नाथपंथातील प्रसिद्ध ध्यानयोग नवनाथ साधना - २ ( Nathpanthi Meditation - 2 )- Simple and Easy


वैराग्य आणि निर्गुण भक्तीला अनन्यसाधारण महत्व आहे. त्याअर्थी "अलख निरंजन" या ब्रम्ह बोधशब्दाचा मतितार्थ " कधीही न लखलखणारे असे तेजोमय सुर्य लिंग जीवब्रम्हात प्रकट होणे" असा आहे. सद्गुरु गोरक्षनाथांनी नाथपंथाच्या विस्तारासाठी ८४००० नाथ अनुयायी तयार केले. साधक - संन्यासी - अविनाशी यातील फरक समजवून शिक्षा पाचारण करवुन दिले.

नाथपंथीय शिक्षाकक्षेत "खरा संन्यासी" कोण आहे याचा अर्थ स्पष्ट केला. "बर्हीमुखी संन्यासी खरा की अंतर्मुखी संन्यासी साचा" याचा अर्थ समजावुन दिला. त्याअर्थी सर्व शाबरी मंत्रांत आपण "शब्द साचा पिंड साचा, चले मंत्र ईश्वरी बाचा" असे मंत्रोक्त उच्चार उद्घोषित करतो.


अष्टांग योगात अनुक्रमे यम, नियम, संयम, आहार, प्राणायाम, ध्यान, धारणा, समाधी ही अंगे सविस्तर रुपाने नाथ अनुयायींना प्रकाशित करुन दिली. वरील अष्टांग योगापैकी ध्यान, धारणा व समाधी ही योगअंगे प्रार्थमिक स्वरुपातील नाथपंथीय अग्रेसर योगींची प्रारंभ साधना समजावी.



नाथपंथीय ध्यानयोगसाधना संसारीक लोकांनाही करण्याजोगे सोप्पे होईल अशी साधना आज सांगतो. कृपया मात्र साधना फळप्राप्तीहेतु शुद्ध शाकाहारी राहाणे व सोयरे सुतक पाळणे बंधनकारक आहे.

महत्त्वाची टिप -


गुरुमुखातुन ज्ञात झालेल्या तीन ध्यानयोगांपैकी द्वितीय क्रियेचा प्रपंच करीत आहे तरी कृपया वाचकांनी व साधकांनी फक्त आत्मोद्धाराहेतुच क्रियेचा अवलंब करावा. काही प्रश्न असल्यास प्रत्यक्ष संपर्क करा.


ध्यानक्रीया विधी व धारणा -

सकाळी लवकर उठावे. स्नान वगैरे आटपुन घेणे. सवयीला अनुसरुन ईच्छा असल्यास चहा काँफी घेतली तरी चालेल. नंतर आपल्य अंथरुणावर सहज भिंतीला टेकुन बसा व शरीर मोकळे सोडा. आपण नदीच्या काठी बसलो आहोत अशी प्रबळ कल्पना करा. नंतर आपल्या शरीरातील पंचमहाभूते ( पृथ्वी, आप(जल), अग्नी, वायू व आकाश ) यांचे वेगवेगळे ढिग करुन नदिच्या काठावर ठेवले आहेत, असे ध्यान करा. पंचमहाभूताच्या पंचीकरणाने देह निर्माण झाला होता. आता तो देह नसून फक्त ५ महाभूते दिसत आहेत, या कल्पनेला प्रबळ महत्त्व द्या.

जेव्हा ही पंचमहाभुते विशिष्ट प्रमाणात मिसळली जातात तेव्हाच, हे जग व त्यास पाहाणारा देह निर्माण होते. आता जगताऐवाजी तुम्हास फक्त  या पंचभुताचे ज्ञान होईल. जगकल्पना आता पूर्ण मावळुन गेली आहे. जगताचे कारण तीच पंचमहाभुते भासमान होत आहे.


आता उपनिषद् सिद्धांताप्रमाणे, पृथ्वी ही जलापासून निर्माण झाली आहे, म्हणून पृथ्वीतत्वाचा जलतत्वात लय करा. जलतत्वाचा अग्नीतत्वात लय करा. अग्नीचा वायुतत्वात व वायुतत्वाचा आकाशतत्वात लय करा म्हणजे तुमचे चैतन्य आता फक्त आकाशच पाहात आहे. पाहाण्याची वस्तू व पाहाणारा हा एकच तत्वाचा असला पाहीजे. या सिद्धांताप्रमाणे तुम्ही आता फक्त आकाशतत्वच आहात. आता या आकाशतत्वाचाही लोप करण्याचा प्रयत्न करा. हे करणे फार अवघड आहे.


या ठिकाणी सद्गुरु वरदहस्ताची गरज आहे. बरेच साधक आकाशतत्वापर्यंत झेप घेतात पण पुढील गती सद्गुरुकृपे अभावी प्राप्त होत नाही. आकाशतत्वाचा लय प्रकृतीच्या सत्व, रज व तम या साम्यावस्थेत होतो. या साधनेत आकाशतत्वापर्यंत कसे जावे याचा उल्लेख करुन दिला आहे. यापुढील भुमिकेसाठी संबंधित साधकाने सद्गुरु महाराजांना शरण जायला हवे.


आकाशतत्वाचा लोप होण्याची क्रिया मानवी बौद्धिक पातळीच्या बरीच पलिकडे स्थित असलेली विदेही भुमिकेत आहे. आध्यात्मिक जीवनात आकाशतत्वाला आपल्या ह्दयस्थित आत्म्याचे निवासस्थान असे म्हणतात. आकाशतत्वाचा लोप करणे हेतु आपल्या आत्मबुद्धीला स्वदेहावर नियंत्रण मिळवुन देणे प्रार्थमिक दृष्टीने महत्त्वाचे...!


एकदा आत्मबुद्धी जागृत झाली की आत्मगुहेतील भगवत्मय अंतःकरण देहाला विदेही अवस्थेच्या प्रकाशझोतात हळुहळू परीचालीत करते. आकाशतत्वाचा लोप पावणे हेतु सद्गुरुनिष्ठीत भगवत्मय अंतःकरण जागृत होणे अतिमहत्वाचे...! त्याशिवाय देहाचा मनावरील ताबा सुटणे कठीण आहे.


या ध्यानस्थितीतुन बाहेर येताना प्रथम आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करणे. नंतर भृकुटीमध्यावर सद्गुरु महाराजांचे कृतज्ञतापुर्वक दर्शन घेणे. दोन्ही तळ हात ऐकमेकांना घासुन, निर्माण झालेल्या उर्जेने डोळे व कपाळ स्पर्श करणे. मग हळुहळू डोळे उघडणे.


सर्व प्रथम ही ध्यानक्रीया २० मिनिटे करावीत. हळुहळु सराव वाढवावा. काही प्रश्न असल्यास प्रत्यक्ष संपर्क करावा.



ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

महाकालेश्वर उज्जैन स्वामीमय सेवा माहिती

त्र्यंबकेश्वर सेवा माहिती

दत्त संप्रदाय व साधन, साध्य, समाधी

सर्व स्वामींशिवभक्तांसाठी अद्वितीय शिवसाधना पद्धती...!!!

श्री गुरुचरित्राच्या सप्ताहवाचनाच्या पद्धती व संक्षिप्त रसग्रहण




0