक विचार स्वयंसुचनेच्या मार्गात आड येतो. त्याअर्थी घातक विचार मानसिक स्वरुपात देहत ठाण मांडुन बसल्याने त्याचे परिणाम शरीरावर होतात. व्याधीग्रस्तांनी स्वतःच्या मनात स्वादुपिंडावर ( Pancreas gland ) होकारार्थीं स्वयंत्राटक करावेत.

मधुमेह विकार बाधीत व्यक्तींचा असा समज असतो की, ' आपला हा विकार कधीच बरा होणार नाही. तो आपला बळी घेणारच. ' हा घातक विचार स्वयंसुचनेच्या मार्गात आड येतो. त्याअर्थी घातक विचार मानसिक स्वरुपात देहत ठाण मांडुन बसल्याने त्याचे परिणाम शरीरावर होतात. व्याधीग्रस्तांनी स्वतःच्या मनात स्वादुपिंडावर ( Pancreas gland ) होकारार्थीं स्वयंत्राटक करावेत.

आपल्या शरीरातील कोणतेही रोग, विकार अथवा व्याधींची अतिक्रमणता करण्याची पद्धती सुक्ष्म स्तरावरुन सुरुवात होऊन कालांतराने स्थुल देहावर प्रकट होऊ लागते. त्यायोगे आपले सुक्ष्म शरीर मानसिक, शारीरीक व आध्यात्मिक त्रिविध तापांपासुन सुरक्षित ठेवण्याहेतु मनःशक्तीची ओळख करवुन घ्यावीच लागते. त्यायोगे सोबत काही निवडक पथ्यपाणी जपल्यास जीवनात कधीही अत्याधिक प्रमाणात कोणते रोगविकार होणार नाहीत. जेणेकरुन संपुर्ण घराला त्रास होईल असे परिणाम यथाशक्ति टाळता येतील. स्वशरीर निरोगी राहण्याहेतुने आणि संबंधित देहाच्या त्रासावर आध्यात्मिक स्तरावर उपाय सर्व दत्त भक्तांसाठी प्रकाशित करत आहोत.

संबंधित रोग-विकारांचा मनःशक्तीशी संबंध

प्रकृती-पुरुषात्मक तत्वावर आधारीत असलेले स्थुल आणि सुक्ष्म शरीर मनाच्या चैतन्यशक्तीने परिचालीत होते. आपले शरीर असंख्य पेशींनी मिळुन बनलेले एक स्थुल साधन आहे. प्रत्येक पेशीला प्रकृती पुरुषात्मक मन असते. या सर्व पेशीतील मन एकत्र येऊन 'महामन' तयार झाले. पायाच्या बोटाच्या अग्राला टाचणीने टोचले असता तात्काळ मस्तकापर्यंत तिच्या संवेदना जातात. याचे एकमेव कारण मानवाचे व्यापक असलेले अंतर्मन आहे. याचाच दुसरा अर्थ असा की, शक्ती ही कणाकणाने एकत्र संग्रहीत होते आणि ती मनःशक्ती संग्रहीत होऊन आत्मबळ वाढवते. आजारी माणसाचे मनोधैर्य खचल्यामुळेच आजार बळकावतो. याकरीता प्रत्येक व्यक्तीने आपले मनोबल, सद्विचार आणि सत्संगाद्वारे स्वतःचं आत्मबळ वाढविण्यासाठी प्रयत्न केला पाहीजे जेणेकरुन शरीर स्वास्थ्य अबाधीत राहील.


आपल्या शरीराचे स्वास्थ्य पाच प्रमुख अवयव पोट, फुफ्फुसे, ह्दय, ग्रंथीयुक्त समुह आणि मेंदू यांच्या सुव्यवस्थित कार्य चालु राहाण्यावर अवलंबुन असते. मधुमेह विकारात वरील अवयवांपैकी ग्रंथीयुक्त अवयव स्वादु पिंडाची कार्यक्षमता थांबल्यास पीडा, दुःख व रोगांना निमंत्रण मिळते. बरेच साधक मला देह यातनेबद्दल विचारुन आध्यात्मिक साधनेत उत्पन्न होणाऱ्या विघ्नांवर कसे मात करता येईल याबद्दल विचारत असतात. आपलं स्थुल शरीर नियंत्रणात असल्यावरच यथाशक्ति ज्ञानर्जन करता येते. त्यायोगे त्राटक साधनेतुन दिर्घ श्वासाच्या व्यायामात सर्व अवयवांच्या गति विधींना प्रभावित निमंत्रण दिले जाते. दिर्घ श्वसनाने पोटातील जठरपेशीं प्रदेश सुरळीत राहुन त्याची कार्यशक्ती वाढते. संबंधित कार्यक्षमतेत स्वादुपिंडाचे कार्य पुर्ववत सुरळीत होण्यास मदत होते.

आध्यात्मिक तत्वाच्या आधारे मधुमेहासंबंधित ह्दयापासुन ते नाभीपर्यंतचा भाग ईशान रुद्र भगवान शिव देवतेच्या स्वामित्वाखाली येतो. त्यायोगे त्राटक साधना प्रथमतः बेल पत्र त्राटक, शिवलिंग त्राटक आणि स्वयं त्राटक अशा तीन स्तरावर टप्प्याटप्याने करावयाची असते. स्वयं त्राटक साधनेत स्वतःच्या अंतर्मनाचा योग्थ अभ्यास होणे हेतु ईतर दोन त्राटक साधनेत सहभागी व्हावेच लागते. त्राटक साधनेत प्रारंभिक अवस्थेत काही दिवस डोळ्यांसंबंधित पाणी वाहाण्याचे प्रकार होत असतात परंतु सरासरी एका आठवड्यानंतर पाणी येणे आपोआप थांबते. मधुमेहा सारख्या विकारांमुळे मोतीबिंदु, जीभ जड होणे, जखम न भरणे, लखवा बसणे अशा पीडेपासुन बचाव करावयाचा असेल तर स्वयं त्राटक साधना केल्यास चांगलेच परीणाम अनुभवास येतील.


स्वयं त्राटक साधनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे स्वतःवर स्वतःचे नियंत्रण प्रस्थापित होणे. मधुमेह बाधीत लोकांना स्वतःच्या जीभेवर नियंत्रण ठेवाण्याची ईच्छ्या असल्यास संंबंधित त्राटक साधना खालीलप्रमाणे करावी.


त्राटकाद्वारे मधुमेहावर स्वनियंत्रण होणे हेतु खालीलप्रमाणे उपाय करावेत.


  • १. स्वयं त्राटक साधनेतुन स्व आहारावर नियंत्रण येणे हेतु. संबंधित ईतर दोन साधनांची तयारी म्हणुन सर्व त्राटक व भगवान शिव संबंधीत ब्लाँग वाचावेत.
  • २. अंतर्मनाच्या प्रबळीकरणातुन जीभेवर नियंत्रण येईल असे सर्वांगीण प्रयत्न करावेत.
  • ३. योगसाधनेत यथाशक्ति कपालभाती सकाळी उपाशीपोटी करणे.
  • ४. शुचिर्भुत होऊन श्री शिव गायत्री मंत्राचा रोग १०८ जप करणे.
  • ५. गाणगापुरचे भस्म, देवापुढे लावलेल्या अगरबत्तीची राख किंवा तुळस, बेल पत्र यांची वाळलेली पाने जाळुन केलेले भस्म मंत्रुन मुखाजवळ धरुन ११ वेळा गायत्रीमंत्र म्हणुन कपाळाला लावल्याने, तीर्थ करुन प्राशन केल्याने व तुळशीच्या रसातुन भस्माचा उपयोग केल्याने मधुमेह विकर नियंत्रणात येतो.

मधूमेह विकारासंंबंधीत त्राटक साधनेबद्दल आवश्यक सुचना

  • १. ' माझा मधुमेह बरा होईल ' अशी प्रत्यक्ष सुचना देऊ नका.
  • २. शुद्ध शाकाहारी राहाणे.
  • ३. योग अभ्यास सावधानतापुर्वक योग्य मार्गदर्शकाच्या सहाय्याने करणे.
  • ४. नित्य ईतर दैनंदीन वर्तमान उपचार संबंधित वैद्यकीय सल्याप्रमाणे पालन करणे.
  • ५. स्वादु पिंडावर होकारार्थी लक्ष केंद्रित करणें.



महत्त्वाची टिप...

संबंधिक साधनाक्रीया संबंधित साधना तज्ञांच्याच मार्गदर्शनाखाली कराव्यात.