आपल्या देहातील अतिसंवेदनशील व नाजुक अंग म्हणजे आपले नेत्र व त्यातुन नैसर्गिकतेने उत्पन्न होणारी आपली स्थुल दृष्टी. आपण अशी मानवजाती आहोत ज्यांना आध्यात्मिक गंध नाही याउलट ह्या मानवी आध्यात्मिक देहाला संसाराचे दुट्टपी जीवनच डोक्यावर घेऊन फिरण्याचे हस्यास्पद कुतुहल असते. ह्या मानवी आध्यात्मिक देहाला फक्त त्याच्या मुळ आध्यात्मिक अस्तित्वाच्या दृष्टिकोनातून नेत्रदोष व स्मरणशक्ती संबंधी बहूपयोगी पण निवडक माहीती जनहितासाठी प्रकाशित करत आहोत.
त्राटक विद्या देहातीत असणारी प्राणशक्ती व सुर्यापासुन मिळणारी महाप्राणशक्ती यांमधे स्थुलदेह नियंत्रण कक्षेच्या माध्यमातुन आरोग्य, दीर्घायुष्य, बळ, वीर्य, तेज, उत्साह आणि स्फुर्तीच्या रुपात उर्जा प्रवाहित करते. सुर्यातुन मिळणारा प्रकाश व उष्णता ही स्थुलशक्ती प्रकट रुप आहे परंतु त्यात एक अदृश्य, सुक्ष्म सत्तात्मक व अव्यक्त शक्ती असते व ती एखाद्या झर्याप्रमाणे निरंतर प्रकाशकिरणांमधून वहात असते तिलाच महाप्राणशक्ती असे म्हणतात. हीच महाप्राणशक्ती जेव्हा प्रकाश व रुद्र वायुंमार्फत स्थुलदेहात प्रवेश करते तेव्हा नवचैतन्य प्राप्त होते. देहातील रोग, दोष, ताप व व्याधी नाश करुन मानवी जीवन आनंदी व देहभानाने समाधानी ठेवते.
ज्याप्रमाणे स्थुलदेहावर महाप्राणशक्तीचा सुयोग्य परिणामकारक प्रभाव होतो त्याचप्रमाणे मानसिक स्वास्थ्यावरही अपेक्षित प्रभाव अनुभवास येतो. जेव्हा त्राटक साधनेद्वारा ही प्राणशक्ती प्रकाश ( तेज ) व ध्वनी ( मंत्र ) माध्यमातुन मनात प्रवेश करते तेव्हा आनंद, सद्भावना, एकाग्रता, स्थिरता, धैर्य व मनःशांतीच्या रुपात आपल्या आत्मतत्वात विद्यमान होते. जेव्हा हीच प्राणशक्ती आपल्या बुद्धीक्षेत्रात प्रवेश करते तेव्हा श्रद्धा, विश्वास, संयम, समजुतदारपणा, आत्मीयता, निरीक्षण, प्रेम, करुणा, दया आदी भावनांनी संधान करते. ही ionospheric plasma power अथवा शक्ती जगताचा प्राणच आहे. चुंबकत्व, प्रकाश, उष्मा, विद्युत ही महाप्राणशक्तीची स्वरुपे आहेत.
प्राणशक्ती हा भावनातीत विचार आहे. तो स्थुलशब्दात किंवा चित्ररुपात प्रकट करता येत नाही. तो स्थुल प्रकाशात्मक असुन अतिसुक्ष्म पण तीव्र विचारात्मक आहे. ही शक्ती ईतकी कंपनशील विचारशक्ती आहे की तिला आपल्या स्थुल ईंद्रीयांच्या जाळ्यात पकडता येत नाही. अतिजलद व प्रखर प्रभावकारक ही शक्ती ब्रम्हाण्डीत मनाचे अद्वैत स्वरुप आहे. ईंद्रीयातीत असुनही ही शक्ती फक्त सद् भावनेच्याच माध्यमातून ग्रहण करता येते. ह्या शक्तिंचा तीव्रतेवर या प्राणशक्तींचे परमब्रम्ह सद्गुरु स्वामी अनुसुयानंदन दत्तात्रेय स्वामीं महाराजांचे परमपुजनीय पिताश्री महर्षि अत्री ऋषींनी या प्राणशक्तींचे तीन भागात विभागणी केली ती खालीलप्रमाणे आहे.
- १. मंद प्राणशक्ती
- २. मध्यम प्राणशक्ती
- ३. गहन प्राणशक्ती
१. मंद प्राणशक्ती
मंद प्राणशक्ती असलेले मानवप्राणी हे मानसिक, आत्मिक व बौद्धिक दृष्ट्या दुबळे असतात. अशा व्यक्ती भ्याड, कर्तुत्वहीन, योग्य विचार करण्याची कुवत नसलेले, स्वमत नसलेले, लाचारी पत्करलेले, बोलतान अस्पष्ट व तुटक बोलणारे व तेजोहीन असतात. स्मरणशक्ती संबंधित तक्रारींचे प्रमाण या स्तरावरील लोकांना जास्त प्रमाणात असते. त्यायोगे त्राटक साधानेतुन आपण योग्यप्रमाणात प्राणशक्तीचा स्तर योग्य वेळी प्रसंगावधान राहुन वाढवण्याचा प्रयत्न केल्यास, काही महीन्यांतच मानवी स्वभावात अनपेक्षित बदल घडुन येतात व अशी मानवी जीवने समाजाच्या मुळ प्रवाहात आत्मसन्मानासह सहज सहभागी होऊन ईतरांचेही दुःख महाराजांच्या चरणकृपेने अवश्य दुर करु शकतात.
२. मध्यम प्राणशक्ती
मध्यम प्राणशक्ती असलेल्या व्यक्ती योग्य विचार करणाऱ्या, योग्य निर्णय घेऊ शकणाऱ्या, आत्मविश्वास व बौद्धिक क्षमता असलेल्या व कर्तुत्ववान अशा असल्याने त्या व्यवहार, शिक्षण, व्यवसाय यांत योग्य ती सफलता मिळवु शकतात. मात्र ते महत्वाकांक्षी असुनही आपल्या ईच्छ्यांवर योग्य ते नियंत्रण ठेवण्याची कुवत त्यांच्या जवळ नसते. ते मोह, संभ्रम, विभ्रम, अस्थिरता व अर्तद्वंद्वाचे बळी पडतात. सर्व सामान्य मानसिकता असलेले लोकं मध्यम प्राणशक्ती धारक असतात. त्यायोगे त्राटक साधनेतील विशिष्ट साधनेच्या जोरावर असे लोक जीवनातीन सुक्ष्मरहस्य जाणुन घेउन स्वतःचं जीवन आत्मनियंत्रित करु शकतात. ही योगी जीवनाची प्रारंभिक सुरवात समजावी.
३. गहन प्राणशक्ती
गहन प्राणशक्ती असलेल्या व्यक्ती सर्वार्थाने महान, योगीक अवस्थेप्रत गेलेल्या व विश्ववंद्य असातात. अष्टांग योगातील सर्व अंगे, सृष्टीतील सुक्ष्मवाद, देहातीत दृष्टी, मानवी जीवनाच्या पलिकडील अभिव्यक्ती, आध्यात्मिक जीवनातील सुयोग्य वाटचाल, परमात्म्याच्या अपेक्षेने आवश्यक असलेले आचरण व संरुपण अशा अनेक तत्व सत्वांचा अंगीकार झालेले योगीजनें गहन प्राणशक्तींच्या स्तरावर कार्यरत असतात.
समाजात दृष्टिदोषाचे प्रमाण बरेच वाढत चालले आहे. अगदी लहान मुलांपासुन ते वयस्कर लोकांपर्यंत सर्वच या दोषाने पछाडलेले आहेत. दैनंदिन स्वरुपात ८ -१० तास सतत फोन, कंप्युटर व टिव्हींसारख्या वस्तुंमुळे नेत्रविकार होणे स्वाभाविकच आहे. ह्या संबंधित दृष्टीदोषांना कशाप्रकारे स्वनियंत्रणात ठेवता येईल जेणेंंकरुन वैद्यकीय उपचार सहजच टाळता येईल यासाठी त्राटक साधनेचा नियमित फक्त १ ते ३ मिनिटांचा सराव करावा.
- १. अंतर सुर्य त्राटक Surya Tratak
- २. सोम त्राटक Moon Tratak
- ३. स्वस्तिक त्राटक Swastik Tratak
- ४. ह्दय त्राटक Atma Tratak
- ५. प्रतिबिंब त्राटक Reflection Tratak
- ६. चित्तबिंदु त्राटक Bindu / Dot Tratak
- ७. प्रतिमा त्राटक Image Tratak
- ८. ॐकार त्राटक Omkar Tratak
- ९. नासिकाग्र त्राटक Nosetip Tratak
- १०. त्राटकाद्वारे कुंडलीनी जागृती
महत्त्वाची टिप...
संबंधिक साधनाक्रीया संबंधित साधना तज्ञांच्याच मार्गदर्शनाखाली कराव्यात.
ह्या
पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...
All Life Useful Links in One Place DATTAPRABODHINEE NYAS
दत्ततत्व ( साध्य ) व हठयोग ( साधन ) म्हणजे दत्तप्रबोधिनी आचरण ( समाधि )
श्री काळभैरव माहात्म्य - Real unknown secrets explained