आत्मरत्न ( Soul Gem ) म्हणजे काय ? माणुस का भरकटतो ?- Read right Nowhttps://youtu.be/w5UoF-_PRkU


भरटकलेला मानव ज्यावेळी आत्मरत्नाचं गांभीर्य अनुभवण्यास सुरवात करतो त्याच क्षणी तो वाल्याचा महर्षि वाल्मिकी होतो. आध्यात्मिक दृष्टिकोनातून नाहत नादाचे भावबुद्धी पालटून अनाहत नादात परिवर्तन होते. महाराष्ट्रातील बहुतांशी संत योगीजनांचे आध्यात्मिक परिवर्तन आसक्त भावबुद्धी पालटल्यामुळेच घडले.

भरटकलेला मानव ज्यावेळी आत्मरत्नाचं गांभीर्य अनुभवण्यास सुरवात करतो त्याच क्षणी तो वाल्याचा महर्षि वाल्मिकी होतो. आध्यात्मिक दृष्टिकोनातून नाहत नादाचे भावबुद्धी पालटून अनाहत नादात परिवर्तन होते. महाराष्ट्रातील बहुतांशी संत योगीजनांचे आध्यात्मिक परिवर्तन आसक्त भावबुद्धी पालटल्यामुळेच घडले.

आध्यात्मिक गर्भधारणा कशी होते ?

" जन्म घ्यावा लागे l वासनेच्या संगे ll " अर्थात अंतरवासना आहे तर स्थुलदेह जन्म होणारच...! हा जन्म होण्याआधी काही विशिष्ट व आध्यात्मिक प्रक्रीयेतुन अर्भकाला जावे लागते. या संबंधीत निवडक माहीती येथे देऊ ईच्छितो. आपल्या घरात नवीन बालक जन्माला येण्याचा संबंध आपल्या पितरांशी, कुलदेवतेशी आणि संबंधित आई वडीलांच्या कर्माशी जोडलेला असतो. सुक्ष्म गर्भधारणा होण्यापुर्वी स्थुल देहाची संरचना ह्दयधारणा पर्यंत अंदाजे ४५ दिवसांत सुरु होऊ लागते. ही ह्दय संरचना पुढील ४५ दिवस निर्विघ्नतेचे आत्मसंक्रमित होणे हेतु जीवपिंडाच अवलोकन करते. या अनुशंघाने सरासरी ३ महीने अर्भकाच्या स्थुल देहात सुक्ष्म पुरुषप्रकृती अनुकूलता उत्पन्न झाल्यानंतर संबंधित आत्मा त्या महिलेच्या हंसः सोsहं या अजपाजप अनुग्रहाद्वारे गर्भात प्रवेश करतो. ह्या सुक्ष्म क्रीयेत संबंधित महीलेला अजपाजप व ईतर आत्मप्रावधानाची यत्किंचितही जाणीव नसते.

एकदा आत्मतत्व गर्भधारणेत प्रविष्ट झाल्यावर त्या अर्भकाची मानसिक, शारीरीक व चैतन्यमय आध्यात्मिक वाढ पुर्ण होऊ लागते. चैतन्यप्रवाहाच्या संवेदनेने अर्भकाचे रुपांतर आत्मजीव देहात होऊन ९ महीने ९ दिवसांनी सरासरीने जन्म होतो. आत्मरत्न एक रहस्यमय परमतत्व आहे जे सुक्ष्म देहाला मिळालेले एक गुप्त वरदान आहे. ह्या वरदानाची जोपर्यंत गांभीर्यतेने ओळख होत नाही तो पर्यंत असेच नरकवासनेत भरकटत राहाणार यात शंका नाही.



वरील आध्यात्मिक गर्भधारणेत सर्वात मोठी भुमिका आत्मशक्तीची आहे असं आपल्याला जाणवतं. ज्याअर्थी आत्मा आपल्याला मानसिक, शारीरिक व बौद्धीक स्तरावर अमृतमय योगदान करु शकतो तर देहबुद्धीपलिकडील आत्मरत्नाने आपण ज्या कुळात, घरात आणि गुरु संप्रदायात जन्म घेता, त्या प्रणालीचा आत्मोद्धार आपण करु शकता. हे विसरता कामा नये. आत्मरत्नाची अंतरीक परिभाषा गहनतेने समजावुन घेता आली पाहीजे. त्यायोगे आपण आत्मनिर्भर होऊन भगवत्मय अंतः करणाशी जोडले जाऊ शकतो.

या विश्वातील सर्वात क्लिष्ट साधन म्हणजे मानवी शरीर...! या स्थुल मानवी शरीराचे सुक्ष्म तीन प्रकार आतल्याआत अथवा एकामध्ये एक असे सामावलेले आहेत.


त्यांची माहीती खालीलप्रमाणे आहे.

  • प्रार्थमिक देह - स्थुल देह ( स्वभाव - नाशवंत )
  • अंतरिक देह - सुक्ष्म देह ( स्वभाव - अविनाशी )
  • अतिअंतरिक देह - कारण देह ( स्वभाव - उत्कट अविनाशी )
  • सत्यअंतरिक देह - वैश्विक देह ( स्वभाव - महोत्कट अविनाशी )



१. प्रार्थमिक देह


स्थुल देह म्हणजे षड रिपुंच अढळ निवासस्थान...! ह्या स्थुल देहात अनंतप्रकारचे मित्रतत्व व शत्रुतत्व सामावलेले आहेत. देह जन्माला येताच ' देवी सटवाई ' येते आणि जन्माला आलेल्या देहाचा मृत्युपश्चात होणारा पंचनामा पुर्ववत कपाळावर लिहुन निघुन जाते. या दैवी क्रीयेमुळे संबंधित कली, माया व प्रेतयोनींचा भडीमार देहावर सुरु होतो व काळानुरुप देह आध्यात्मिक जीवनापासुन परावृत्त होऊन भोगी जीवन व्यतीत करण्याचा आतोनात प्रयत्न करत असतो.


२. अंतरिक देह अथवा सुक्ष्म देह


स्थुलदेहाच्या वर उठुन म्हणजे आपल्या जीवनातील तीन घटांपैकी १. पाप घट, २. पुण्य घट आणि ३. नाम घट यापैकी नाम घटाच्या जोरावर रसातळातील गटारात भोगी जीवनासाठी लोळत असलेल्या दुर्गंधीयुक्त स्थुल देहातुन उठुन आत्मतत्व शिवपरायणजीव म्हणजे अनुग्रहीत सुक्ष्म देह. ईतर सुक्ष्म देह जे अतृप्त आत्मे आहेत ते लिंगदेहाशिवाय आपलं उर्वरिय योनीक्रम जगत असतात. त्या सुक्ष्म देहांच अर्थपुर्ण आध्यात्मिक महत्व गणले जात नाही.


३. अतिअंतरिक देह अथवा कारण देह


सुक्ष्म देहाचा जीवात्मा ते शिव परमात्माचा निरंतर अभंग प्रवास त्या सुक्ष्म देहाला कारण देह अभिव्यक्तीत परिक्रमण करवतो. सदगुरु समाज सर्वतोपरी कारण देहाचे अवलोकन करुन संबंधित दासांचे मार्गदर्शन करतात. योग, ध्यान व अंतर्मुंख अर्थयुक्त नामस्मरणाच्याच माध्यमाने संबंधित जीव कारण देहातील आत्मशक्तींशी संपर्क करु शकतो. या तत्वात ईतर घोकमपट्टी वाचाळता व्यर्थ आहे.


४. सत्यअंतरिक देह अथवा वैश्विक देह


कारण देहाची अभिव्यक्ती एकमात्र वैश्विक देहाशी विचरण करु शकते. ह्या वैश्विक देहात ( परम देहात ) श्रीरुपे सामावलेली आहेत त्यात भगवान श्री दत्तात्रेय स्वामी महाराज, देव पंचायतन व ईतर दैवी शक्तिंचा समावेश असतो. अत्यंत गुढ अशा देहतत्वांचे सखोल विश्लेषण ईथे व्यापकतेने लिहीण्यास शक्य नाही. ज्या साधकांना सत्वकारण जाणुन घेण्याची जिज्ञासा आहे त्यांनीच संबंधित लिखाणाबद्दल प्रतिसाद द्यावा.


ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

संसारीक लोकांसाठी अनुभवसिद्ध व सोपी साधना - २

नाथपंथातील प्रसिद्ध ध्यानयोग साधना - १


ही दत्तप्रबोधिनी लिँक जपुन ठेवा. यात सर्व Youtube Live व Facebook Live चर्चा माहीती संग्रह जतन केलेला आहे.

दैविक आत्मोपचारिक उपायानुरुप साधकांचे स्वलिखित अनुभव पोस्ट ( Sadhak Experience Documented )


दत्त संप्रदाय व साधन, साध्य, समाधी




0