*म्हाळसाकांत वन्दनम कुलदैवतम धर्मोते हसौते
वाघ विदन्यान रुख्मिनी कलीवशनम मार्तनडायन नमः
*अनंतकोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगिराज सद्गुरु स्वामी समर्थायन कुलदैवतायन नमः
* मल्हारी जगतांनाकुम जगतगुरू
प्रत्येकाने हातात भंडारा घेऊन खलील प्रमाणे म्हणावे
अलंकारा देवा, मार्तण्डा देवा, चाललेच्य भक्तांच्या देवा कुलधर्म कुलाचार तळी भंडार देवा पावन करून घे देवा, मनातली ईच्छा पूर्ण कर देवा, दीर्घ आयुष्य दे देवा, विघ्न दूर कर देवा, सुखी संसारात उजेड पाड देवा, काय असेल ते विघ्न दूर कर देवा.
* सदानंदाचा येळकोट
म्हणून ताटात भंडारा सोडायचा आणि मग
■ ताटाला हात लावून
हर हर महादेव
हर हर महादेव
चिंतामणी मोरया
चिंतामणी मोरया
चिंतामणी मोरया
आनंदी चा उदे उदे
भैरोबाचा चांगभले
सदानंदाचा येळकोट
अगड़धूम नगारा
सोन्याची जेजुरी
देव आले जेजुरा
निळा घोड़ा
पायात तोड़ा
कंबरी गरगोटा
बेंबी हिरा
मस्तकी तुरा
अंगावर शाल
सदा ही लाल
आरती करी म्हाळसा सुंदरी
बानू सुंदरी
मदी मल्हारी
शिकार खेळी
नाना परी
खोबऱ्याचा कुटका
भंडा-याचा भडका
बोल अहंकरा
सदनंदाचा येळकोट
खंडेराव महाराज की जय
कड़ेपठार महाराज की जय
आई भवानी चा उदे उदे
येळकोट येळकोट जय मल्हार
येळकोट येळकोट जय
मल्हार
अड़कल के भड़कल
भड़कल के भंडार
बोल बोल हजारी
वाघ्या मुरळी
खंडेराव भगत
सलाम सलाम
सलाम सलाम
सदानंदाचा येळकोट
येळकोट येळकोट
जय मल्हार
येळकोट येळकोट
जय मल्हार
येळकोट येळकोट जय मल्हार
येळकोट येळकोट जय
मल्हार
सदानंदाचा येळकोट
■ ताट खाली ठेवणे
हातात भंडारा घेऊन उभे राहणे
* खंडेराया
तुझ्या दरबारामधी
सोन्याच्या डोंगरावर
कुळाचा कुलधर्म, तळी भंडार, जागरण गोंधळ, साधी पूजा पावन करून घ्या, परिवार सुखी ठेवा, आनंदात ठेवा,
कैलास पर्वतावर तळी भंडार पावन करून घ्या.
* हर हर महादेव
चिंतामणी मोरया
आनंदीचा उदे उदे
भैरोबाचा चांगभले
सदानंदाचा येळकोट
येळकोट येळकोट जय मल्हार म्हणून हातातला भंडारा उधळणे. नंतर खाली बसून ताटाला हात लावून
हर हर महादेव
चिंतामणी मोरया
आनंदी चा उदे उदे
भैरोबाचा चांगभले
सदानंदाचा येळकोट
खंडेराव महाराज की जय
कड़ेपठार महाराज की जय
आई भवानीचा उदे उदे
अगड़धूम नगारा
सोन्याची जेजुरी
देव आले जेजुरा
निळा घोड़ा
पायात तोड़ा
कंबरी गरगोटा
बेंबी हिरा
मस्तकी तुरा
अंगावर शाल
सदा ही लाल
आरती करी म्हाळसा सुंदरी
बानू सुंदरी
मदी मल्हारी
शिकार खेळी
नाना परी
भंडा-याचा भडका
खोबऱ्याचा कुटका
बोल अहंकरा
सदनंदाचा येळकोट
खंडेराव महाराज की जय
अड़कल के भड़कल
भड़कल के भंडार
बोल बोल हजारी
वाघ्या मुरळी
खंडेराव भगत
सलाम सलाम
सदनंदाचा येळकोट
येळकोट येळकोट
जय मल्हार
नंतर प्रत्येकाच्या कपाळाला ताट लावून
1. खंडेरायाचं ओझं उतरलं? असा प्रश्न विचारायचा आणि उत्तर "उतरलं" हे द्यायचे.
2. मल्हारी मार्तण्डेयाचं
ओझं उतरलं?
"उतरलं"
3. कड़ेपठारचं ओझं उतरलं ?
"उतरलं"
नंतर घरातील वरिष्ठाना वरिष्ठाना नमस्कार करायचा.
सर्व कुलदैवत विडिओ लिंक खालीलप्रमाणे

संपर्क : श्री. कुलदीप निकम

Cure Problems With Divine Powers. 100s Of People Cured ! Chakra Healing balancing. Ancient Indian Science. Based on Ashtaang Yog. Learn Yogic Healing. Types: Learner's Workshops, Stress Management, Divine Karma Cleansing, Mind empowerment, Chakra Balancing. - Visit Website Here !
Embed दत्तप्रबोधिनी न्यास on Your Site: Copy and Paste the Code Below

0 Comments