जपमाळेचे ( Chant String ) सुक्ष्मज्ञान - माळेचे आध्यात्मिक प्रकार- Simple and Easy


आध्यात्मिक आत्मसंवेदना श्रद्धेने व बुद्धीने जाणुन घेण्यासाठी आवश्यक असलेले सर्वात जलद परिणामकारक साधन म्हणजे आपली मंत्र जपमाळ....! जपमाळी बद्दल बर्याच साधकांमधे आजही पुरेसं ज्ञान नाही. जपमाळीची शक्ती ओळखण्याचे सामर्थ्य नाही आणि जपमाळीचे प्रकारही अजुन लोकांपर्यंत पोहोचलेले नाही. माझ्या नित्य आध्यात्मिक साधनेसाठी वापरात येणाऱ्या काही निवडक साधनांचा उल्लेख करुन देत आहे. जेणेकरुन कोणीही साधक ज्याक्षणी जपमाळेचा नामस्मरणासाठी उपयोग करत असल्यास, त्यामार्फत यथाशक्ति आत्मप्रचिती येऊ शकेल.


माळ म्हणजे काय ?
माळ हा शब्द वेदांतातील एक सगुण अध्यायापैकी आहे. यात माळ म्हणजे म + आळ अर्थात म म्हणजे महालिंग व आळ म्हणजे आवळणे. त्यायोगे महालिंग आवळणे म्हणजे माळ फिरवणे असा आहे. संकल्पयुक्त पुरश्चरण विधी अथवा निःस्वार्थ नामस्मरण जप साधनेत माळेचे सुक्ष्मज्ञान अवगत असल्यास आपल्या कार्यसिद्धी अथवा आध्यात्मिक प्रगतीची पुर्तता यथाशीघ्र होऊ शकते. मनोयोगे सुक्ष्मज्ञानाची अभिलाषा ठेऊन केलेल्या सर्व आध्यात्मिक सत्कर्मात आपल्या आत्म्याचा विनाअट सहभाग होत असतो. आत्मसहभागी साधकच आपला आवाज भगवंतापर्यत पोहोचवु शकतो. ईतर येडे गबाळे तिथल्यातिथेच फिरत बसतात आणि दुःख दारिद्रय भोगत असतात.
माळजप विधान व माळेचे स्थुल प्रकार
माळजप करता असताना आपल्या करंगळी व तर्जनीच्या मधील अनामिका व मध्यमा बोटांमधे माळ धरावी व अंगठ्याने ओढावी. १०८ जपपुर्ण झाल्यावर सुमेरु मणीपासुन ती माळ परत उलटी फिरवावी. सुमेरुमणीचे उल्लंघन होऊ देऊ नये. जपमाळ जमीनीला स्पर्श होउ न देणे व ईतर लोकांनाही हात लावु न देणे ध्यानात ठेवणे. आपली आत्मवृत्ती प्रबळ होणे हेतु माळेचा सामुहीक आध्यात्मिक ऊबंटु साधनेत उपयोग करा. ज्याक्षणी २००० साधक एकाच वेळी ॐ काळभैरवाय नमः व श्री स्वामी समर्थ जप करतात. त्यावेळी प्रत्येकाला हजारोंमाळ फक्त काहीं मिनिटात जप केल्याने पुण्यप्राप्त होते.

माळेतील १०८ मणी आत्मसुचक आहेत. माणसाने श्वासे श्वासे दत्त दत्त l जय दत्त श्री दत्त  ll नाम घेतले पाहीजे. माणुस एका दिवसात साधारणतः २१,६०० श्वास घेत असतो. त्यातील रात्रीचे अर्धे बाद करता बाकी १०,८०० वेळा नाम घेऊ शकतो. ह्दयपुर्वक घेतलेले एक नाम हे शंभर नामासारखे आहे, हे शास्त्रवचन आहे. त्याअर्थी माणुस खर्या आंतःकरणाने एक माळ जपत असेल तर त्याने १०,८०० जप त्या दिवशी केले असे मानले जाते. १०८ हा इकडा ऋग्वेदाच्या सुक्ताचाही द्योतक आहे. त्यात २७ नक्षत्रे व ४ अंतरीक देह मिळवुन २७ x ४ म्हणजे १०८ ठिकाणी मंत्र पोहोचवीन असा आत्मनिर्देश सुचीत होतो.


माळेचे स्थुल प्रकार
१. रुद्राक्ष माळ.

जप कर्त्याने रुद्राक्ष माळ खरी आहे की खोटी ह्याची फुकट चौकशी करु नये कारण जो खरा आहे त्याला दिलेली खोटी माळही खरी होते. जो खोटा आहे त्याला दिलेली खरी माळही खोटी होते. रुद्राक्ष माळ आकाराने सर्वात लहान मण्याचीच निवडावी.

२. तुळशी माळ


तुळशी माळ भगवंताला समर्पित देहाचे सर्वोच्च प्रतिक आहे. कृपया ह्या माळेचा वापर करत असताना आचरण शुद्ध ठेवणे. मन, काया व वाचा स्थिर करुनच माळेला स्पर्श करणे.


३. अस्फाटीक माळ


विद्याधनासाठी ही माळ जपावी. ही माळ सरस्वती मातेला समर्पित आहे. त्यायोगे ही माळ घालुन खोटं बोलु नये. सात्त्विक आचरण करावं


४. रक्तचंदन माळ


योगसाधनेसाठी ही माळ जपावी. ही माळ कालिकामातेला समर्पित आहे. त्यायोगे देहिक भोग ह्या माळेच्या सान्निध्यात भोगु नयेत.


जपमाळेचे सुक्ष्म व ब्रम्हाण्डीय ज्ञान
डामर तंत्रापासुन ते शाबरी मंत्रापर्यंत जपमाळेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्याप्रकारे स्थुलदेहाला अनुसरुन स्थुल जपमाळेचे प्रावधान वरील माहीतीप्रमाणे सांगितले आहे. त्याचप्रमाणे सुक्ष्मजपमाळही आध्यात्मिक साधनेत परमलाभदायी ठरते. किंतु याचा प्रचार कोठेही केला गेला नाही. त्याबद्दल काही ठराविक माहीती आपल्या ज्ञानात भर घालेल म्हणुन देत आहे. सामान्यतः कोणत्याही जप स्तोत्राचे शिवशक्ती स्वरुपात व्यंजन व स्वर असे दोन भाग पडतात. ह्याअर्थी व्यंजन म्हणजे शिवस्वरुप व स्वर म्हणजे शक्तीरुप अशा पद्धतीने सामायिकीकरण आत्मानूभुतीत व्यापक केले जाते. त्यायोगे प्रकृतीपुरुपाचे शब्दब्रम्हवाचक रुप आपल्या अंतःकरणात तयार होते आणि आपण आत्मसंस्काराच्या अधिकाधिक निकट जाऊ शकतो.

सुक्ष्म जपमाळ दोन प्रकारे असते त्याची माहीती खालीलप्रमाणे आहे.
  • १. हस्त पादुकामाळ
  • २. मातृका मुंडमाळ

१. हस्त पादुकामाळ


आपल्या देहातील नारायणातील ' आ ' शक्तीचे योगसंयोग करवुन देणे हेतु शरीरातील प्राण, अपान, ऊदान, समान व व्यान रुद्रवायुंच्या ऐकत्रीकरणासाठी हस्त पादुकामाळ फिरवली जाते. ही माळ फक्त सद्गुरु नामधारकच उपयोगात आणु शकतात. चारीत्र्यहीन माणसाने उपहासात्मक हस्तमाळ जप केल्यास मेंदुतील नाड्यांंमधुन अनायासे रक्तस्त्राव सुद्धा होऊ शकतो. ही अत्यंत गंभीर व आक्रमक सुक्ष्म जपमाळ आहे.


२. मातृका मुंडमाळ


आपल्या देहातील शिवशक्तीचे अनुस्वार युक्त बीजांचे प्रस्फुटीकरण करण्याहेतु सद्गुरु अनुग्रहाद्वारे योगशक्ती प्रकट होणे हेतु ही माळ १०८ जप माळेतुन उपयोगात आणली जाते. ही माळ ब्रम्हाण्डाला भेदुन टाकणारी योगमाळ आहे जी स्वतः भगवान सदाशिव जपत असतात.


ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

पितृदोषांवर दुर्लभ माहीती व रहस्य उजागर...!

नवनाथ ग्रंथ पारायण कसे करावे ? ब्रम्हाण्डीय सामर्थ्य विश्लेषण...!


आत्मरत्न म्हणजे काय ? माणुस का भरकटतो ?


बाधिक वास्तुसाठी काय उपाययोजना कराल ? नवीन वास्तु विकत घेण्यापुर्वी काय खबरदारी घ्याल ?


त्राटक विद्या म्हणजे काय ? त्राटक विद्या व साधना महत्व...!
0