मूर्ती त्राटक ( Statue Tratak ) - जागृत सगुण शक्तीसाधना...!


मूर्तीसाधनेची आत्मसंज्ञा ऋषीमुनींकडुन मिळालेली अनुपम भेट आहे. हिचे महत्व न समजणार्या कित्येक अनभिज्ञ लोकांनी स्वतःच्या बालिशतेमुळे ह्या सुगंधी पुष्पाला कुस्करुन टाकले आहे. मुर्तीला न मानणारा मनुष्य केवळ स्वतःचे मानसशास्त्रविषयाचे अज्ञान प्रदर्शित करतो. सामान्य माणसाला भगवंताची मनोहर मुर्ती पाहुन जीवनात ऊब व आश्वासन प्राप्त होते. थकलेल्यांना नवीन चेतना सापडते. निराश झालेल्या मानवाच्या जीवनत नव्या आशेचा संचार होतो. साधकांना मानसिक आधार मिळतो. कर्मयोग्यांचा जीवनपथ ईश्वरप्रकाशाने प्रकाशित होऊन उठतो. विद्वानांना त्यातच पुर्णतेच्या अनुभूतीचा परितोष होतो.

मूर्तीसाधनेची आत्मसंज्ञा ऋषीमुनींकडुन मिळालेली अनुपम भेट आहे. हिचे महत्व न समजणार्या कित्येक अनभिज्ञ लोकांनी स्वतःच्या बालिशतेमुळे ह्या सुगंधी पुष्पाला कुस्करुन टाकले आहे. मुर्तीला न मानणारा मनुष्य केवळ स्वतःचे मानसशास्त्रविषयाचे अज्ञान प्रदर्शित करतो. सामान्य माणसाला भगवंताची मनोहर मुर्ती पाहुन जीवनात ऊब व आश्वासन प्राप्त होते. थकलेल्यांना नवीन चेतना सापडते. निराश झालेल्या मानवाच्या जीवनत नव्या आशेचा संचार होतो. साधकांना मानसिक आधार मिळतो. कर्मयोग्यांचा जीवनपथ ईश्वरप्रकाशाने प्रकाशित होऊन उठतो. विद्वानांना त्यातच पुर्णतेच्या अनुभूतीचा परितोष होतो.

मुर्ती त्राटक सगुणोपासनेसारखी दुसरी दिव्य कल्पना नाही. तसाच त्याचा सारखा दुसरा कोणताही आनंद नाही. तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून अदैतवादाच्या हिमालयासारख्या उत्तुंग शिखराला गाठणारे श्रीमद् शंकराचार्यही भगवंताच्या साकार रुपाला पाहाण्याची तीव्र कामना करतात. भागवत देखील, भगवान श्रीकृष्णाने गोपींना समजावण्यासाठी उद्धवला पाठविले आहे. उद्धव गोपींना साकार अथवा सगुण कृष्णाऐवाजी अणुरेणुत व घटाघटात व्यापलेला कृष्ण- तत्वाने उपासना करायला सुचवतो. गोपी उद्धवाचे हे ज्ञान स्वीकारायला तयार होत नाहीत त्या उद्धवला म्हणतात, ' तुझा हा व्यापक कृष्ण आमच्या काय कामाचा ? आम्हाला तर आमच्याशी हसणारा, रास खेळणारा, मन प्रसन्न करणारा व रुसणारा कृष्ण पाहीजे. ' संत कबीरांनीही, ' कृष्णगोपीयांची भक्ती ईतकी श्रेष्ठ आहे की, त्यांच्या आनंदाश्रुत माझासारखे कोट्यानुकोट्टी कबीर वाहुन जातील ' असे सांगितले आहे.


मुर्ती त्राटक सगुण साधनेची अभीव्यक्ती ईतर सगुणोपासनेच्या तुलनेत योगस्तरावर अतिउच्च अवस्थेत आहे. मुर्ती त्राटक हे फार उच्च तत्व आहे. भावपुर्ण व तेजस्वी जीवन जगणाऱ्याच्या हातात मुर्ती त्राटक साधना येईल तर ते विश्वाचे बादशहा बनवतील आणि महमद गझनीसारख्यांच्या हाताता आली तर ते सोने पाहुन फटकाच मारणार. मुर्ती त्राटक ही निर्गुण निराकार तत्वाच्रा दिशेने शाश्वत धारण्या करण्यासाठी एक गंभीर, खंबीर आणि धैर्य साधुन प्राणोपासना करण्याचे परिपक्व आत्मपाऊल आहे. या एकाग्रतेला अनुभवण्याहेतु टप्याटप्याने मुर्ती त्राटक साधनेत आत्म सहभागी होता आले पाहीजे.


श्री स्वामी समर्थ, श्री गणपती, शिवलिंग, श्रीकृष्ण रुप आणि दत्त महाराजांचे मनोहरी सगुण रुप यांची मुर्ती त्राटकाच्या माध्यमातून सेवा केल्यास आपली प्राणशक्ती, आत्मबळ, सद्बुद्धी व भगवत्मय अंतःकरणात होणारी प्रगती त्वरीत अनुभवता येते. ज्यायोगे आपण आपल्या सुक्ष्म देहातील आरध्य दैवताशी अथवा सद्गुरुजनांशी सहज विरक्त अवस्थेत संवाद साधु शकतो. आज समाजात दिसत असलेला मुर्तीपुजेतील उपहास थोतांडाचं एक ज्वलंत उदाहरण आहे. आपण सत्वकारणाने मुर्ती रहस्य समजावुन घेणे व मुर्ती त्राटक साधना अनुभवुन शिवआत्मानुसंधान साधण्यासाठी आवश्यक प्रयत्न करावा. ह्या प्रामाणिक प्रयत्नात महाराज साथ देतील असा माझा विश्वास आहे.



आपल्या देहातील सर्वात नाजुक व अतिसंवेदनशील अवयव म्हणजे आपले नेत्र...! ह्या नेत्रांनी काय पहावं आणि काय आत्मसात करावं याचा निर्णय आपलं अंतःकरण ठरवतं...! आपण मुर्ती त्राटक साधनेचा प्रारंभ करण्यापुर्वी काही पुर्वतयारीची अपेक्षा असते. ज्यायोगे आपलं अंतः करण व ज्या मुर्तीसोबत आपण संलग्न होणार त्याची परिकायेचं आवाहन ह्यांचा आत्मसंबंध प्रस्थापित करता आला पाहीजे. मुर्ती त्राटक साधना प्रारंभी फक्त १ मिनिटे ते ३ मिनिटांपर्यंत करावी. ह्या साधनेने आपली प्राणशक्ती संंबंधीत मुर्तीत प्रकट होते व आपण मुर्तीतील संजीवन आचरण संवेदना सहज अनुभवु शकता.


श्री स्वामी समर्थ भक्ताचा एक अनुभव सांगु ईच्छितो, ' एक भक्त संबंधित साधनेतुन स्वामींची ईतकी सगुणोपासना करायचा की, त्या भक्ताला स्वतःचाच विसर पडु लागला. भक्ताचं वय झालं. वयोमानाप्रमाणे आजारी पडले. घरच्यांनी डाँक्टरांना बोलावलं आणि तेवढ्यात देवार्यात ठेवलेली स्वामींची शाडुची मुर्ती एका माणसाच्या हातुन निसटली व खाली पडली. अंथरुणावर पडलेल्या भक्ताचा जीव कासाविस झाला. त्यांने अनुभवलं की स्वामींना जमीनवर काहीतरी लागलं. त्यांनी डाँक्टरांना मुर्ती आणुन द्या अस सांगितले. काहीही सांगितलं तरी स्वामींभक्त कोणाचहीं एकत नसे. सर्वजण म्हणाले, ' तुम्ही एका तुटलेल्या मुर्तीसाठी ईताका आकांत तांडव का करत आहात ? आपण नवीन मुर्ती आणु...! ' स्वामींभक्ताने तिथे उपस्थित असलेल्या डाँक्टराला सांगितले की, ' तुझ्या गळ्यातील ते छाती तपासायचं स्थेटोस्कोप त्या तुटलेल्या मुर्तीला स्पर्श करं.' डाँक्टरांनी तसेच केलं. त्या स्वामीमुर्तीला तपासल्यावर आश्चर्याने डाँक्टराची बुद्धी खुंटली कारण त्याने त्या तुटलेल्या मुर्तीतुन स्पष्ट आवाजात ह्दयाची स्पदने येत आहेत असे ऐकले होते. त्यायोगे त्या स्वामीभक्ताचे सर्वांनी पाय धरले व माफी मागितली. 


सद्गुरुकृपा अगम्य, अनाकलनीय व मायातीत आहे. ही कृपा होणे हेतु आपलं आत्मसंधान महाराजांसोबत व्हावं हीच दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट संस्थेची एकमेव ईच्छाशक्ती आहे. मूर्ती त्राटक साधना आपलं भौतिक जीवन आणि महाराजांच आध्यात्मिक सान्निध्य स्वयंभु तत्वाने एकजीव करण्याची एकमेव आत्म साधनप्रणाली आहे. ह्याचा अनुभव आपण हळुहळु परिपक्वतेच्या दिशेने पाऊल उचलुन घेऊ शकता. आम्ही आवश्यक तितके सहकार्य सर्व साधकांना मिळवुन देत आहोत.


अक्कलकोट श्री स्वामी समर्थ यामधे अक्कलकोट म्हणजेच अकलेचे सर्व कोट बांधुन परमात्माचं आवाहन करा असं सांगितलं आहे. हे आवाहन सगुणोपासनेत मुर्ती त्राटक साधनेशिवाय अपुर्ण आहे.  



महत्त्वाची टिप...

संबंधिक साधनाक्रीया संबंधित साधना तज्ञांच्याच मार्गदर्शनाखाली कराव्यात.